IB Recruitment 2024 : जर तुम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आयबीने विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवार IB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही भरती विविध पदांसाठी सुरू असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट पदानुसार असणार आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती.

अर्जासाठी आवश्यक पात्रता :

दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

IB Recruitment 2024 : अधिसूचना : https://www.mha.gov.in/sites/default/files/IBCircular_15032024.pdf

ही भरती प्रक्रिया ६६० पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. www.mha.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

IB Recruitment 2024 पदे:

  • ACIO-I/Exe : ८० पदे
  • ACIO-II/Exe : १३६ पदे
  • JIO-I/Exe : १२० पदे
  • JIO-II/Exe : १७० पदे
  • SA/XE : १०० पदे
  • JIO-II/टेक : ८ पदे
  • ACIO-II/सिव्हिल वर्क्स : ३ पदे
  • JIO-I/MT : २२ पदे
  • कन्फेक्शनर-कम-कुक : १० पदे
  • काळजीवाहू : ५ पदे
  • PA : ५ पदे
  • प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर : १ पद

अशा विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.

हेही वाचा >> RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मे २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.