● सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ( CFTRI), म्हैसूर. (काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूट ( CSIR) या संस्थेशी संलगभन एक प्रमुख वैज्ञानिक संशोधन व विकास संस्था आहे.) टेक्निकल असिस्टंट पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १८.
पदाचे नाव – ( I) टेक्निकल असिस्टंट ( TA) – १८ पदे (१ पद मा.सै. साठी राखीव) (वेतन श्रेणी – लेव्हल-६ (३५,४०० – १,१२,४००) वेतन दरमहा रु. ६४,७४०/-).
पोस्टकोडनिहाय रिक्त पदांचा तपशिल –
(१) TA०१ – मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ९ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी HH साठी राखीव).
पात्रता – (दि. १० मे २०२५ रोजी) मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा ६० टक्के गुण आणि संबंधित क्षेत्रात कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(२) TA०२ – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – १ पद (खुला).
पात्रता – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ आयटी डिप्लोमा ६०% गुण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(३) TA०३ – इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – १ पद (इमाव).
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा ६० टक्के गुण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(४) TA०४ – फूड सायन्स अँड फूड टेक्नॉलॉजी – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).
पात्रता – बी.एससी. (फूड सायन्स/फूड टेक्नॉलॉजी/फूड सायन्स अँड न्यूट्रिशन किंवा समतूल्य पदवी किमान ६० टक्के गुण आणि १ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव किंवा १ वर्षाचा पूर्ण वेळ प्रोफिशनल कोर्स).
(५) TA०५ – मायक्रोबायोलॉजी – १ पद (खुला).
पात्रता – बी.एससी. (मायक्रोबायोलॉजी) किंवा समतूल्य पदवी किमान ६० टक्के गुण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव किंवा १ वर्षाचा प्रोफेशनल कोर्स.
(६) TA०६ – केमिस्ट्री – २ पदे (ईडब्ल्यूएस – १, खुला – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).
पात्रता – बी.एससी. (केमिस्ट्री) किंवा तत्सम पदवी किमान ६० टक्के गुण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव किंवा १ वर्षाचा पूर्ण वेळ प्रोफेशनल कोर्स.
वयोमर्यादा – (दि. १० मे २०२५ रोजी) JSA – २८ वर्षे, STEN – २७ वर्षे (विधवा/घटस्फोटीत/कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला/इमाव – ३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल, जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. ट्रेड टेस्टमधील पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी (ओएमआर बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप बहुपर्यायी परीक्षा ५५० गुणांची, वेळ ३ तास) बोलाविले जाईल. यात ३ पेपर्स घेतले जातील.
पेपर-१ मेंटल अॅबिलिटी टेस्ट १०० प्रश्न. प्रत्येकी २ गुण. एकूण २०० गुण, वेळ ६० मिनिटे.
(जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सिच्युएशनल जजमेंट इ.)
चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जात नाहीत. पेपर-१ फक्त पात्रता स्वरूपाचा असेल.
पेपर-२ ( i) जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न आणि ( ii) जनरल इंग्लिश – २५ प्रश्न. प्रत्येकी ३ गुण. एकूण १५० गुण, वेळ ३० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा केला जाईल.
पेपर-३ संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण ३०० गुण, वेळ ९० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी पेपर-२ व पेपर-३ मधील गुण एकत्रित करून तयार केली जाईल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी पेपर-२ व पेपर-३ मधील गुण एकत्रित करून तयार केली जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी पेपर- २ आणि पेपर- ३ मधील गुणांनुसार बनविली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
कामाचे ठिकाण – CFTRI चे म्हैसूर येथील मुख्यालय किंवा मुंबई, हैद्राबाद, लखनौ येथील CFTRI चे रिसोर्स सेंटर्स.
अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (महिला/अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.) (ऑनलाइन पेमेंट करावयाची लिंक जाहिरातीत पॅरा ५(९) मध्ये उपलब्ध आहे.)
ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती https:// cftri. res. in या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा ५ मधे दिलेली आहे. ज्यु. स्टेनोग्राफर आणि ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट पदांसाठी पात्र असल्यास दोन वेगवेगळे अर्ज करावे लागतील. ऑनलाइन अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी जाहिरातीमधील पॅरा ७ मध्ये दिलेली आहे.
ऑनलाइन अर्ज https://cftri.res.in किंवा https://recruitment.cftri.res.in या संकेतस्थळावर दि. १० मे २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.
suhaspatil237@gmail.com