● स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५४१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती.
(अजा – ७५ ५, अज – ३७ ३६, इमाव – १३५, ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २०३) दिव्यांग उमेदवारांसाठी २० पदे राखीव. (१) एल्डी – ५, (२) व्हीआय – ५, (३) एचआय – ५, (४) डी अँड ई – ५ पदे राखीव आहेत. ( दर्शविलेली पदे ही बॅकलॉगमधील राखीव पदे आहेत.) पात्रता – (दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील).
वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२५ रोजी) २१ ते ३० वर्षे
वेतन श्रेणी – रु. ४८,४८० २,००० ८५,९२० मध्ये मूळ वेतन रु. ५६,४८०/- आगाऊ ४ वेतनवाढींसह अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. २०.४३ लाख प्रती वर्ष (सीटीसी).
निवड पद्धती – फेज-१ – ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा (जुलै/ऑगस्ट २०२५ दरम्यान) १०० गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे. ( i) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ( ii) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न, ( iii) रिझनिंग अॅबिलिटी – ३० प्रश्न.) प्रत्येक सेक्शनसाठी वेळ २० मिनिटे.
सेक्शनला कट ऑफ अपेक्षित नाही. ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षेमधील गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी १:१० प्रमाणात निवडले जातील. पूर्व परीक्षेसाठीचे कॉल लेटर जुलै २०२५ च्या तिसऱ्या/चौथ्या आठवड्यात अपलोड केले जातील.
फेज-२ – मुख्य परीक्षा सप्टेंबर, २०२५ मध्ये घेतली जाईल. ( i) ऑब्जेक्टिव्ह टाईप – २०० गुणांसाठी १७० प्रश्न, वेळ ३ तास. (१) रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, ६० गुण, वेळ ५० मिनिटे. (२) डेटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ३० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. (३) जनरल अवेअरनेस/ इकॉनॉमी/ बँकींग नॉलेज – ६० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. (४) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, २० गुण, वेळ ४० मिनिटे. एकूण १७० प्रश्न, एकूण २०० गुण.
(प्रिलिमिनरी आणि मुख्य परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.)
( ii) डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट – ५० गुण, वेळ ३० मिनिटे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज (कम्युनिकेशन स्किल्स : ई-मेल्स : रिपोर्ट्स : सिच्युएशन अॅनालिसिस : सारांश लेखन)
मुख्य परीक्षा (फेज-२) उमेदवारांनी प्रत्येक सेक्शनसाठी निर्धारित केलेले किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक. सरासरी गुणांनुसार कॅटेगरीनिहाय तात्पुरती निवड यादी बनविली जाईल व १:३ या प्रमाणात उमेदवारांना फेज- III साठी निवडले जाईल.
फेज-३ – सायकोमेट्रिक टेस्ट – Personality Profiling करिता उमेदवारांची सायकोमेट्रिक टेस्ट ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाईल. सायकोमेट्रिक टेस्टचे Findings इंटरव्ह्यू पॅनेलसमोर मांडले जातील. यात ग्रुप एक्सरसाईज आणि इंटरव्ह्यू ५० गुणांसाठी असेल. ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ मध्ये इंटरव्ह्यू होतील. ग्रुप एक्झरसाईज (२० गुण) व मुलाखत (३० गुण). अंतिम निवडीसाठी फेज-२ व फेज-३ मधील गुण विचारात घेतले जातील. फेज-२ चे २५० गुण, ७५ गुणांमध्ये रूपांतरीत केले जातील व फेज- III च्या ५० गुणांना २५ गुणांमध्ये रूपांतरित केले जातील. अंतिम निवड रूपांतरित १०० गुणांमधून केली जाईल.
परीक्षा शुल्क – खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ७५०/-.
ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळावर १४ जुलै २०२५ पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क फोन नं. ०२२-२२८२०४२७.
suhaspatil237 @gmail. com