Success Story: यश किंवा अपयश आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर येते, पण त्या यशापुढे गर्व न करता आणि अपयशामुळे न झुकता जी व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असते, ती आयुष्यात नक्कीच मोठे स्थान प्राप्त करते. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

अभियांत्रिकीचा हुशार विद्यार्थी शैलेंद्र कुमार बांधे राज्य लोकसेवा आयोगाच्या (CGPSC) कार्यालयात शिपाई म्हणून रुजू झाले. पण, त्यानंतर कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर आता ते अधिकारी झाले आहेत. शैलेंद्र कुमार यांनी नुकतीच छत्तीसगड राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सामान्य श्रेणीत ७३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.

शैलेंद्र कुमार बांधे यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) येथून बीटेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) केले. एका नामांकित संस्थेतून अभियांत्रिकी केल्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असती, परंतु त्यांनी ‘प्लेसमेंट इंटरव्ह्यू’ला न जाता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपले लक्ष केंद्रित केले.

शैलेंद्र यांचे शिक्षण

शैलेंद्र बांधे हे बिलासपूर जिल्ह्यातील बिटकुली गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी रायपूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) रायपूर येथे यांत्रिकी अभियांत्रिकी (B.Tech) चे शिक्षण घेतले. शैलेंद्र यांनी त्यांच्या पाचव्या प्रयत्नात CGPSC-2023 परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना सर्वसाधारण गटात ७३ वा, तर राखीव गटात दुसरा क्रमांक मिळाला आहे.

हेही वाचा: Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपयशापुढे झुकले नाही

पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षेत अयशस्वी झाले. पुढच्या प्रयत्नात मुख्य परीक्षा पास होऊ शकले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र ठरले, पण यश मिळू शकले नाही. अखेर पाचव्या प्रयत्नात यश मिळाले. सीजीपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी सलग वर्षे घालवल्यामुळे, आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना शिपाई पदाची नोकरी निवडावी लागली. पण, यासोबतच त्यांनी राज्य नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू ठेवली.