Success Story : भारतातील अनेक तरुण-तरुणी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून, मोठ्या कष्टाने UPSC, MPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवतात. आजपर्यंत अशा अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्ही वाचला असेल. आजही अशाच एका यशस्वी प्रवासाची कथा आम्ही घेऊन आलो आहेत.

गरिबीपासून आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा या तरुणाचा प्रवास देशभरातील सर्व यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. या तरुणाचे पवन कुमार असे असून, हा उत्तर प्रदेशातील बुलंदशहर या छोट्या शहरातील रहिवासी आहे. त्याने UPSC नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये २३९ वा क्रमांक मिळवून मोठे यश मिळवले.

गरिबीत गेले बालपण

पवन कुमारचे बालपण गवताचे छत आणि मातीच्या भिंती असलेल्या घरात गेले. त्याचे कुटुंब आर्थिक अडचणींशी झुंजत होते. त्याच्या आयुष्याची सुरुवात अडचणींनी भरलेली होती. पवनची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून, त्याच्या वडिलांसह बहिणींनीही मजूर म्हणून काम करून पैसे साठवले. पवनचे वडील मजूर आणि गरीब शेतकरी होते. गरीब कुटुंबातील असल्याने पवनच्या यशानंतर त्याच्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावरही आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेत यश मिळविण्याचा निर्धार

बुलंदशहरच्या नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर पवनने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंगसाठी दिल्लीला गेला आणि तेथे त्याने दोन वर्षे कोचिंग घेतले. पवनने नागरी सेवेत नोकरी मिळावी यासाठी हे स्वप्न पूर्ण करण्याचे मनाशी ठरवले होते. त्याला अभ्यासात नेहमीच चांगले गुण मिळत राहिले. त्याने परीक्षा आणि स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी सुरू ठेवली. पवन जुन्या फोनच्या मदतीने स्वतःचा अभ्यास करीत राहिला आणि यूपीएससी नागरी सेवा २०२३ च्या परीक्षेतील निकालामध्ये पवनने २२३ वा क्रमांक मिळवला. या परीक्षेत मेहनत आणि समर्पण यांमुळे त्याने हे यश मिळवले होते.