Success Story: भारतातील दिग्गजांचे प्रेरणादायी प्रवास नेहमीच आपल्याला ऊर्जा देतात. स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण या यशस्वी दिग्गजांच्या प्रेरणादायी प्रवासाकडे आदर्श म्हणून पाहतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी करण्याचे ध्येय असते. अनेकांना स्वतःचे स्वप्न साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण, आयुष्यात मेहनत फक्त गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकच नाही, तर श्रीमंत घरातील व्यक्तीदेखील स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतात.
या दिग्गज उद्योजकांचे नाव दिलीप पिरामल असून हे अंबानी कुटुंबाचे नातेवाईक आहेत. दिलीप पिरामल हे ईशा अंबानीचा पती आनंद पिरामलचे मोठे काका आहेत. आनंदचे वडील अजय पिरामल हे पिरामल ग्रुपचे प्रमुख असताना, त्यांचे मोठे भाऊ दिलीप पिरामल यांनी कुटुंबाच्या कापडाचा व्यवसाय सोडून स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला. दिलीप पिरामल यांनी VIP इंडस्ट्रीजची स्थापना केली असून त्यांनी आतापर्यंत ६,३६८ कोटी रुपयांच्या कमाईसह भारतातील लगेज आणि बॅग उत्पादन क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.
दिलीप पिरामल यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईतील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांनी १९७० मध्ये सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेतली. १९७० मध्ये ते मोरारजी मिल्सचे संचालक म्हणून कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. त्यानंतर त्यांनी VIP इंडस्ट्रीची सुरुवात केली.
त्यांच्या VIP इंडस्ट्रीजने कार्लटन, Caprese, Aristocrat, Skybags आणि Alfa यांसह अनेक यशस्वी ब्रँड्स सुरू केले आहेत. हे ब्रँड्स खूप लोकप्रिय असून सध्या देशभरात या ब्रँड्सला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
सध्या दिलीप पिरामल यांची मुलगी राधिका हिने VIP इंडस्ट्रीजच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे आणि सध्या ती अनेक कंपनीची व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करते. वडील आणि मुलगी यांनी जोडीने कंपनीला करोडोंच्या घरात पोहोचवले आहे. पिरामल कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे USD ५.८ अब्ज आहे, तर दिलीप पिरामल यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे ४००० कोटी रुपये फोर्ब्सनुसार आहे.