Success Story Of Akrit Pran Jaswal : सध्या अनेक जण सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक / कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करतात. सुरकुत्या कमी करणे, केस, पोट, स्तन वाढवणे किंवा कमी करणे, ओठांचे आकार वाढवणे किंवा कमी करणे आदी अनेक गोष्टी शस्त्रक्रियेद्वारे साध्य केल्या जातात. तर अनेकांना पाहिजे तसे सुंदर रूप मिळवून देणाऱ्या अशाच एका तरुण सर्जनची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत, ज्याला जगातील सर्वांत तरुण सर्जन म्हणून संबोधले जाते.

तर या सर्जनचे नाव आहे अकृत प्राण जस्वाल असे आहे. जगातील सर्वांत तरुण सर्जन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकृतने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी शस्त्रक्रिया करून नावलौकिक मिळवला. २३ एप्रिल १९९३ रोजी हिमाचल प्रदेशातील नूरपूर येथे जन्मलेल्या अकृतने लहानपणापासूनच विलक्षण क्षमता दाखवली. तो अवघ्या १० महिन्यांचा होता, तोपर्यंत त्याला चालता-बोलता येत होते आणि दोन वर्षांचा असताना तो अगदी व्यवस्थित वाचन व लिहूसुद्धा लागला होता. बहुतेक मुले ज्या वयात प्राथमिक मूलभूत कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी धडपडत असतात, त्या वयात अकृतने इंग्रजी कॉमिक्स वाचून, त्याच्या आसपासच्या लोकांना आश्चर्यचकित केले.

त्याच्या प्रतिभेने तेव्हा लक्ष वेधून घेतले जेव्हा त्याने वयाच्या सातव्या वर्षी त्याने आठ वर्षांच्या पीडितेवर (burn victim) शस्त्रक्रिया केली. त्या शस्त्रक्रियेने त्याला ‘जगातील सर्वात तरुण सर्जन’ ही पदवी मिळवून दिली. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे त्याच्या वैद्यकीय प्रवासाला सुरुवात झाली.

भारतातील सर्वात तरुण विद्यापीठाचा विद्यार्थी

अवघ्या १२ व्या वर्षी, अकृत भारतातील विद्यापीठाचा सर्वांत तरुण विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या १४६ या बुद्ध्यांकासह असलेल्या तेजाद्वारे त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे ‘ओप्रा विन्फ्रेच्या टॉक शो’मध्ये त्याला हजेरी लावता आली. त्यावेळी त्याने चंदिगड विद्यापीठात वैज्ञानिक संशोधन करण्यास सुरुवात केली होती आणि नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथून बायोइंजिनियरिंगचा पाठपुरावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या १७ व्या वर्षी तो रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविण्याच्या दिशेने कामही करत होता. त्यानंतर अकृतने कर्करोगाच्या संशोधनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्याला क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळाले. नावीन्यपूर्ण वैद्यकीय अभ्यासासाठी त्याचे समर्पण जगभरातील व्यक्तींना प्रेरणा देत आहे.