IAS officer Soumya Jha Success Story : प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने भविष्यात यशस्वी व्हावे, असे वाटते; पण यशासाठी फक्त शालेय शिक्षण पुरेसे नाही. तर आपण कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. तर आज आपण अशाच एका आयएएस अधिकारी महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत; जिने लहान वयातच वेगवेगळ्या नागरी सेवांच्या पदांचा अनुभव घेतला आहे. कोण आहे ही हुशार आयएएस अधिकारी चला जाणून घेऊयात…

आयएएस अधिकारी सौम्या झा यांनी शिक्षणात क्रांती घडवली आहे. त्यांची कामाबद्दलची निष्ठा आणि दूरदृष्टी त्यांना इतर नागरी प्रशासन अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी बनवते. सौम्या झा या २०१७ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहेत. सौम्या झा मूळच्या बिहारच्या आहेत. पण, अनेक वर्षांपासून त्या मध्य प्रदेशात राहत आहे. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

सौम्या झा यांनी बिहारमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्या दिल्लीला मौलाना आझाद कॉलेजमध्ये एमबीबीएस करण्यासाठी गेल्या. सुरुवातीला त्यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती. पण, आई रेल्वे प्रवासात डॉक्टरची सेवा द्यायची आणि वडील आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण केली. यूपीएससी सीएसई परीक्षेत त्यांनी एआयआर ५८ रँक मिळवली आणि त्या आयएएस अधिकारी झाली्या

सौम्या यांना प्रथम हिमाचल केडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. पण, दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये त्यांची राजस्थान केडरमध्ये बदली करण्यात आली; येथे त्यांना प्रथम जयपूर जिल्हा परिषदेचे सीईओ बनवण्यात आले. त्यानंतर त्यांना गिरवा, उदयपूर येथे एसडीएम म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर त्यांना राजस्थानच्या टोंकचे कलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे सौम्या झा जिल्ह्यातील सर्वांत तरुण कलेक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. येथे त्यांनी शिक्षणापलीकडेही काम केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात कत्तलखाने बंद केले आहेत. त्यामुळे त्यांना काही काळासाठी मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.

पढाई विथ एआय (Success Story )

आयएएस अधिकारी सौम्या झा यांनी टोंक जिल्ह्यात ‘पढाई विथ एआय’ उपक्रम सुरू केला, ज्यामुळे राजस्थानमधील शिक्षणात त्यांनी परिवर्तन घडले. या उपक्रमांतर्गत, शाळांनी एआय-जनरेटेड शिक्षण साधने सादर केली आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घेतला. सौम्या यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्या आणि विद्यार्थी त्यांच्या महत्त्वाकांक्षेनुसार काम करू शकत नसल्याचे त्यांनी पाहिले. निरीक्षण केल्यानंतर हे परिवर्तन घडले. पण, एआयच्या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक आकर्षण निर्माण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौम्या यांनी असेही निरीक्षण केले की, केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर शिक्षकांनाही निवडणुकीशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे त्यांची शैक्षणिक कर्तव्ये पार पाडणे कठीण जात होते; ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामध्ये काही कुटुंबे शेतीवर अवलंबून राहतात, ज्यामुळे शिक्षणापेक्षा शेतीच्या जबाबदाऱ्यांना घरची मंडळी जास्त प्राधान्य देतात. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. त्यांनी या समस्या ओळखल्या आणि ‘पढाई विथ एआय’ ही नवीन कल्पना सप्टेंबर २०२४ रोजी सुरू केली.