Success Story: जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असतो. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात, ज्याच्या कष्टाचे फळ अखेर त्यांना मिळतेच. भारतात असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी गरीब परिस्थितीतूनही मेहनतीच्या जोरावर आपले करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या संघर्ष काळात शिंपी म्हणून काम केले आणि अचानक एका कल्पनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. आज त्यांचे नाव देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट व्यावसायिकांमध्ये घेतले जाते आणि त्यांची एकूण संपत्ती तब्बल १० हजार कोटी रुपये आहे.

शिंपी म्हणून करायचे नोकरी

या यशस्वी उद्योजकाचे नाव इरफान रझाक असून ते प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इरफान यांचा जन्म १९५० मध्ये बंगळुरू मुस्लीम कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील एका छोट्या दुकानात शिंपीचे काम करायचे. इरफानही सुरुवातीला वडिलांसोबत टेलरच्या दुकानात काम करत होते. त्यांच्या वडिलांनी प्रेस्टीज ग्रुपचा पाया रचला होता, ज्याचे रुपांतर रझाक यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर एका महान ब्रँडमध्ये केले.

हेही वाचा: Success Story: शाब्बास पोरा! वडिल चालवायचे चहाची टपरी, शिक्षणासाठी पैसे नसतानाही खचून न जाता पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत उत्तम यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१.३ अब्ज डॉलर्सची उभी केली कंपनी

इरफान रझाक यांच्या नेतृत्वाखाली २८५ प्रकल्प पूर्ण केले, प्रेस्टीज इस्टेटचा व्यवसाय खूप वाढला आहे. या कंपनीने निवासी, व्यावसायिक, किरकोळ आणि आदरातिथ्य विभागांमध्ये सुमारे २८५ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. ही कंपनी आता १.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १० हजारांहून अधिक कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीच्या शेअर्समध्येही ६० टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या इरफान यांची कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लिस्टेड प्रॉपर्टी फर्म बनली आहे. प्रेस्टीज ग्रुपकडे Apple, Caterpillar, Armani आणि Louis Vuitton सारखे प्रसिद्ध ग्राहक आहेत.