HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक अॅण्ड रसायन लिमिटेड म्हणजेच HURL मध्ये भरती होणार असल्याची माहिती समोर आली होती. या भरतीद्वारे विविध जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. एचयूआरएलच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना hurl.net.in. या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. २१ एप्रिल रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जर या कंपनीमध्ये काम करायची इच्छा असूनही तुम्ही अर्ज भरून पाठविला नसेल, तर २० मेपर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकणार आहात.
रिक्त पदे आणि पदसंख्या –
एचयूआरएलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या भरतीमध्ये मॅनेजर, इंजिनीयर, ऑफिसर यांच्या विविध ८० रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.
वयोमर्यदा –
अर्जदाराचे वय ३० ते ४७ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सवलत लागू आहे.
प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिसूचनेत नमूद करण्यात आला आहे. ते तपासून घ्यावे.
लिंक – https://jobs.hurl.net.in/others/E%2002%202024.pdf
पगार –
- मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – २४ लाख रुपये.
- मॅनेजर (Manager) – १६ लाख रुपये.
- इंजिनीयर, ऑफिसर – ७ लाख रुपये.
- सहायक व्यवस्थापक (एफटीसी) {Assistant Manager (FTC)} – ११ लाख रुपये.
- ऑफिसर एफटीसी {Officer (FTC)} – ७ लाख रुपये.
अर्ज कसा कराल?
- सर्वप्रथम उमेदवाराने hurl.net.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- करिअर बटणावर क्लिक करून नोकरीच्या संधींवर क्लिक करा
- एक नवीन पेज उघडेल. तेथे रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा.
- तेथील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
- सबमिशन केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
- त्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउटसुद्धा घ्या.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित असेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
संगणक आधारित चाचणी (CBT)
व्यापार चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी इत्यादी.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिसूचना नीट वाचून, मगच या भरतीसाठी अर्ज करावा.