सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया, अंटार्क्टिका व आफ्रिका या खंडांविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण युरोप खंडाविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ. आधुनिक उद्योगाचे जन्मस्थान मानला जाणारा युरोप हा दुसरा सर्वांत दाट लोकवस्ती असलेला खंड आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ११% लोकसंख्या या खंडात आहे. पृथ्वीचा सात टक्के भूभाग युरोप खंडाने व्यापलेला असून, ऑस्ट्रेलियानंतर हा जगातील दुसरा सर्वांत लहान खंड आहे.

Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
IAS Ramesh Gholap Success Story
Success Story: वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर विकल्या बांगड्या आणि मेहनतीच्या जोरावर झाले IAS अधिकारी
Success Story Of Abhishek Bakolia In Marathi
Success Story Of Abhishek Bakolia : UPSC टॉपर अपाला मिश्राने निवडला तिचा जोडीदार, वाचा कोण आहे अभिषेक बकोलिया
A walk through Delhi’s historical tapestry
UPSC essentials: पांडवांच इंद्रप्रस्थ ते मुघलांची राजधानी; देवदत्त पटनाईक यांच्याबरोबरीने दिल्लीची मुशाफिरी!
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार

युरोपियन अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे (manufacturing industries) वर्चस्व आणि उत्पादकता पातळी उच्च असल्यामुळे या खंडात जवळपास सर्वच देश विकसित आहेत. युरोपमधील सर्वांत मोठे बेट सिसिली; तर सर्वांत लांब नदी व्होल्गा (Volga) आहे. तसेच उरल ही सर्वांत लांब पर्वतरांग आहे.

युरोप खंडातील देश

संयुक्त राष्ट्रांनुसार (United Nations) युरोपमध्ये एकूण ४४ देश आहेत. विशेष म्हणजे रशिया हे राष्ट्र युरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत पसरलेले आहे. तर, ०.४४ चौ.किमी. क्षेत्र असलेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश याच खंडात आहे. इतर स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन, हंगेरी, अल्बेनिया, अँडोरा, आइसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, ग्रीस, ग्रेट ब्रिटन, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, तुर्कस्तान (काही भाग), नॉर्वे, नेदरलॅंड्‌स, पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, पोर्तुगाल, पोलंड, फिनलंड, फ्रान्स, बल्गेरिया, बेल्जियम, माल्टा, मोनाको, लक्झेम्बर्ग, लिख्टेनश्टाइन, युगोस्लाव्हिया, रुमानिया, व्हॅटिकन सिटी, सान मारीनो इत्यादी देश युरोपमध्ये आहेत.

युरोपची भौगोलिक वैशिष्ट्ये

अकोना वाळवंट : हे वाळवंट इटलीच्या सिएना प्रांतात असून, त्याचे हवामान भूमध्यसागरीय आहे. त्यात उष्ण, कोरडा उन्हाळा आणि जवळजवळ ८०० मिमी प्रतिवर्ष पाऊस पडतो. या वाळवंटात Csa हे कोपेनचे (Köppen) हवामान वर्गीकरण आढळते.

ओल्टेनियन वाळवंट : हे वाळवंट रोमानिया देशात २००,००० एकर जागेवर पसरलेले आहे.

पर्वत आल्प्स : सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली ही युरोपमधील प्रमुख पर्वतरांग आहे. ही पर्वतश्रेणी ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन व मोनॅको या देशांमध्ये पसरलेली आहे. इटलीतील मॉन्ट ब्लँक हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर असून, ते १५,७७१ फूट (४,८०७ मी.) उंच आहे. या पर्वतरांगेत इतर कार्पेथियन शिखर (४,८०७ मीटर) उत्तर स्लोव्हाकियामधील गेर्लाचोव्हकेन (२,६५५ मीटर) हे पर्वत आहेत. गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वांत लांबीचा बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.

अपेनाइन्स पर्वत : इटलीत १,२०० किमी लांबी व २५० किमी रुंदी असलेली ही पर्वतरांग आहे. या श्रेणीतील सर्वांत उंच बिंदू माउंट कॉर्नो आहे; जो ९,५६० फूट (२,९१४ मी.) उंच आहे.

कॉकेशस पर्वतशृंखला : ही आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेली आहे. तसेच या रांगा अर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया व रशिया या देशांमध्ये पसरलेल्या आहेत. सर्वांत उंच माउंट एल्ब्रस १८,५०६ फूट (५,६०४२ मीटर) शिखर आहे. या श्रेणीचे दोन भाग पडतात. एक ग्रेटर कॉकेशस; तर दुसरा लेसर कॉकेशस पर्वत.

बाल्कन केजोलेन पर्वत : ही बल्गेरिया आणि सर्बिया यांच्या सीमेवरील आग्नेय युरोपमधील पर्वतश्रेणी आहे. त्यातील सर्वांत उंच बिंदू माउंट केबनेकाइस आहे; जो ६,९६५ फूट (२,१२३ मी.) आहे.

युरोप खंडातील नद्या

व्होल्गा ३,६०० किमी (२,२९० मैल) लांबी असलेली ही युरोपमधील सर्वांत लांब नदी आहे. या नदीनंतर डॅन्युब नदी, जी २,८५७ किमी (१,७८० मैल) लांब आहे, ती युरोपमधील दुसरी सर्वांत लांब नदी म्हणून ओळखली जाते. युरोप आणि रशिया या दोन देशांच्या सीमेवरून वाहणारी उरल नदी २,४२८ किमी (१,५०९ मैल) लांबीची आहे आणि तिचा उगम उरल पर्वतरांगेतून होतो. युरोप खंडातील इतर नद्यांमध्ये नीपर नदी (२,२०० किमी), डॉन नदी (१,९५० किमी), पेचोरा नदी (१,८०९ किमी) यांचा समावेश होतो.

युरोप खंडातील सरोवरे

युरोपमध्ये असलेल्या फिनलंड देशाला सरोवरांचा देश, असे संबोधले जाते. कारण- या देशात हजारो सरोवरे आहेत. १७,७०० चौ.किमी क्षेत्रफळ असलेले लाडोगा सरोवर हे युरोपमधील सर्वांत मोठे सरोवर आहे. हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे; जे ८३ किमी रुंद, ५१ मीटर खोल, ८३७ किमी³ आकारमान आणि समुद्रसपाटीपासून पाच मीटर उंच आहे. त्यामध्ये ६६० बेटे आहेत. हे सरोवर युरोप खंडातील रशिया देशात आहे. रशियामध्ये लेक ओनेगा/ओनेगो ९,८९४ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले युरोपमधील दुसरे सर्वांत मोठे सरोवर आहे. हे ९० किमी रुंद, २४५ किमी लांब आणि २८० किमी³ आकारमान असलेले सरोवर आहे. त्यात लहान लहान अशी सुमारे १,६५० बेटे आहेत. वॉनेरन (Vänern) सरोवर हे स्वीडनमध्ये असून, ते ५,६५५ चौ.किमीचे आहे. या सरोवरावर गुलाबी सूर्योदय होतो. फिनलंडमध्ये स्थित सायमा हे सरोवर ४,३७७ चौ.कि.मी क्षेत्रात वसलेले आहे.

युरोपमधील बेटे (Islands)

ग्रेट ब्रिटन हे २०९,३३१ वर्ग किमीचे हे बेट आहे. अटलांटिक महासागरात आइसलँड १,०३,००० चौरस किमी क्षेत्रफळ असलेले हे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागरात आयर्लंड, सेव्हर्नी ही बेटे; तर आर्क्टिक महासागरात स्पिटसबर्गन, युझनी (३३,२७५ चौ.किमी) ही बेटे आहेत. तसेच उत्तरेकडील आर्क्टिक महासागरात व्हाइगाच, नॉव्हाया झीमल्या, कॉलगूयफ, स्वालबार ही बेटे, दक्षिणेकडील भूमध्य समुद्रात इजियन, क्रीट, आयोनियन, सिसिली, सार्डिनिया, कॉर्सिका व बॅलिॲरिक ही बेटे, पश्चिमेकडील अटलांटिक महासागरात ब्रिटिश बेटे, शेटलंड, ऑर्कनी, आउटर हेब्रिडीझ, फेअरो, लोफोतेन बेटे व बाल्टिक समुद्रात आव्हेनान्मा, सारेमा, हीऊमा, गॉटलंड, ओलांद, बॉर्नहॉल्म, झीलंड, फ्यून, फाल्स्टर, लॉलान, ऱ्यूगन इ. बेटांचा समावेश युरोप खंडात करण्यात येतो.

युरोपमधील पठार आणि मैदाने

मासिफ सेंट्रल रशियातील मैदान आहे. ग्रेट हंगेरियन मैदान दक्षिण-पूर्व युरोपमध्ये स्थित आहे. समुद्रसपाटीपासून ते सरासरी फक्त १०० मीटर उंचीवर आहे. उत्तर युरोपीय मैदान आल्प्सपासून उत्तर-ईशान्य दिशेला बाल्टिक समुद्रापर्यंत आणि डेन्मार्क, दक्षिण फिनलंड, नॉर्वे व स्वीडनपर्यंत पसरलेले आहे. ते रशियन फेडरेशनमध्ये पूर्वेस जवळजवळ ४,००० किमी आहे.