सागर भस्मे

अतिउष्ण लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात. भूपृष्ठावर किंवा भूकवचात लाव्हारस थंड होऊन हे खडक निर्माण होतात. ते पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्याने त्यांना प्राथमिक खडक, असेही म्हणतात. या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक नैसर्गिक प्रक्रियेमुळे निर्माण होत असल्याने खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर या खडकांचे गुणधर्म अवलंबून असतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका, अॕल्युमिनियम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे आढळतात. लाव्हारस थंड व घट्ट होणाऱ्या स्थानावरून या खडकांचे पुढील प्रकार पडतात :

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
thief stole 50 crore gold toilet
बापरे, तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची झाली चोरी! किंमत बघून व्हाल अवाक! जाणून घ्या नेमके प्रकरण

बर्हिनिर्मित खडक

भूपृष्ठाकडे येणारा शिलारस भूपृष्ठावर साचतो आणि तेथे तो कालांतराने थंड होऊन त्याचे कठीण अशा खडकांत रूपांतर होते. अशा खडकांना ‘बर्हिनिर्मित अग्निजन्य खडक’ किंवा ‘ज्वालामुखी खडक’, असे म्हणतात. बेसॉल्ट खडक या प्रकारच्या खडकाचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने बेसाल्ट खडकांनी तयार झाले आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : युरोप खंडातील पर्वतश्रेणी आणि पठारे

आंतरनिर्मित खडक

जेव्हा शिलारस भूकवचातच थंड होतो, तेव्हा त्यास आंतरनिर्मित खडक म्हणतात. या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिकीकरणाची क्रियाही सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात. त्यांचे खोलीनुसार दोन प्रकार होतात, पातालिक खडक, अंतर्वेशी खडक. शिलारस जेव्हा भूपृष्ठापासून बऱ्याच खोलीवर थंड होतो; त्यास पातालिक खडक म्हणतात. जास्त खोलीवर असल्याने ते सावकाश थंड होतात. त्यामुळे त्यांच्यात मोठ्या आकाराचे स्फटिक तयार होतात. शिलारस काही वेळा भूकवचातील खडकातून मार्ग काढताना मध्यम खोलीवरच थंड होतो. अशा खडकांना ‘उपपातालिक खडक’ म्हणतात. शिलारस खडकांतील जोडातून भ्रंश पातळीवरून किंवा निरनिराळ्या खडक थरांच्या सीमांवरून पसरतो आणि त्यास थंड झाल्यावर निरनिराळे आकार प्राप्त होतात. त्यांना अंतर्वेशी रूपे (Intrusive forms) म्हणतात. ती रूपे पुढीलप्रमाणे :

भित्ती खडक (Dyke)

हे एक अंतर्वेशी रूप असून, त्याची रचना भिंतीसारखी असते. असे भित्ती खडक काही किमी अंतरापर्यंत विस्तारू शकतात. मात्र, त्यांची जाडी काही सेंमीपासून ते काही दशक मीटरपर्यंत असते.

शिलापट्ट (Sill)

भूकवचातील खडकांच्या थरादरम्यान शिलारस आडव्या दिशेने पसरून, त्या स्थितीतच थंड होऊन हे अंतर्वेशी रूप तयार होते. शिलापट्ट अनेक चौरस किमीपर्यंत विस्तारलेले असतात.

लॅकोलिथ (Lacolith)

याच्या अंतर्वेशी रूपाचा विस्तार सीमित असतो. त्याचा तळाकडील भाग क्षितिजाशी समांतर असतो; तर माथ्याकडील भाग काहीसा फुगीर-बहिर्वक्र असतो. बहुतेक ‘लॅकोलिथ’च्या तळाकडे पुरवठा नलिका असते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अमेरिका खंडातील पठारे

लोपोलिथ (Lopolith)

याचा आकार नरसाळ्यासारखा असून, त्यातील थर खाली वाकवले जाऊन त्यांना द्रोणासारखा आकार प्राप्त झालेला असतो. या थरास अनुसरून, तसे शिलारसांचे अंतर्वेशन होऊन ‘लोपोलिथ’ तयार झालेले असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटातील डलूथ येथे गॅब्रोचे लोपोलिथ आहेत.

अग्निज शिरा (Agneal vein)

लांब, अरुंद व लहानशा भेगांत शिलारस थंड होऊन तयार झालेल्या आकारास ‘अग्निज शिरा’ म्हणतात. त्यांचा आकार सामान्यतः अनियमित असतो आणि त्यांना फाटे फुटलेले असतात. निसर्गात ‘अग्निज शिरा’
विपुल प्रमाणात आढळतात.

ज्वालामुखी नळ (Volcanic Pipe)

केंद्रीय ज्वालामुखी जागृत असताना त्याला जिच्या वाटे शिलारसाचा पुरवठा होतो. पण, तो मृत होऊन क्षरणाने नाहीसा झाला आणि त्याच्या तळाखालचे खडक उघडे पडतात. त्या वाहिनीत राहिलेली उभ्या मुसळासारखी राशी दृष्टीस पडते. तिला ‘ज्वालामुखी नळ’ म्हणतात.

बॅथोलिथ (Batholith)

मोठ्या प्रमाणात शिलारस थंड होऊन तयार झालेले हे एक महाकाय पातालिक अंतर्वेशी रूप असून, याचा विस्तार शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतो. त्यात बहुधा ग्रॅनाईट किंवा गॅब्रो प्रकारचा खडक असतो.