UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) सरस्वती- घग्गर संस्कृती

प्राचीन सरस्वती नदी आणि तिच्या काठावरची संस्कृती या विषयाला अनेक राजकीय रंग आहेत. असे असले तरी तब्बल २८ हजार वर्षांपूर्वी ही नदी अस्तित्त्वात होती हे निर्विवाद सत्य आहे, तसे शास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. ही या संस्कृतीचे पुरावे आता झपाट्याने नष्ट होत आहे. आपण ज्या गौरवशाली भूतकाळाचा उल्लेख करत आहोत, तो वारसा कायमस्वरूपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Arthur Cotton
भूगोलाचा इतिहास: सीमातीत भाग्यविधाता..
Autobiography of Ajay Bisaria Ambassador of India to Pakistan History of India Pakistan Relations
भारतीयाने इस्लामाबादेतून पाहिलेला भारत..
Nirmala Sitharaman
“मी दक्षिण भारतीय असून…”, सॅम पित्रोदांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निर्मला सीतारमण यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “वर्णद्वेषी…”
International dance day history
यूपीएससी सूत्र : राजस्थानात सापडलेली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत अन् भारतीय नृत्यकलेचे बदललेले स्वरूप, वाचा सविस्तर…
Harappan industrial settlement discovered in Rajasthan
विश्लेषण: राजस्थानात सापडली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत; पुरावे काय सांगतात?
russia grain diplomacy
यूपीएससी सूत्र : रशियाची ‘अन्नधान्य डिप्लोमसी’ अन् भारताच्या कृषी निर्यातीत झालेली घट, वाचा सविस्तर…
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास आणि कला व संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही संस्कृती नेमकी काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

सरस्वती नदीचा उगम हिमालयात झाला. पश्चिमेला सिंधू नदी आणि पूर्वेला गंगा नदी यांच्या दरम्यान पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधून ती वाहत होती. याच नदीच्या तीरावर प्राचीन भारतीय संस्कृतींचा उगम झाला. सरस्वती नदी ही अनेकार्थाने गूढरम्य ठरलेली आहे. गेल्या दोन शतकांहून अधिक कालखंडासाठी सरस्वती नदीच्या सभोवतालच्या रहस्यांचा उलगडा करण्यात अभ्यासक गुंतलेले आहेत. सरस्वती नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या ओळखून त्या अनुषंगाने नदी काठावरच्या या प्राचीन संस्कृतीचा उलगडा करणारे पुरावे गोळा करणे हे विद्वानांचे प्राथमिक उद्दिष्ट होते.

१९४०-१९५० च्या दशकात झालेल्या पुरातत्त्वीय, वैज्ञानिक आणि भूरचनाशास्त्रीय संशोधनातून सरस्वती नदीचे महत्त्व प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. सरस्वती नदीचे ऋग्वेद आणि महाभारतात एक सर्वात शक्तिशाली नदी म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे. सरस्वती नदी २८००० वर्षांपूर्वी गढवालमधील बन्दरपूँछ येथे उगम पावली, ती आदि बद्रीच्या पुढे वाहत गेली. पुढे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून मार्गक्रमण करत गुजरातमधील खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळाली. इसवी सनपूर्व ३००० ते २००० (सुमारे ४००० वर्षांपूर्वी) या कालखंडा दरम्यान नदीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली असे मानले जाते. सुमारे इसवी सनपूर्व १८०० पर्यंत नदी पूर्णपणे कोरडी झाली होती.

मूलतः प्राचीन सरस्वती नदीने पश्चिमेकडील सिंधू नदी आणि पूर्वेकडील गंगा नदी यांच्यामध्ये एक प्रमुख नदी म्हणून काम केले. आज सरस्वती नदीचे अवशेष घग्गर- हाकरा नदीद्वारे दर्शविले जातात, जी हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तर-पश्चिम भागात पूर्वीच्या पॅलिओचॅनेलच्या बाजूने वाहते आणि पाकिस्तानच्या बहावलपूर प्रदेशात पसरते. सरस्वती नदी कोरडी झाल्यानंतर हजारो वर्षांनी २१ व्या शतकात तिच्या अस्तित्त्वाचे पुरावे शोधले जात आहेत, तिच्या पुनरुज्जीवनात रस निर्माण झाला आहे.

अनेक राज्य सरकारे आणि संस्था प्राचीन सरस्वती नदीप्रणालीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु खेदाची गोष्ट अशी की, या नदीकाठच्या नामशेष होणाऱ्या पुरातत्त्वीय स्थळांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या ऐतिहासिक परंपरेचा भाग असलेला पुरातत्त्वीय वारसा झपाट्याने लोप पावत आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान नदीला पुन्हा जिवंत करू शकत असले तरी, आपण ज्या गौरवशाली भूतकाळाचा उल्लेख करत आहोत तो कायमचा नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज

चीनने पाकिस्तानच्या नौदलाला ‘पीएनएस रिझवान’ ही पहिली हेरगिरीनौका भेट दिली आहे. त्यामुळे चीनच्या या खेळीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पीएनएस रिझवान पाकिस्तानी नौदलात दाखल झालेली असली तरी तिची धुरा मात्र चिनी नौदलाकडेच आहे. पीएनएस रिझवान ही भारतीय नौदलाच्या आयएनएस ध्रुवपेक्षा आकाराने लहान असली तरी या हेरगिरीनौकेच्या निमित्ताने पाकिस्तानचा समावेश आता फ्रान्स, अमेरिका, यूके, रशिया, चीन आणि भारतासारख्या संशोधन व हेरगिरी करणाऱ्या नौका बाळगणाऱ्या देशांच्या यादीत झाला आहे. लोकप्रिय ओपन-सोर्स इंटेलिजन्स तज्ज्ञ डॅमियन सायमन यांनी या पाकिस्तानच्या या हेरगिरी नौकेसंदर्भातील पहिली प्रतिमा जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

जून २०२३ मध्ये ही हेरगिरीनौका चीनमधून पाकिस्तानला आणण्यात आली. ही नौका पाकिस्तानी नौदलात दाखल करून घेण्याचा कार्यक्रमही औपचारिकरित्या पार पडला नाही. हे सारे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गुपचूप उरकण्यात आले.

पाकिस्तानच्या नौदलात पीएनएस रिझवानचा अलीकडेच करण्यात आलेला समावेश हा भारतासमोर सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करू शकतो, असे मत अनेक तज्ज्ञ सांगतात. भारताच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय किनारपट्टीजवळ ते तैनात केले जाऊ शकते. शिवाय हिंदी महासागर क्षेत्रामध्ये चीनच्या चालू असलेल्या गोपनीय माहिती संकलनाला चालना देण्यासाठीही रिझवानचा वापर करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या या हेरगिरीनौकेकडे आण्विक आंतरखंडिय क्षेपणास्त्राचा माग काढण्याची व परिसरातील क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…