UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

पुढील विधानांची सत्यता तपासून योग्य नसलेले विधान निवडा.

१) कोलकाता बंदर हुगळी नदीवर स्थित आहे.

२) कोलकाता बंदराला ‘भारताचे पूर्वेचे गेटवे’ असे म्हणतात.

३) कोलकाता बंदर जूट उद्योगाचे जगातील सर्वात महत्वाचे केंद्र आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य.

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) सेतुसमुद्रम अॅडम्स ब्रिज म्हणूनही ओळखला जातो.

२) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) असे मत व्यक्त केले आहे की, ही मानवनिर्मित रचना नसून ती कोरल, वाळू आणि सागरी खडकांनी तयार केलेली नैसर्गिकरित्या घडणारी रचना आहे.

३) चिदंबरम बंदर हे भारताचा तमिळनाडू राज्यात पश्चीम किनारपट्टीला स्थित आहे.

पर्यायी उत्तरे :

१) १ आणि २

२) २ आणि ३

३) १ आणि ३

४) १, २ आणि ३

प्रश्न क्र. ३

काही दिवसांपूर्वीच स्कारबोरो शोल, आयुंगीन शोल आणि स्प्रेटली बेट चर्चेत होते. ही बेटे कुठे वसलेली आहेत?

(a) लॅब्राडोर समुद्र

(b) प्रवाळ समुद्र

(c) दक्षिण चीन समुद्र

(d) भूमध्य समुद्र

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी योग्य नसलेले विधान निवडा.

१) कंडला बंदर दीनदयाल पोर्ट म्हणून ओळखले जाते.

२) मार्मागाव बंदर गोवा राज्यात आहे.

३) नवीन मंगलोर हे बंदर केरळ मध्ये आहे.

४) कोची हे बंदर केरळ मध्ये आहे.

प्रश्न क्र. ५

पुढील विधाने विचारात घ्या :

१) १९४७ मध्ये देशाच्या विभाजन केल्यामुळे पाकिस्तानला कराची हे बंदर सुपूर्द करण्यात आले.

२) कंडला बंदर १९५१ मध्ये बांधण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१) विधान १ आणि विधान २ योग्य असून, विधान २ हे विधान १ चा परीणाम आहे.

२) विधान १ आणि विधान २ योग्य असून, विधान २ हे विधान १ चा परीणाम नाही.

३) विधान १ योग्य आणि विधान २ अयोग्य

४) विधान १ अयोग्य आणि विधान २ योग्य

प्रश्न क्र. ६

खालील किती जोड्या योग्य आहेत :

वन्यजीव अभयारण्यस्थान
देबीगढबिहार
गुंडला ब्रह्मेश्वरमपश्चिम बंगाल
चिन्नरकर्नाटक

पर्यायी उत्तरे :

१) फक्त एक

२) फक्त दोन

३) तिन्ही

४) एकही नाही.

प्रश्न क्र. ७

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?

१) भारताच्या परराष्ट्र व्यापाराच्या आकारमानाच्या सुमारे ९० टक्के व्यापार समुद्राद्वारे होतो.

२) भारताच्या परराष्ट्र व्यापाराच्या मूल्याच्या बाबतीत ७७ टक्के व्यापार समुद्राद्वारे होतो.

३) जगातील सर्वात मोठी मालवाहू असलेल्या देशांमध्ये भारत १७व्या क्रमांकावर आहे.

४) वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहेत.

प्रश्न क्र. ८

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?

१) कोस्टल शिपिंग म्हणजे देशातील एका बंदरातून दुसऱ्या बंदरात माल आणि प्रवाशांची वाहतूक असते.

२) भारतात १३ प्रमुख आणि २०० मध्यम आणि लहान बंदर आहेत.

३) मुख्य पोर्ट्स संबंधीत राज्य सरकारच्या देखरेखीखाली आहेत.

४) २६ मे १९८९ रोजी सुरू करण्यात आलेल्या जेएनपीटी या बंदराला न्हावा शेवा बंदर म्हणून ओळखले जाते.

प्रश्न क्र. ९

‘कवच’ प्रणाली संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा :

अ) ‘कवच’ ही एक स्वयंचलित स्वदेशी ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे, जी भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केली आहे.

ब) कवचचा प्रारंभिक विकास २०१२ मध्ये Train Collision Avoidance System (TCAS) या नावाने सुरू झाला.

क) जर एखादी रेल्वे चुकून सिग्नल तोडून पुढे निघाली, तर त्याच मार्गावरील इतर रेल्वे पाच किमी अंतरावर आपोआपच थांबविल्या जातात. म्हणून या यंत्रणेला ‘कवच’ असे नाव देण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त ब

४) वरील सर्व

प्रश्न क्र. १०

भारतीय गेंड्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ) भारतीय गेंडाचा समावेश IUCN च्या रेड लिस्टमध्ये करण्यात आला आहे.

ब) भारतीय गेंडे फक्त ईशान्य भारतात आढळतात

क) गेंड्याच्या शिंगाचा वापर पारंपारिक चीनी औषधांमध्ये केला जातो.

ड) गेल्या दशकभरात भारतीय गेंड्यांची संख्या कमी झाली आहे.

वरील विधानांपैकी किती विधाने योग्य आहेत?

१) फक्त एक

२) फक्त दोन

३) फक्त तीन

४) चारही

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ – १
प्रश्न क्र. ३ – ३
प्रश्न क्र. ४ – ३
प्रश्न क्र. ५ – १
प्रश्न क्र. ६ – ४
प्रश्न क्र. ७ – ४
प्रश्न क्र. ८ – ३
प्रश्न क्र. ९ – ४
प्रश्न क्र. १० -२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.