UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

खालील विधानांची लक्षपूर्वक वाचन करून त्यातील अयोग्य नसलेले विधान किंवा विधाने निवडा.

lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
Raju Shetty, hatkanangale lok sabha seat, Confident of Victory, public donation of money, lok sabha 2024, election 2024, swabhimani shetkari sanghatna, criticise maha vikas aghadi,
सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली; एक व्होट व एक नोट प्रमाणे लोकवर्गणीला प्रतिसाद – राजू शेट्टी
lokmanas
लोकमानस: पंतप्रधान ‘या’ प्रश्नांची उत्तरे देतील?
rashmi barve
रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय आहे? उमेदवाराची जातवैधता छाननी प्रक्रिया कशी असते?

१) भारतीय द्वीपकल्प हा पूर्वीच्या अंगारा भूमीचा भाग होता.

२) भारतीय द्वीपकल्प सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पूर्वेकडे सरकून सध्याच्या उत्तर पूर्व गोलार्धात झाला.

३) इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट व युरेशियन प्लेट या दोघांमध्ये असणाऱ्या भू-सिंकलाईनचे नाव टेथिस समुद्र असे होते.

४) इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट नैऋत्य कडे संवर्धन प्रवाहामुळे वाहत जाऊन युरेशियन प्लेटला धडकले व हिमालयाची निर्मिती झाली.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त १ व २

३) फक्त २ व ३

४) फक्त ३ व ४

प्रश्न क्र. २

पुढीलपैकी भारताचे भौगोलिक स्थान विषयी योग्य विधान निवडा.

१) भारत उत्तर पूर्व गोलार्धात आशियाच्या मध्यभागी वसलेला आहे.

२) भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व रेखांश ते ९७°२५’ पूर्व रेखांश आहे.

३) भारताचा रेखावृत्तीय विस्तार ८°४’ उत्तर अक्षांश ते ३७°६’ उत्तर अक्षांश आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहे

प्रश्न क्र. ३

ओझोन अवक्षय घडविणाऱ्या क्लोरोप-लुरो कार्बनचा वापर कशासाठी होतो?

अ) प्लास्टिक फोम उत्पादन

ब) ट्यूबलेस टायर उत्पादन

क) काही इलेक्ट्रॉनिक्स भाग स्वच्छ करण्यासाठी

ड) एअरोसोल कॅन्समध्ये प्रेशरायिझग एजंट म्हणून

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा

पर्यायी उत्तरे :

अ) अ आणि क

ब) फक्त ब

क) अ, क आणि ड

ड) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ४

भारत हा रामसर कराराचा सदस्य आहे. भारताने अनेक प्रदेश रामसर यादीत समाविष्ट केलेले आहेत. या प्रदेशांच्या योग्य देखरेखीसंदर्भात खालीलपैकी सर्वात योग्य विधान कोणते?

पर्यायी उत्तरे :

अ) रामसर क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणे.

ब) परिस्थितिकीय दृष्टिकोनातून या क्षेत्रांचे संवर्धन करणे व केवळ पर्यटन आणि पुनर्निर्माणास परवानगी

क) काही काळाकरिता प्रत्येक रामसर क्षेत्राचे विशिष्ट निकषांच्या आधारे विशिष्ट काळासाठी परिस्थितिकीय दृष्टिकोनातून संवर्धन करणे आणि भावी पिढीला त्याचा शाश्वत वापर करू देणे.

ड) परिस्थितीकीय दृष्टिकोनातून सर्व रामसर क्षेत्रांचे संवर्धन आणि त्याचबरोरबर त्यांचा शाश्वत वापर.

पर्यायी उत्तरे :

अ) अ,ब आणि क

ब) ब आणि क

क) क आणि ड

ड) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ५

चित्ता या प्राण्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे?

अ) १९५२ मध्ये भारतात चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात आला.

ब) चित्ता हा प्राणी शुष्क प्रदेशिय परिसंस्थामध्ये आदिवास करणारा प्राणी आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ विधान बरोबर

२) ब विधान बरोबर

३) अ व ब विधान बरोबर

४) अ व ब विधान चूक

प्रश्न क्र. ६

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठ्या आकाराचा देशांतर्गत खाऱ्या पाण्याचा दलदलीय प्रदेश (Inland saline wetland) आहे?

पर्यायी उत्तरे :

अ) हरियाणा

ब) गुजरात

क) मध्यप्रदेश

ड) स्पष्टीकरण प्रदेश

प्रश्न क्र. ७

संरक्षित क्षेत्रांच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात स्थानिक लोकांना जैववस्तुमान गोळा करण्यास व वापरण्यास परवानगी नसते?

पर्यायी उत्तरे :

अ)वन्यजीव अभयारण्ये

ब) राष्ट्रीय उद्याने

क) जीवावरण राखीव क्षेत्र

ड) रामसर यादीमध्ये समाविष्ट दलदलीय प्रदेश

प्रश्न क्र. ८

खालील विधानांचा लक्षपूर्वक अभ्यास करा.

१) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अध्यक्ष सर टी. हॉलंड यांनी देशातील खडक प्रणालींचे खालील चार प्रमुख विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे.

२) भारताला तीन प्रदेशांमध्ये विभागले जाते एक हिमालय आणि त्यांच्याशी संबंधित पर्वतांचा समूह, दुसरे, इंडो-गंगा मैदान आणि तिसरे, द्वीपकल्पीय पठार.

योग्य विधाने निवडा.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्हीं नाही

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणता पुराण खडक प्रणालीचा भाग नाही?

१) कडप्पा प्रणाली

२) धारवार प्रणाली

३) विंध्य प्रणाली

४) वरीलपैकी सर्वच

प्रश्न क्र. १०

पुढील विधानापैकी अयोग्य असलेले विधान निवडा.

१) उत्तर अमेरिकेत एकुण २३ स्वतंत्र देश आहेत.

२) उत्तर अमेरिका खंडातील लेख सुपेरिअर हा सर्वात मोठा सरोवर आहे.

३) युएसए हा उत्तर अमेरिकी खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे.

४) उत्तर अमेरिका खंडाची लोकसंख्या जगाच्या ७.५% आहे.

प्रश्न क्र. ११

अमेरिका खंडासंबंधी काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी योग्य विधान निवडा.

१) उत्तर अमेरिकेतील कारक्रॉस वाळवंट हे जगातील सर्वात लहान वाळवंट मानले जाते.

२) मोजावे वाळवंट हे उत्तर अमेरिकेतील सर्वात कोरडे वाळवंट आहे.

३) ऍरिझोनामधील ग्रँड कॅनियन हे नदीने तयार केलेले जगातील सर्वात मोठे नदीभुरूप आहे.

४) वरील सर्व विधाने योग्य आहेत.

वरील प्रश्नांची उत्तरे

प्रश्न क्र. १ -४
प्रश्न क्र. २ -२
प्रश्न क्र. ३ -३
प्रश्न क्र. ४ -४
प्रश्न क्र. ५ -२
प्रश्न क्र. ६- २
प्रश्न क्र. ७ -२
प्रश्न क्र. ८-३
प्रश्न क्र. ९ -२
प्रश्न क्र. १० -३
प्रश्न क्र. ११ – ४