पंकज व्हट्टे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कला आणि संस्कृती हा महत्त्वाचा घटक आहे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये कला आणि संस्कृती म्हणजे नेमके काय हे स्पष्ट केले आहे. सामान्य अध्ययन-१ च्या अभ्यासक्रमामध्ये कलाप्रकार, वास्तुकला आणि साहित्य यांचा समावेश केला आहे.

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

या घटकांचा आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. कला प्रकारांमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य आणि शिल्पकला या कलाप्रकारांचा समावेश होतो. कलाप्रकार म्हणून चित्रकलेची मुळे अश्मयुगापर्यंत शोधता येतात. मध्यपाषाणयुगीन चित्रे भीमबेटका येथील गुहांमध्ये आढळतात. यामध्ये रेखाचित्रे, संपूर्ण चित्रे, अमूर्त चित्रे यांचा समावेश होतो. जावरा चित्र हे प्रसिद्ध मध्यपाषाणयुगीन अमूर्त चित्र आहे. विद्यार्थ्यांनी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या विविध चित्रकला शैलींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. या अभ्यासामध्ये चित्रांची विषयवस्तू, त्यांची वैशिष्टय़े आणि प्रसिद्ध चित्रकार यांचा समावेश असावा. गुहा चित्रकला (२०१७), भित्तीचित्रे (२०१३), किशनगढ चित्रकला शैली (२०१८) आणि मुघल चित्रपुस्तके (अ’ु४े) आणि व्यक्ती चित्रकला (ढ३१ं्र३) (२०१९) या घटकांवर पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत.

प्राचीन काळापासून भारतात संगीत आणि नृत्य या दृश्यकलांची (ढी१ऋ१्रेल्लॠ अ१३२) परंपरा अस्तित्वात आहे. या कलांचे लोकपरंपरा आणि शास्त्रीय परंपरा हे प्रमुख प्रकार मानले जातात. बहुतांशवेळा लोकपरंपरेमधूनच शास्त्रीय प्रकाराचा उदय होतो. भरतमुनी यांच्या नाटय़शास्त्र या प्राचीन ग्रंथामध्ये या कला प्रकारांची सविस्तरपणे माहिती दिली आहे. अभिनय दर्पण, संगम साहित्य, सिलपद्दीकरम, संगीत रत्नाकर आणि संगीत सुधाकर आणि नाटय़शास्त्र हे ग्रंथ शास्त्रीय कलेचा आधार आहेत. या कलाप्रकारांची मूलभूत आणि तांत्रिक माहिती विद्यार्थ्यांनी करून घायला हवी.   

भारतीय शास्त्रीय संगीताचे दोन प्रमुख प्रकार-हिंदुस्तानी संगीत आणि कर्नाटकी संगीत-मानले जातात. या वर्गीकरणाचा सर्वप्रथम उल्लेख ‘संगीत सुधाकर’ या ग्रंथामध्ये आढळतो. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळय़ा शैलींमध्ये धृपद, धमार, खयाल, ठुमरी, तराना आणि गझल यांचा समावेश होतो. याचप्रकारे कर्नाटकी शास्त्रीय संगीतामध्ये गीतम, सुलाडी, स्वरजाती, जातीस्वरम, वर्णम, कीर्तनम, तील्लना, पल्लवी इत्यादी शैली प्रकारांचा समावेश होतो. या सर्व शैलींच्या महत्वाच्या वैशिष्टय़ांचा, घराण्यांचा आणि प्रसिद्ध गायक-संगीतकारांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २०१२ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये हिंदुस्तानी संगीताच्या धृपद शैलीवर तर २०१९ सालच्या पूर्व परीक्षेत धृपद शैलीमधील तानसेनच्या रचनांवर प्रश्न विचारला गेला होता. पुरंदरदास यांना ‘कर्नाटकी संगीताचे पितामह’ मानले जाते. या प्रकारचे महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी अभ्यासणे आवश्यक आहे.

नृत्य प्रकारांमध्ये मूलभूत संकल्पनांचा, शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य (अनुक्रमे मार्गी/शुद्ध आणि देशी) आणि प्रसिद्ध नर्तकांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. नृत्यविषयक प्राचीन साहित्यामध्ये नाटय़ (नाटक), नृत्त (शारीरिक हालचाली) आणि नृत्य (भाव) यांचा समुच्चय म्हणजे नृत्य असे वर्णन केले आहे. भारतीय शासनाने आठ नृत्य प्रकारांना (भरतनाटय़म, कथ्थक, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचीपुडी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया) शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांनी या नृत्यप्रकारांचा थोडक्यात इतिहास, महत्त्वाची वैशिष्टय़े आणि या नृत्य प्रकारांमधील प्रसिद्ध नर्तक यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१२ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये कुचीपुडी आणि भरतनाटय़म या नृत्य प्रकारांमधील फरकावर प्रश्न विचारला होता. २०१४ आणि २०१७ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रादेशिक लोकनृत्यांवर प्रश्न विचारला गेला होता.

मूर्ती बनविण्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालावरून शिल्प आणि धातूच्या मूर्ती असे दोन प्रकार मानले जातात. विद्यार्थ्यांनी मूर्तीचे धार्मिक आयाम, कलात्मक वैशिष्टय़े आणि शिल्पे आढळतात ती स्थळे यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१४ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रसिद्ध शिल्प आणि त्यांची स्थळे या घटकांवर प्रश्न विचारला होता. हा प्रश्न दगडी शिल्पांवर आधारलेला होता. नटराजाची प्रसिद्ध चोल शैलीतील मूर्ती हे धातूच्या मूर्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बहुतांश वेळा मूर्तीकला वास्तुकलेपासून वेगळी करता येत नाही, हे समजून घ्यायला हवे. भारतीय वास्तुकलेचा विकास गुहा शिल्पापासून कोरलेल्या मूर्ती ते भव्य वास्तूंपर्यंत झाला आहे. या वास्तूंच्या भिंतींवर कमालीचे गुंतागुंतीचे कोरीव नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. २०१३ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये कोरलेल्या गुहा शिल्पांबाबत दोन प्रश्न विचारले होते. तसेच मौर्य शासक अशोकाच्या शिलालेखांवरील उठावदार शिल्पकामांबाबत प्रश्न विचारला होता.

वास्तुकलेचा अभ्यास करताना विविध धार्मिक वास्तू जसे की स्तूप, विहार, चैत्य, मंदिरे आणि मशिदी, तसेच राजे-महाराजांनी उभारलेले किल्ले, वारसास्थळे, शहरे यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१४ सालच्या पूर्व परीक्षेत अकबरने फतेहपूर सिक्री येथे उभारलेल्या ‘इबादत खाना’ या प्रार्थनागृहाबाबत प्रश्न विचारला होता. २०१२ साली नागर शैली, द्रविड शैली आणि वेसर शैली या मंदिर उभारणीच्या शैलीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. २०१८ साली मध्ययुगीन वारसास्थळांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

साहित्याचा अभ्यास करताना भारतातील भाषांचा विकास कशा प्रकारे झाला हे जाणून घेणे आवश्यक आहे. संस्कृत, प्राकृत, पाली आणि तमिळ या प्राचीन भाषा आहेत. प्रादेशिक भाषांचा उदय प्राचीन काळाच्या उत्तर कालखंडामध्ये, आद्य मध्ययुगीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये झाला. २०१४ साली कन्नड आणि तेलुगु भाषांना केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, त्याबाबत प्रश्न विचारला होता. २०१६ आणि २०२० साली प्राचीन संस्कृत साहित्याबाबत प्रश्न विचारला होता. २०२१ साली लेखकांबाबत प्रश्न विचारला गेला.

विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकाचा अभ्यास करताना ग्रंथ, लेखक आणि ग्रंथाचा विषय यांचा तक्ता बनवून त्याची उजळणी करणे फायदेशीर ठरू शकते. हे साहित्य धार्मिक अथवा निधर्मी असू शकते. साहित्य, लेखक आणि ग्रंथाचा विषय विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. तसेच धार्मिक ग्रंथांमधील विचार आणि तत्वज्ञान याची माहिती असणे आवश्यक आहे. २०२२ साली जैन साहित्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. २०१३, २०१६, २०१९ साली बौद्ध संकल्पना आणि तत्वज्ञान या घटकांवर प्रश्न विचारला गेला होता. २०१३ आणि २०१४ साली हिंदू धर्मातील सहा सनातनी तत्वज्ञान शाखांवर प्रश्न विचारण्यात आला होता. 

अशारितीने, कलाप्रकार, वास्तुकला आणि साहित्य यांचा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा. काहीवेळा उत्सव आणि मार्शल आर्ट्स या घटकांवर देखील प्रश्न विचारले जातात. वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन केल्यास या घटकाची तयारी करता येईल. कारण, अशाप्रकारच्या प्रश्नांचा संबंध एक ते दीड वर्षांच्या चालू घडामोडींशी असतो.