या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठीचा नदी प्रणाली हा घटक समजून घेणार आहोत. नदी प्रणालीवर नियमितपणे पुढीलप्रमाणे प्रश्न विचारलेले आहेत. नद्यांचा अभ्यास करताना हिमालयीन नद्या (सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा) व द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा आणि कावेरी), पूर्वेकडे वा पश्चिमीकडे वाहणाऱ्या व उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या तसेच लांबीनुसार नद्यांचा क्रम अभ्यासायला हवा.

एखाद्या नदीचा अभ्यास करताना नदीचा उगम, विस्तार, तिच्या उपनद्या (उजवीकडील व डावीकडील), नदीचे खोरे, नदी ज्या राज्यातून वाहते ती राज्ये, नदीच्या काठावरील महत्त्वाची शहरे, त्या नदीवरील धरण (उदा. कृष्णा नदीवर असलेले अलमट्टी धरण), नदीशी संबंधित कालवा (उदा. गंगा नदीवरील २२४५ मी. लांबीचा फरक्का कालवा) इ. अभ्यासणे अपेक्षित आहे.

२०२४ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा :

● प्र. हिमालयातील नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रयागराजच्या गंगा नदीच्या प्रवाहात सामील झाल्याच्या संदर्भात, खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?

(अ) घाघरा — गोमती — गंडक — कोसी

(ब) गोमती — घाघरा — गंडक – कोसी

(क) घाघरा — गोमती — कोसी – गंडक

(ड) गोमती — घाघरा — कोसी – गंडक

वर सांगितल्याप्रमाणे या प्रश्नात नद्यांचा क्रम विचारला आहे. १९९७ मध्ये खाली दिलेल्या नकाशातील क्रमांकानुसार नद्या ओळखा असा प्रश्न विचारला होता

UPSC Preparation, River System, UPSC ,

१. कोसी २. गोमती ३. घाघरा ४. गंडक

नद्यांच्या दिशा व क्रमावर नियमितपणे (१९९७ ते २०२४) प्रश्न विचारल्याचे यावरून स्पष्ट होते.

● प्र. खालील माहिती विचारात घ्या:

UPSC Preparation, River System, UPSC ,

वरीलपैकी किती ओळींमध्ये दिलेली माहिती योग्यरित्या जुळली आहे?

(अ) फक्त एक (ब) फक्त दोन (क) तिन्ही (ड) काहीही नाही

धुंधर धबधबा भेडाघाट प्रदेशाचा असून नेत्रावतीच्या जागी शरावती नदी असणे अपेक्षित आहे.

२०२३ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा :

● प्र. खालील विधाने विचारात घ्या:

१. झेलम नदी वुलर सरोवरातून जाते.

२. कृष्णा नदी थेट कोल्लूर सरोवराला पाणी देते.

३. गंडक नदीच्या वळणामुळे कंवर सरोवर तयार झाले.

वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत/आहेत?

(अ) फक्त एक

(ब) फक्त दोन

(क) तिन्ही

(ड) काहीही नाही

उत्तर. (अ)

यातील वुलर सरोवराचा पाण्याचा मुख्य स्राोत झेलम नदी आहे. कोल्लेरू तलाव हा एक नैसर्गिक युट्रोफिक तलाव आहे, जो गोदावरी आणि कृष्णा या दोन प्रमुख नदी खोऱ्यांमध्ये स्थित आहे. बुडामेरू आणि तमलेरू या दोन हंगामी नद्या आणि अनेक नाले आणि कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो, जो दोन्ही नद्यांच्या डेल्टा दरम्यान नैसर्गिक पूर संतुलन जलाशय म्हणून काम करतो. स्थानिक भाषेत कंवर झील असे म्हणतात.

पूर्व घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांवर २०२१ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न बघा झ्र

● प्र. खालील नद्यांचा विचार करा.

१. ब्राह्मणी २. नागावली

३. सुवर्णरेखा ४. वंशधारा

वरीलपैकी कोणते पूर्व घाटातून उगम पावते?

(अ) १ आणि २ (ब) २ आणि ४ (क) ३ आणि ४ (ड) १ आणि ३

नागावली नदीचा उगम भारतीय ओडिशा राज्यातील कालाहांडी जिल्ह्यात १,३०० मीटर उंचीवर असलेल्या लखबहालजवळील पूर्व घाटात होतो. लांगुल्या हे नागावली नदीचे दुसरे नाव आहे. वंशधारा नदी ओडिशा राज्यातील पूर्व घाटात उगम पावते आणि भामिनी मंडळातील श्रीकाकुलम जिल्ह्यात प्रवेश करते आणि शेवटी कलिंगपट्टणमजवळ बंगालच्या उपसागरात येते.

ब्राह्मणी नदी, जी तिच्या वरच्या भागात दक्षिण कोएल म्हणून ओळखली जाते, ती झारखंडच्या रांची जिल्ह्यातील नागरी गावाजवळून सुमारे ६०० मीटर उंचीवर उगम पावते. सुबर्णरेखा नदी झारखंडच्या रांची जिल्ह्यातील नागरी गावाजवळील छोटानागपूर पठारात ६०० मीटर उंचीवर उगम पावते.

नदीद्वारा निर्माण होणाऱ्या भुरूपांवरही प्रश्न विचारले जातात. उदा. धबधबे, व्ही-आकाराच्या दऱ्या, इंटरलॉकिंग स्पर्स, गर्जेस, डेल्टा, कॅन्यन इ. २०२२ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न बघा :

● प्र. दक्षिण भारतातील गांदीकोटा कॅन्यन खालीलपैकी कोणत्या नदीने निर्माण केले आहे?

(अ) कावेरी (ब) मंजिरा (क) पेन्नार (ड) तुंगभद्रा

दक्षिण भारतातील गांदीकोटा कॅन्यन पेन्नार नदीने निर्माण केले आहे. भारतातील नद्यांचा जसा आपण अभ्यास करतो तसा आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या नद्या जसे नाईल, अमेझॉन, यांग्त्झे, मिसिसिपी-मिसुरी, मेकाँग, डॅन्यूब यांचाही अभ्यास अपेक्षित आहे. चालू घडामोडीतील नद्यांवर विशेष भर द्या.

केवळ वाचून नदीप्रणाली समजून घेणे गुंतागुंतीचे ठरू शकते. यासाठी अॅटलसद्वारे नद्यांचा अभ्यास करायला हवा. एनसीआरटीमधील नकाशेही इथे अभ्यासायला हवेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari@gmail. com