Vasai Virar City Municipal Corporation Recruitment 2025 : वसई-विरार महापालिकेत NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आरोग्य विभागातील ११० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याबाबतचे अधिकृत पत्रक पालिकेने जाहीर केले आहे. भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांमध्ये बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांचा समावेश आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना २८ मे ते ५ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा लागेल.
रिक्त जागा- ११०
रिक्त पदाचे नाव
या भरती प्रक्रियेद्वारे बालरोग तज्ज्ञ ०१, साथरोग तज्ज्ञ ०१, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी १३, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी २०, वैद्यकीय अधिकारी ३७, स्टाफ नर्स (स्त्री) ०८, स्टाफ नर्स (पुरुष) ०१, औषध निर्माता ०१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३ व बहुउद्देशीय आरोग्य सेवक २५ अशी रिक्त पदे भरती जातील.
शैक्षणिक पात्रता
यातील प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
१) बालरोग तज्ज्ञ – MD Paed/DCH/DNB
२) साथरोग तज्ज्ञ – MBBS/BDS/ AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health)
३) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी- MBBS पदवी
४) स्टाफ नर्स (स्त्री-पुरुष) – GNM/B.Sc. (Nursing)
५) औषध निर्माता – D.Pharm/B.Pharm
६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc., DMLT
7) बहुउद्देशीय आरोग्य सेवक- १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट
पदांनुसार वयाची अटदेखील वेगवेगळी आहे. बालरोग व साथरोग तज्ज्ञ, तसेच पूर्णवेळ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी या पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ७० वर्षांपर्यंत असावे. तर स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यात मागसवर्गीयांना पाच वर्षांची सूट आहे.
नोकरीचे ठिकाण : वसई – विरार
अर्ज शुल्क : नाही.
अर्जासंबंधी माहिती
१) उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२) त्यात बालरोग, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
३) तर इतर स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठीची निवड मूल्यांकनाधिष्ठित ‘मेरिट’ यादीवर आधारित केली जाईल. या पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी पत्ता
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, त मजला, यशवंत नगर, विरार.
मुलाखतीची तारीख
२८ मे ५ जून २०२५
पगार
प्रत्येक पदानुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रतिमहिना किमान १८ ते ७५ हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.