IDBI Bank Recruitment 2023 : बॅंकेत नोकरी करण्यासांठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. IDBI बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी इच्छुक उमेदवरांना मिळणार आहे. यासाठी आयडीबीआयकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या नोटिफिकेशननुसार ११४ पदांवर भरती काढण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवार या भरतीसाठी ३ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात.

हा भरती अभियान IDBI BANK मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरचे ११४ रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन/बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमबीए/एमसीए डिग्री किंवा यासंबंधीत अन्य ठिकाणी काम करण्याचा अनुभव असला पाहिजे.

Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
admission class 11, class 11,
अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही रखडली, आता दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या
tender process, Abhyudaya Nagar redevelopment,
मुंबई : अभ्युदयनगर पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया तूर्तास लांबणीवर, नियमानुसार ७५० चौ. फुटाचे घर देण्याची रहिवाशांची मागणी
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
If we want to end rape from the root we have to finish male power
पुरुषसत्तेला ‘फाशी’ द्या…
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?

नक्की वाचा – आता दूर होणार नोकरीचं टेन्शन? हे डिप्लोमा कोर्स करा, IT सेक्टरमध्ये नोकरी पक्की, पगारही मिळणार तगडा

नोटिफिकेशनुसार, या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवाराच्या पदानुसार कमीत कमी वय २५/२८/३५ वर्ष व जास्तीत जास्त वय ४०/४५ वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक योग्यता आणि अनुभवच्या आधारे करण्यात येईल. उमेदवारांना शॉर्टलिस्ट केल्यानंतर ग्रुप डिस्कशनसाठी बोलवण्यात येईल. निवड प्रकियादरम्यान, सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करावी लागतील. उमेदवारांकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरती अभियानाता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. या अभियानासाठी उमेदवारांना १००० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जावे लागेल. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२३ आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आयडीबीआय बॅंकच्या अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.