अर्जदारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अथवा नेव्हल आर्किटेक्चरमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील डायरेक्टोरेट जनरल ऑफ नेव्हल आर्मामेंटची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन, वेस्ट ब्लॉक- ५, विंग १ (एफएफ), आर. के. पूरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर १८ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट- फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंट्सच्या ७ जागा
अर्जदारांनी वाणिज्य विषयातील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा ‘एनपीसीएल’च्या http://www.upcil.nic.in या वेबसाइटवर career and Human Resource Management Opportunities  या  ठिकाणी भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), रिक्रुटमेंट सेक्शन, विजय भवन, रावतभाटा राजस्थान साइट, एनपीसीआयएल, पोस्ट ऑफिस अणुशक्ती, व्हाया कोटा, राजस्थान-३२३३०३ या पत्त्यावर २० नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रीसर्च, कालपक्कम येथे प्रशिक्षणार्थी कुशल कामगारांच्या १२ जागा
उमेदवारांनी शालान्त परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते आयटीआय पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रीसर्चची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://www.igcar.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० नोव्हेंबर २०१५ पर्यंत  पाठवावेत.

भारत हेवी इलेक्ट्रिकलमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या २४ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी जीएटीई २०१६ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील भारत हेवी इलेक्ट्रिकलची जाहिरात पाहावी अथवा ‘बीएचईएल’च्या  http://www.gateiisc.ernet अथवा  careers.bhel.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर २० नोव्हेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावेत.

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क् स ऑफ इंडिया, त्रिवेंद्रम येथे ‘टेक्निकल सपोर्ट स्टाफ’च्या ५ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची जाहिरात पाहावी अथवा http://www.tvpm.stpi.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

उत्तर-पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील उत्तर-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर पर्सोनेल ऑफिसर/ आरआरसी नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, सीसीएम अ‍ॅनेक्स बिल्डिंग, रेल्वे रोड नं. १४, गोरखपूर- २७३०१२ या पत्त्यावर
२३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटरच्या ३९५ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका अथवा बीएस्सी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा दिल्ली मेट्रोच्या http://www.delhimetrorail.com, career link या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज पाठवावेत.