News Flash

फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप

भारतीय संशोधक वा पीएच.डीधारक प्राध्यापकांना पुढील संशोधनासाठी या शिष्यवृत्ती देण्यात येतील.

युनायटेड स्टेटस् इंडिया एज्युकेशन फाऊंडेशन (युसीसेफ) द्वारा फुलब्राईट नेहरू शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत भारतीय विद्यार्थी व संशोधकांना अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधनपर कार्यासाठी खालीलप्रमाणे संधी
उपलब्ध आहेत-
फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप
या योजनेअंतर्गत अर्जदारांनी पदवी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्याजवळ नेतृत्त्व क्षमता- पात्रता असावी व त्यांनी अमेरिकन विद्यापीठ वा संशोधन संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी खालील विषयांमध्ये प्रवेश
घेतलेला असावा.
योजनेअंतर्गत समाविष्ट विषय- या संशोधनपर फेलोशिप योजनेअंतर्गत कला, संस्कृती विकास, पुरातत्त्व संवर्धन, पर्यावरण विज्ञान, संरक्षण, उच्च प्रशासन शिक्षण, आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वजनिक आरोग्य, शहरी व क्षेत्रीय नियोजन, महिला विकास इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
फुलब्राईट- नेहरू पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप
भारतीय संशोधक वा पीएच.डीधारक प्राध्यापकांना पुढील संशोधनासाठी या शिष्यवृत्ती देण्यात येतील.
या योजनेअंतर्गत उपलबध शिष्यवृत्तींची संख्या ८ असून या शिष्यवृत्तीचा कालावधी २४ महिन्यांचा असेल.

ह्युबर्ट एच. हंफ्री फेलोशिप्स
या फेलोशिप योजनेअंतर्गत अर्जदार धोरणनिश्चिती, नियोजन तज्ज्ञ, प्रशासन, खासगी सरकारी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, कृषी अथवा ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्यरत असणारे, आर्थिक विकास, शैक्षणिक क्षेत्र, योजना नियोजन, एचआयव्ही एड्स नियंत्रण, मानव संसाधन विकास, कायदा आणि मानवाधिकार संरक्षण, नैसर्गिक स्रोत विकास, पर्यावरण धोरण आणि वातावरणातील बदल, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य विकास, इंग्रजी भाषा शिक्षण, तंत्रज्ञानविषयक धोरण आणि अंमलबजावणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रादेशिक नियोजन यांसारख्या क्षेत्रातील अनुभवी व कार्यरत असावेत.
अधिक माहिती- युनायटेड ग्रेटस् इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशनच्या www.usief.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ जून २०१६ पर्यंत अर्ज करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 1:10 am

Web Title: fulbright nehru masters fellowships
Next Stories
1 शारीरिक शिक्षणविषयक अभ्यासक्रम
2 नोकरीची संधी
3 बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानीचे विशेष अभ्यासक्रम
Just Now!
X