31 May 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन

आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

प्रतिनिधिक छायाचित्र

विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा या तीनही परीक्षांसाठी  मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासाची रणनीती पाहिली. आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

*  अभ्यासक्रम – इंग्रजी हा विभाग अभ्यासाला घेताना सर्वप्रथम आपण आयोगाने नमूद केलेला अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये  Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases,  Comprehension of Passages  या घटकांचा समावेश होतो.

*  प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण –  इंग्रजीच्या अभ्यासाची सुरुवातसुद्धा प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रश्नांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालूनच करावी लागेल. यावरून आपल्याला कोणत्या उपघटकावर अधिक भर द्यावा लागेल, कोणत्या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागेल तसेच कोणत्या घटकांचे पाठांतर करावे लागेल याचा अंदाज काढता येतो. पेपर एकमध्ये इंग्रजी या विषयावर एकूण १०० पैकी ४० प्रश्न विचारले जातात.

*  व्याकरण (Grammar)

या विभागांतर्गत विचारले जाणारे प्रश्न फारसे अवघड नसतात; परंतु थोडेसे फिरवून विचारले जातात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रश्न लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक उत्तरे निवडली पाहिजेत. यामध्ये  Spotting Error, Fill in the blanks, Jumbled Sentences, Synonyms, Antonyms, Spellings/Detecting Mis-Spelt words, Sentence Improvement या घटकांवर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. Active and Passive Sentences, parts of speech  या घटकांवर देखील काही प्रश्न विचारले जातात.

Basic Grammar वर जर प्रभुत्व असेल तर या विभागातील प्रश्न सोडविणे फारसे कठीण जात नाही.  Sentence Formation च्या पद्धती, उत्तम Reading Ability व योग्य Vocabulary (शब्दसंग्रह) यांच्या माध्यमातून या घटकांवर प्रभुत्व मिळविता येऊ शकते.

त्याचबरोबर पुढील काही मूलभूत तंत्रे विकसित केल्यास परीक्षाभिमुख अभ्यास करणे नक्कीच सुकर होऊ शकते. यापैकी काही महत्त्वाच्या घटकांसाठी पुढे काही तंत्रे दिली आहेत त्यांचा उपयोग करावा.

*  Spotting Error and Sentence Improvement : या घटकावर साधारणपणे ४ ते ५ प्रश्न विचारले जातात. या मध्ये  Grammatical Error शोधायचा असतो. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे. बऱ्याच वेळा या टप्प्यावरच आपल्याला समजतो, परंतु वाक्य काळजीपूर्वक वाचूनही जर चूक सापडली नाही तर Subject-Verb Agreement योग्य आहे का ते पाहावे, यानंतरही तुम्ही उत्तराबाबत साशंक असाल तर वाक्याचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे अभ्यासून अंतिम उत्तर शोधावे.

*  Fill in the blanks, Sentence Structure : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे व पर्यायी उत्तरांमधून योग्य तो शब्द गाळलेल्या जागी बसविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी काही पर्याय  करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. परंतु अंतिम उत्तर निवडण्यापूर्वी रिकामी जागा भरून वाक्याला योग्य अर्थ प्राप्त होतो का आणि ते वाक्य वाचताना व्याकरणदृष्टय़ा योग्य आहे का ते पहावे.

* Synonyms and Antonyms: या घटकावर साधारणपणे २ ते ३ प्रश्न विचारले जातात. दररोज किमान १० नवे इंग्रजी शब्द आत्मसात करावेत आणि त्यांचा अर्थ समजून घेऊन वाक्यात उपयोग करावा. यासाठी काही, युक्त्या वापरता येऊ शकतील. पाठांतर आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर हा या घटकावर प्रभुत्व मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे.

*   Use of Idioms and Phrases : या घटकावर साधारणपणे ३ ते ५ प्रश्न विचारले जातात. यासाठी Idioms and Phrases चा एकत्र संग्रह करून त्यांचे पाठांतर आणि वाक्यात उपयोग करण्याचा भरपूर सराव करावा.

*  Active and Passive Sentences and Tenses: या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी Active Voice, Passive Voice यांची उदाहरणे त्यांचे परिवर्तन वाक्यांचे काळ परिवर्तन त्यासाठी असणारे मूलभूत व्याकरणाचे नियम अभ्यासून अधिकाधिक सराव केल्यास हा घटक नक्कीच उत्तम गुण प्राप्त करून देतो.

*   Parts of speech : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यामध्ये nouns, pronouns, adjectives, verbs, adverbs, prepositions, conjunctions and interjections या प्रमुख आठ  Parts of speech आणि त्यांच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात.

*   Comprehension of Passages

या विभागावर साधारणपणे ५ प्रश्न विचारले जातात. या विभागातील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकलनक्षमता सुधारली पाहिजे तसेच भरपूर वाचन आणि सराव यावर भर देणे अपेक्षित आहे.

एकूणच विद्यार्थी मित्रहो, या परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी भरपूर पाठांतर, योग्य तो परीक्षभिमुख सराव आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून तुम्ही अपेक्षित यश निश्चितच मिळवू शकता. या अभ्यासासाठी  ‘High School English Grammar and Composition’ हे  Wren and Martin यांचे पुस्तक वापरता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2017 2:27 am

Web Title: important guidance for mpsc exam preparation 2
Next Stories
1 नोकरीची संधी         
2 यूपीएससीची तयारी : शासनकारभार आणि सुशासन
3 केंद्र सरकारतर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
Just Now!
X