15 December 2017

News Flash

नोकरीची संधी

इंग्रजी व हिंदी या आवश्यक विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

द. वा. आंबुलकर | Updated: August 9, 2017 3:56 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

*   पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन, नागपूर येथे कनिष्ठ हिंदी भाषांतरकारांच्या ४ जागा-

अर्जदारांनी हिंदी वा इंग्रजीतील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांनी हिंदी व इंग्रजीसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी इंग्रजी व हिंदी या आवश्यक विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशनची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन ‘ए’ ब्लॉक, ५ वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१७.

*  इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी व कार्यालयीन साहाय्यकांच्या संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.ibps.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट.

*  नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊ येथे संशोधकांच्या ९ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nbri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, राणाप्रताप मार्ग, लखनऊ २२८००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०१७.

*  महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर येथे अकाऊंट्स असिस्टंटसाठी थेट मुलाखत-

अर्जदार बी.कॉम असावेत व त्यांना संगणकीय पद्धतीने अकाउंटसच्या कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूरची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०७१२- २७१२५५९ वर संपर्क साधावा

अथवा महामंडळाच्या www.mshcngp.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य

हातमाग महामंडळ, एमएसएचसी कॉम्प्लेक्स, उमरेड मार्ग, नागपूर- ४४०००९ या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी संपर्क- ११ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी १ वाजता.

*   रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे विधी सल्लागारांच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०१७

First Published on August 9, 2017 3:56 am

Web Title: indian government jobs jobs in india job vacancies in india
टॅग Jobs In India