मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आस्थापनेवर एकूण १३५ ‘स्वीय साहाय्यक’ पदांची भरती.  मुंबई (७३ पदे), नागपूर (२९ पदे), औरंगाबाद (३३ पदे)

पात्रता – कायदा विषयातील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी ८-१० वर्षांचा अनुभव.  इंग्रजी लघुलेखन वेग १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ५० श.प्र.मि. यांचे जीसीसी प्रमाणपत्र. संगणक कौशल्य प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी २१ ते ३८ व मागासवर्गीय २१ ते ४३ वष्रे.

शुल्क – रु. ३००/- ऑनलाइन अथवा चलनाद्वारे.

निवड पद्धती – शॉर्टहँड डिक्टेशन टेस्ट, टायिपग टेस्ट आणि मुलाखत.  ऑनलाइन अर्ज ९ जानेवारी २०१७ पर्यंत  खालील संकेतस्थळावर करावेत. <https://bhc.mahaonline.gov.in/&gt;

भारतीय नौसेना, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई मध्ये ‘चार्जमन’ – कन्स्ट्रक्शन (२४ पदे), मेंटेनन्स (१० पदे), प्रोडक्शन प्लॅिनग/कंट्रोलर (३२ पदे), इंजिनीअरिंग (३३ पदे), इलेक्ट्रिकल (१४ पदे), वेपन (८ पदे) च्या एकूण १२१ पदांची भरती.

पात्रता – फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयातील विज्ञान शाखेची पदवी किंवा संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदविका.

वयोमर्यादा – दि. १४ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे (अजा/अज – ३० वष्रे, इमाव – २८ वष्रे, विकलांग – ३५/३८/४० वष्रे)

निवड पद्धती – १०० गुणांची लेखी परीक्षा पदवी/पदविका अभ्यासक्रमावर आधारित.

ऑनलाइन अर्ज http://www.jobsuchi.com  वर दि. १४ जानेवारी २०१७ पर्यंत.

अ‍ॅकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोवेटिव्ह  रिसर्च (एसीएसआयआर), चेन्नईमार्फत नावाजलेल्या शास्त्रज्ञांसोबत दोन महिने (सीएसआयआर) समर ट्रेिनग करण्याची सुवर्णसंधी.

पात्रता – (१) अभियांत्रिकी पदवीच्या तिसऱ्या वर्षांत शिकणारे किंवा (२) एमएस्सी/ एमईच्या प्रथम वर्षांत शिकणारे किंवा (३) इंटिग्रेटेड एमएस्सी/एमईचे तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी. एकूण जागा – २० कालावधी – मे ते ऑगस्ट २०१७ दरम्यान दोन महिने. शिष्यवृत्ती – रु. २५,०००/- ऑनलाइन अर्ज <http://acsir.res.in/&gt; या संकेतस्थळावर दि. १३ जानेवारी २०१७ पर्यंत.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईमध्ये मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर/ऑफिसर ग्रेड-१/ज्युनियर ऑफिसर पदांची भरती.

(१) ऑफिसर ग्रेड-२ (५ पदे). पात्रता – पदव्युत्तर पदवी/एमबीए (फिनान्स/मार्केटिंग) ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा -२३ ते ३३ वष्रे. (२) ज्युनियर ऑफिसर (१३ पदे). कोणत्याही शाखेतील पदवी. वयोमर्यादा – २० ते ३० वष्रे. पदवी/पदव्युत्तर पदवीला किमान ५५% गुणांची अट.

ऑनलाइन अर्ज दि. ११ जानेवारी २०१७ पर्यंत पुढील संकेतस्थळावर करावेत. <https://www.mscbank.com/&gt;

विजया बँक, मुख्यालय बंगलोर (सार्वजनिक क्षेत्रातील बँक) मध्ये प्रोबेशनरी मॅनेजरच्या ४४ पदांची भरती.

पात्रता – (१) प्रोबेशनरी मॅनेजर सिक्युरिटी – पदवी ५ वर्षांचा अनुभव (मिलिटरी/पॅरामिलिटरी पोलीस दलातील)

(२) प्रोबेशनरी मॅनेजर राजभाषा -हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला इंग्रजी विषय असावा.) किंवा संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी (पदवी इंग्रजी/हिंदी विषयासह)२ वर्षांचा अनुभव. (३) प्रोबेशनरी मॅनेजर लॉ – कायदा विषयातील पदवी ५ वर्षांचा अनुभव.

मुलाखतीतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड. शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग रु. १००/-)

प्रोबेशन – एक वर्षांचा कालावधी

ऑनलाइन अर्ज ९ जानेवारी २०१७ पर्यंत http://www.vijayabank.com  या संकेतस्थळावर करावेत.