भारत संचार निगम लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) ‘डायरेक्ट ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर’ (जेएओ) च्या एकूण ९९६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा दि. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी घेणार आहे.

बीएसएनएलच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण रिक्त पदे १३५, (यूआर – ६, अजा – १३, अज – ९, इमाव – ४७) विकलांगांसाठी ४ पदे राखीव.

पात्रता – (दि. १ जानेवारी २०१७ रोजी) एमकॉम/सीए/आयसीडब्ल्यूए/सीएस उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१७ रोजी २० ते ३० वष्रे (इमाव – २० ते ३३ वष्रे, अजा/अज – २० ते ३५ वष्रे, विकलांग २० ते ४३/४५ वष्रे).

ऑनलाइन अर्ज www.externalexam.bsnl.co.in या संकेतस्थळावर १५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगळुरु (एनसीबीएस)

बायोलॉजी आणि इंटरडिसिप्लीनरी रिसर्चसाठी पीएचडी,

इंटिग्रेटेड एमएससी – पीएचडी प्रोग्रॅम्स डीबीएस, एनसीबीएस,

आयआयएसईआर – पुणे</strong>; आयआयएसईआर – कोलकाता;

एमएससी (रिसर्च) डीबीएस- पुणे; एमएससी (न्यूरोसायन्स) – एनबीआरसीमधील प्रवेशासाठी जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनिकेशन इन बायोलॉजी अँड इंटरडिसिप्लीनरी लाईफ सायन्सेस (जेजीईईबीआयएलएस)

परीक्षा टीआयएफआर दि. १० डिसेंबर २०१७ रोजी घेणार आहे.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, नागपूर इ.

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- पुरुष उमेदवारांसाठी, महिलांसाठी रु. १००/-.

पात्रता-

१) पीएचडी प्रोग्रॅम – बेसिक सायन्समधील पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड सायन्सेसमधील पदवी (एमएस्सी (अ‍ॅग्रि.), बीई, बीटेक, बीफार्म, बीव्हीएस्सी, एमबीबीएस, बीडीएस्).

२) इंटिग्रेटेड एमएस्सी – पीएचडीसाठी – बेसिक सायन्समधील पदवी.

एमएससी (वाइल्ड लाइफ बायोलॉजी अँड कन्झर्वेशन) कोणत्याही शाखेतील पदवी.

ऑनलाइन अर्ज www.ncbs.res.in/admissions.html या संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.