16 December 2017

News Flash

नोकरीची संधी

थळ युनिटसाठी कंपनीच्या टाऊनशिपमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

सुहास पाटील | Updated: September 1, 2017 11:43 AM

लोकसभा (जॉइंट रिक्रूटमेंट सेल), नवी दिल्ली – ज्युनियर क्लार्कच्या एकूण ३१ पदांची भरती.

(२६ पदे इंग्रजी ज्युनियर क्लर्क आणि ५ पदे िहदी/इंग्रजी बायिलग्वल ज्युनियर क्लार्क) (यूआर – १६, इमाव – ९, अजा – १, अज – ५) (१ पद विकलांग लो-व्हिजनसाठी राखीव).

पात्रता – पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील)  इंग्रजी/िहदी टंकलेखनाचा ४० श.प्र.मि. वेग (इंग्रजी आणि िहदी दोन्ही टायिपग येणाऱ्यांना प्राधान्य).

कमाल वयोमर्यादा – दि. ९ ऑगस्ट २०१७ रोजी २७ वष्रे (इमाव – ३० वष्रे, अजा/ अज – ३२ वष्रे, (विकलांग – एलसी (बीएल), एचएच (पीडी)) हेदेखील पात्र आहेत.)

निवड पद्धती – पूर्व परीक्षा पार्ट-ए – जनरल

नॉलेज आणि करंट अफेअर्स, पार्ट-बी – जनरल इंग्लिश प्रत्येकी ५० गुण. एकूण १०० गुण,

वेळ ६० मिनिटे.

मुख्य परीक्षा – पेपर-१ निबंध (५० गुण), पत्र (३५ गुण) आणि व्याकरण (१५ गुण) एकूण १०० गुण. वेळ – दोन तास.  पेपर-२ – टायिपग टेस्ट ४०  श.प्र.मि. वेगाने इंग्रजी/िहदी १०० गुण,

वेळ १० मिनिटे.

परीक्षा केंद्र – मुंबई, चेन्नई,

कोलकता, दिल्ली.

ऑनलाइन अर्ज http://www.loksabha. nic.in/ या संकेतस्थळावर दि. ९ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पश्चिम क्षेत्र पारेषण प्रणाली-१, मुख्यालय, नागपूर – ४४००२६ जाहिरात क्र. डब्ल्यूआर-१/०१/२०१७ येथे डिप्लोमा ट्रेनी (विद्युत)च्या एकूण २० पदांची भरती.

(खुला – १३, इमाव – ३, अजा – २, अज – २, पीडब्ल्यूडी – २ (एचएच/ओएच) माजी सनिक – ३) वयोमर्यादा – दि. १० ऑगस्ट २०१७ रोजी २७ वष्रे (इमाव – ३०, अजा/अज – ३२) जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.powergridindia.com>careerssection अर्ज करण्यासाठी दि. २१ जुल २०१७ ते दि. १० ऑगस्ट २०१७ पर्यंत संकेतस्थळ  खुले असणार.

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिायझर्स लिमिटेड (आरसीएफ) इंजिनीअर (बॉयलर प्रोफिशिएन्सी)’ (ई-क  ग्रेड) च्या ५ पदांची भरती

(ट्रॉम्बे -२, थळ -३) (३ पदे अराखीव व २ पदे इमावसाठी).

पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ केमिकल/पॉवर/प्रोडक्शन/इन्स्ट्रमेंटेशनमधील अभियांत्रिकी पदवी (पदवीच्या शेवटच्या वर्षांला किमान ५५% गुणांसह) बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर्स सर्टििफकेट (बीओई)/बॉयलर प्रोफेशिएन्सी सर्टििफकेट.

वयोमर्यादा – ३०वष्रे (इमाव – ३३ वष्रे).

वेतन – रु. ४८,०००/- दरमहा. थळ युनिटसाठी कंपनीच्या टाऊनशिपमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

निवड पद्धती – शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. अर्जाचा नमुना (Annexure – क) www.rcfltd.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.

पूर्ण भरलेले अर्ज स्वसाक्षांकित आवश्यक प्रमाणपत्राच्या छायाप्रतींसह ‘चीफ जनरल मॅनेजर (एचआर), राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिायजर्स लिमिटेड, पहिला मजला, रू.नं. १४८, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, चेंबूर, मुंबई – ४०००७४’ या पत्त्यावर दि. ११ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

अर्जाचे शुल्क – रु. ७००/-

First Published on August 4, 2017 1:02 am

Web Title: job opportunity 9