केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभागात ड्रिलर इंचार्जच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट.

*  फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे चीफ अकाऊंटस ऑफिसर म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ जुलै २०१७च्या अंकात प्रकाशित झालेली फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ftiindia.com/

या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट.

*  बँक ऑफ महाराष्ट्र- पुणेअंतर्गत क्रेडिट रिस्क ऑफिसरच्या ३ जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व बँकिंग/ फायनान्समधील एमबीए अथवा सीए/ आयसीडब्ल्यूए पात्रताधारक असावेत. रिस्क मॅनेजमेंटमधील पात्रकाधारकांना प्राधान्य.  अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेली बँक ऑफ महाराष्ट्रची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर.

*  लष्कराच्या कृत्रिम अंग केंद्र, वानवडी- पुणे येथे सफाई कर्मचाऱ्यांसाठी संधी-

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेली कृत्रिम अंग केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज कमांडंट आर्टिफिशियल लिंब सेंटर, वानवडी, पुणे ४११०४० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर.

भारतीय खाद्य नियम – मुंबईअंतर्गत सुरक्षारक्षकांच्या १८८ जागा-

अर्जदार आठवी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांना इंग्रजी, हिंदी व मराठीचे ज्ञान असायला हवे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारतीय खाद्य निगमची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://www.fcijobportalmaha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर.

नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणे येथे संशोधकांच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.icmr.nic.in/ अथवा http://www.nari-icmr.res.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर- इंचार्ज, आयसीएमआर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट प्लॉट नं. ७३, ‘जी’ ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी, पुणे- ४११०२६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट.