पेपर- ४ मधील उर्वरित भागाची विभागणी कशा प्रकारे करता येईल, त्याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आर्थिक विकासाचे घटक – नैसर्गिक साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा, लोकसंख्या, मानवी भांडवल-लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत-मानवी विकास निर्देशांक-मानवी दारिद्रय़ निर्देशांक-लिंग सक्षमीकरण उपाययोजना.
विकास निदर्शक -सातत्यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरितस्थूल देशांतर्गत उत्पन्न.
वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका – बहुराष्ट्रीय महामंडळे. वाढीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार-आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आयएमएफ-आयबीआरडी-डब्ल्यूटीओ-प्रादेशिक व्यापार करारनामा-सार्क-एएसईएएन भारतीय कृषिव्यवस्था, ग्रामविकास व सहकार –
आर्थिक विकास व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील कृषिक्षेत्राची भूमिका – कृषी, उद्योग व सेवाक्षेत्रे यांच्यामधील आंतरसंबंध. योजना कालावधीमधील ग्रामीण विकासाची धोरणे- ग्रामीण पायाभूत सोयी (सामा. व आर्थिक)
जागतिक व्यापार संघटना व शेती- शेतकऱ्यांचे व पदासकारांचे हक्क, कृषी बाजारपेठेतील गॉटचा अपेक्षित भार. कृषिविषयक धंदा व जागतिक बाजारपेठ ग्रामीण कर्जबाजारीपणा- शेतीला अर्थसाहाय्य – भारतातील कृषिविषयक पतवारी- समस्या, गरज, महत्त्व, गुंतलेल्या वित्तीय संस्था, नाबार्ड, भूविकास बँक. कृषी किंमत-घटक, कृषी उत्पादनांवर परिणाम करणारे घटक- शासकीय आधारभूत किमती, अर्थसाहाय्य, कृषीपणन-सद्य:स्थिती, मूल्यवर्धित उत्पादने, शासनाची भूमिका आणि कृषि पणनातील त्यांच्या संस्था.
शेतीसाहित्य व उत्पादन- विपणन व मूल्यांकन, किमतीतील चढउतार, कृषि अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांची भूमिका.
जमीनधारणा आकार आणि उत्पादकता – जमीनसुधारणा व जमिनीचा वापर. कृषिविषयक उत्पादन आणि कमी उत्पादकतेची कारणे कंत्राटी शेती – ठरावीक शेती – औद्योगिक शेती – सेंद्रिय शेती. कृषी उत्पन्न वाढीतील प्रादेशिक तफावत – कृषिविषयक किमती आणि व्यापाराच्या अटी पाटबंधाऱ्याची साधने व जलव्यवस्थापन- मृदा व जलसंधारण, पर्जन्याश्रयी शेती यांसारख्या विकासकामांकरिता सिंचन आणि त्याच्या पद्धती.
हरितक्रांती व तंत्रशास्त्रविषयक बदल-आयसीएआर, एमसीएईआर यांची भूमिका, शेतीचे यांत्रिकीकरण, जैवविविधता, जीएम तंत्रज्ञान.
पशुधनसंपत्ती- उत्पादकता, भारतातील आणि महाराष्ट्रातील धवलक्रांती, मत्स्यव्यवसाय, कुक्कूटपालन, वनीकरण, फलोत्पादन व पुष्पसंवर्धन विकास.
अन्न व पोषण आहार – भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल, पहिली व दुसरी हरितक्रांती, अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा. अन्न सुरक्षिततेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, अन्नाचे कॅलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहार मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषण मूल्य. भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, शासनाची धोरणे व सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्यक्रम, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रम, अन्न सुरक्षा अधिनियम.

विज्ञान व तंत्रज्ञान विकास
ऊर्जा – पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जासाधने – सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीकरणयोग्य ऊर्जासाधनांची संभाव्यता, सौरसाधने-सौरकुकर, पाणीतापक इ. बायोगॉस तत्त्वे व प्रक्रिया, शासकीय धोरणे आणि वीजनिर्मितीसाठी कार्यक्रम- अणुशक्ती, औष्णिक वीज, जलविद्युत. वीजवितरण व राष्ट्रीय विद्युतपुरवठा, ऊर्जासंकट, ऊर्जासुरक्षा, संशोधन व विकास यात गुंतलेली अभिकरणे व संस्था.
संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, माहितीची देवाणघेवाण, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान यांसारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील त्याचे उपयोजन, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मीडिया लॉब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिटी माहितीकेंद्र इ. सारखे शासकीय कार्यक्रम, सायबर गुन्हे, त्यावरील प्रतिबंध, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्त्वाचे प्रश्न- त्याचे भवितव्य.
अवकाश तंत्रज्ञान – भारतीय अवकाश कार्यक्रम, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण, प्रसारण, हवामान अंदाज, जीपीएस, आपत्ती इशारा याकरिता भारतीय कृत्रिम उपग्रह, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम, सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) आणि हवामान अंदाज, आपत्ती इशारा यामधील तिचे उपयोजन, जल, मृदा, खनिज संपत्ती विकास, कृषी व मत्स्यविकास, नागरी नियोजन, पारिस्थितिकी अभ्यासक्रम, भौगोलिक यंत्रणा व भौगोलिक माहिती यंत्रणा.
जैव तंत्रज्ञान – कृषी, औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता, नसíगक साधनसंपत्ती विकासाचे आवश्यक व महत्त्वाचे साधन
म्हणून जैवतंत्रज्ञान उपयोजनाची क्षेत्रे -कृषी, पशुपदास व पशुवैद्यकी, औषधनिर्माण विद्या,
मानवी आरोग्य, अन्न तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, पर्यावरण संरक्षण इ. देशातील जैवतंत्रज्ञानाबाबत प्रचालन, नियमन व विकासामधील शासनाची भूमिका व प्रयत्न, जैवतंत्रज्ञानाशी संबंधित नतिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न, जैवतंत्रज्ञान विकासाचे संभाव्य प्रतिकूल परिणाम, बियाणे तंत्रज्ञान, त्याचे महत्त्व, बियाणांची गुणवत्ता, प्रकार आणि उत्पादन व प्रक्रियातंत्रे, बी.टी. कापूस, बी.टी. वांगे इ. भारताचे आण्विक धोरण – ठळक वैशिष्टय़े, ऊर्जेचा स्रोत आणि स्वच्छ ऊर्जा म्हणून अणुऊर्जा, त्याचे महत्त्व, आण्विक कचऱ्याची समस्या, भारतातील औष्णिक वीजनिर्मिती, एकूण वीजनिर्मितीमधील त्याचे अंशदान, आण्विक चाचणी निर्धारके -पोखरण एक (१९७४) आणि पोखरण दोन (१९९८) न्युक्लिअर नॉन-प्रोलिफरेशन ट्रिएटी आणि कॉम्प्रेहेन्सिव टेस्ट बॉन ट्रिएटी यांसारख्या आण्विक धोरणाबाबतचा अलीकडला कल, २००९ चा इंडो-युएस न्यूक्लिअर करार.
आपत्ती व्यवस्थापन आपत्तीची व्याख्या, स्वरूप, प्रकार व वर्गीकरण, नसíगक धोके, कारणीभूत घटक व ते सौम्य करणारी उपाययोजना, पूर, भूकंप, त्सुनामी, दरड कोसळणे इ. सौम्य करणाऱ्या उपाययोजनांवर परिणाम करणारे घटक, किल्लारी (१९९३), भूज (२००१), सिक्किम-नेपाळ (२०११) भूकंप, बंदा आले (२००४) (सुमात्रा), फुकुशिमा (२०११) (जपान) भूकंप व त्सुनामी यांसारख्या मोठया भूकंप व त्सुनामी प्रकरणांचा अभ्यास, महाराष्ट्र २००५ चा मुंबईतील पूर, डिसेंबर १९९३, जून २००६, नोव्हेंबर २००९, जुल २०११ चे बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला, त्यांचा परिणाम.
फारुक नाईकवाडे