News Flash

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ जैवविविधता आणि पर्यावरण

शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे,

आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्याच प्रदेशांपकी भारत एक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि याच्या परिणामस्वरूप भारतातील उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असून याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहेत. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नसíगक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलतोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेली लोकसंख्या, तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल आणि याचे गंभीर परिणाम जैवविविधता आणि पर्यावरणावर होऊ शकतात. या सर्व पलूंचे एकत्रित आकलन करून हा घटक अभ्यासावा लागणार आहे.
सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ. यात जैवविविधता आणि पर्यावरण यांचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत, जे पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणसंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि हे का अनिवार्य करण्यात आलेले आहे, तसेच याची नेमकी काय उपयुक्तता आहे, यासारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे.
आतापर्यंत झालेल्या तीन मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर २०१३ मध्ये दोन, २०१४ मध्ये दोन आणि २०१५ मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे व हे प्रश्न खालीलप्रमाणे होते.
२०१३ मुख्य परीक्षा
(१) अवैधरीत्या खाणकामामुळे काय परिणाम होतात? कोळसा खाण क्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ‘जा किंवा जाऊ नका’ (GO _AND) या संकल्पनेची चर्चा करा.
(२) भारताच्या राष्ट्रीय जल धोरणाची गणना करा. गंगा नदीचे उदाहरण घेऊन, भारतातील नद्यामधील जल प्रदूषण नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राबविता येऊ शकणाऱ्या रणनीतीची चर्चा करा. भारतामध्ये हानिकारक कचरा हाताळणी आणि व्यवस्थापन यासाठीच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत?
२०१४ मुख्य परीक्षा
(१) जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकासप्रणाली यू.एन.एफ.सी.सी.सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे. अशा स्थितीत हे चालू ठेवावे का? आíथक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज या संदर्भात चर्चा करा.
(२) सरकारमार्फत एखाद्या प्रकल्पाला परवानगी देण्याअगोदर पर्यावरणीय आघात मूल्यमापनाचे आकलन प्रभावीपणे केले जाते. कोळशावर आधारित औष्णिक प्रकल्प जे कोळसा खाणीच्या गर्त-शिखरावर ((Pitheads) स्थापन करण्यात आलेले असतात, त्यांच्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची चर्चा करा.
२०१५ मुख्य परीक्षा
(१) नमामी गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनापासून मिळालेल्या संमिश्र परिणामाच्या कारणावर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साह्य़कारी होऊ शकते?
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाची आपण थोडक्यात उकल करून घेऊ या. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर अधिक प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले नाहीत. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा अधिक या घटकाशी संबंधित चालू घडामोडीचा विचार करून विचारण्यात आलेले आहेत. या घटकाची सखोल माहिती असल्याखेरीज हा घटक परीक्षेच्या दृष्टीने तयार करणे अवघड जाते. या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे. पण उपरोक्त प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते. वरील प्रश्नांमध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण यांचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यांसारख्या पलूंचा मुख्यत्वे विचार केलेला दिसून येतो. या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे आणि यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त प्रश्नामध्ये कार्बन क्रेडिट, स्वच्छ विकासप्रणाली, आणि पर्यावरणीय आघात मूल्यमापन यासारख्या संकल्पना आणि याच्या जोडीला भारत सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, विविध पर्यावरणीय कायदे याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यासाठीच्या कार्यरत संस्था इत्यादींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. उत्तरे अधिक समर्पक लिहिण्यासाठी सामन्यात हा घटक योग्य प्रकारे आणि नेमक्या भाषेत समजून घेता येणे गरजेचे आहे हे उपरोक्त प्रश्नावरून आपण समजू शकतो.
या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी.ची पर्यावरणासंबंधित पुस्तके वाचावीत आणि बाजारात या घटकासाठी अनेक गाईड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे, उदाहरणार्थ TMH चे डी.आर. खुल्लर लिखित पर्यावरणाचे पुस्तक. तसेच ‘इंडिया ईअर बुक’मधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा. या घटकाचा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांच्या वेबसाइट्सचा वापर करून माहिती संकलित करावी आणि याच्या जोडीला भारत सरकारच्या आíथक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे आणि मराठीमध्ये या घटकाशी संबंधित चालू घडामोडी साठी द युनिक अकादमीद्वारे प्रकाशित ‘भारत वार्षकि’मधील पर्यावरणासंबंधित चालू घडामोडींचे प्रकरण वाचावे. यापुढील लेखामध्ये आपण आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाची चर्चा करणार आहोत.
(लेखांक – १०)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:20 am

Web Title: preparing for upsc exam
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : मानवी हक्क – विश्लेषणात्मक अभ्यास
2 बांधकाम क्षेत्र : एक उत्तम पर्याय
3 करिअरनीती : नोकरीतील समाधान
Just Now!
X