नकारात्मक विचारांनी सतत पछाडलेल्या व्यक्तींना रोज काही तरी होतच असते. त्यांच्या दुखण्याची जागा फक्त रोज काय ती बदलत असते. आज डोके, छाती, परवा पोट याप्रमाणे रोजच्या दुखण्याला घरची माणसेही मनापासून कंटाळतात.
       देहे रक्षणाकारणे यत्न केला ।
        परी शेवटी काळ घेऊनि गेला ।।    असे समर्थ म्हणतात.
     देहाचे चोचले पुरविण्यात आपल्यापकी कोणीही कमी नाही. अगदी लहान मुलापासून ते जराजर्जर व्यक्तीलाही देहाला काही व्हायला लागले की भयंकर भीती वाटते. याला केवळ संतच अपवाद असतात, अर्थात देहाची हेळसांड करावी हा सांगण्याचा हेतू नाही. समर्थानीही देह उपासनेला महत्त्वाचे मानले आहे. शरीर सुदृढ असावे ते ईश्वरप्राप्तीचे साधन म्हणून. माझ्या वाटय़ाला या जन्मात आलेले कर्म नीट पार पाडण्यासाठी हा देह नीट ठेवला पाहिजे. देहरक्षण म्हणजे ‘फक्त देहबुद्धीची’ जोपासना नाही. या देहाचा सदुपयोग मृत्युनंतरही करता यावा हीच त्यामागची प्रबळ इच्छा हवी. आपल्या मनातील ‘प्रेम’ भावनेचे टय़ुनिंग स्वत:च्या देहावरून काढून कर्मावर स्थिर केले की, दुखण्याची जागा आनंदाने घेतलीच म्हणून समजा. मन:शांती नक्कीच माहेरपणास येईल.
  अर्ध पद्मासन
या विचाराला बळकटी देत ध्यानात्मक गटातील एक पुढील आसन आपण करूया, सुलभ अर्ध पद्मासन. बठकस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता दोन्ही पाय लांब, पण एकमेकांना जोडून घ्या. हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच दुसऱ्या पायाच्या जांघेमधे ठेवा.
आता डावा पाय गुडघ्यात दुमडून पाऊल उजव्या मांडीखाली ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण अथवा ज्ञानमुद्रेमध्ये ठेवा. पाठकणा समस्थितीत, ताणरहित असू द्या. डोळे मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करा. हात कोपरांमध्ये सल, शिथिल ठेवा. काही काळ याच बैठक स्थितीत रहा.

खा आनंदाने ! : निरोगी खाणे पद्धती
वैदेही अमोघ नवाथे ( आहारतज्ज्ञ)

मी अलीकडेच वाचलं की, शारीरिक व्याधी/ मानसिक तणाव कमी-जास्त फरकाने सगळ्यांनाच असतात, पण त्यांना उगाळत बसायचं, की त्यातून मार्ग काढायचा हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. अर्थातच आपल्या प्रियजनांची साथसुद्धा महत्त्वाची असते. जसे वय वाढते तसे निरोगी खाणे, हे एक आव्हान असू शकते, कारण दातांच्या समस्येपासून क्षीण पचनसंस्थेपर्यंत  आरोग्याच्या मार्गात अनेक अडथळे असतात, तर अशी अडथळा शर्यत यशस्वीरीत्या जिंकायची असेल, तर ‘निरोगी खाणे पद्धती’ जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
समस्या :
चावून खाणे
रोजच्या आहारातील काही पदार्थ जसे पोळी, भाकरी, फळं, कोशिंबिरी वगैरे चावून खाणे वयानुसार कदाचित अशक्य होते, कारण दात नसणं किंवा कवळीचा त्रास! पूर्वी भाजलेला मका किंवा ऊस सोलून खाणारे दात काही वयानंतर साथ सोडून देतात. मग काय करायचं? जीवनसत्त्वं तर मिळाली पाहिजेत. त्याऐवजी मऊ  फळे जशी चिकू, आंबा, केळी, पपई, खरबूज-टरबुजाचे तुकडे, डाळिंब, संत्रं, मोसंबी, सफरचंदाचा ताजा रस, किसलेली कोशिंबीर, भाज्यांचे रस, पावभाजीसारख्या शिजवलेल्या आणि मऊ  केलेल्या भाज्या, उच्च प्रथिने पदार्थ जसे दूध आणि दही, शिजवलेले कडधान्यं, हातसडीचा तांदूळ, सांजा आणि डाळीत कुस्करलेली पोळी (डाळ-ढोकळी)
 पोटाच्या तक्रारी
वय जसं वाढतं तसं अन्न पचवण्यासाठी लागणारी रसायने हळूहळू कमी होतात आणि त्यामुळेच अगदी आयुष्यभर दूध पचत असेल तरी काही वयानंतर दुधामुळे त्रास होऊ  शकतो किंवा काही जणांना तर गहू पचत नाही.   
अशा वेळी काय करावे –  इतर पदार्थ वापरायचा प्रयत्न करा. जसे ताक, दही, नाचणी, जव, वरी तांदूळ, ज्वारी, लाल तांदूळ, राजगिरा वगैरे. चावून खाता न आल्यानेसुद्धा पचन व्यवस्थित होत नाही. म्हणून मऊ शिजवलेल्या भाज्या किंवा त्यांचे सूप्स घ्यावेत.
खाण्याच्या समस्या असतात तशाच इतर काही गोष्टींमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ  शकतो. जसे एकटे राहणारे आजी-आजोबा असतील, तर खरेदी अवघड होऊ  शकते. किराणा माल आणण्यासाठी स्थानिक दुकानांचा विचार करा. संधिवातसंबंधित वेदना असतील, तर स्वयंपाक करणं कठीण असू शकतं. अशा वेळी एकच पण परिपूर्ण मेनू असावा, जेणेकरून योग्य अन्न सेवन होईल आणि आरोग्यसुद्धा अबाधित राहील.
भूक लागत नाही
एकटे राहणारे वृद्ध कधी कधी एकाकी वाटतं म्हणून भूक गमावू शकतात किंवा स्वत:साठी जेवण बनवण्याचाही उत्साह राहत नाही. बहुधा अन्नाची चव न लागणं हे आपण घेत असलेल्या औषधांमुळेदेखील होऊ  शकते.
काय करावे – औषधांबाबतीत डॉक्टरांना विचारा. जेवणामध्ये मसाल्यांची विविधता आणा.  
पोषक आहार माध्यमातून आरोग्य साधणे हा एक आनंददायी प्रवास आहे.

abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!

संगणकाशी मत्री : पीडीएफ सॉफ्टवेअर
मागील लेखात (३ मे) आपण पीडीएफ म्हणजे काय,     त्याचा उपयोग काय, याची माहिती करून घेतली, आज आपण ‘पीडीएफ सॉफ्टवेअर’ आपल्या संगणकात कसे डाऊनलोड करून वापरावे याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनमध्ये डाऊनलोड फ्री पीडीएफ कनव्हर्टर असे टाइप करावे. आता आपल्यासमोर विविध कंपन्यांचे पीडीएफ मेकर सॉफ्टवेअर येतील. यापकी अडोबी (Adobe) या कंपनीच्या पीडीएफ मेकरला सर्वात जास्त पसंती लोकांकडून दिली जाते. अडोबी नंतर क्रमांक लागतो डू पीडीएफ, पीडीएफ 24, नीट्रो पीडीएफ, सॉफ्टोनिक या पीडीएफ मेकर सॉफ्टवेअरचा.
यापकी तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे सॉफ्टवेअर निवडा. उदा. जर तुम्हाला ‘अडोबी’चे पीडीएफ मेकर डाऊनलोड करायचे असेल तर ‘अडोबी’च्या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्यासमोरChoose your region हा पर्याय समोर होईल. ‘भारत’ असे आपल्या देशाचे नाव असणारा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर डाऊनलोड किंवा ‘रन’ असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पुढच्या प्रत्येक पायरी करता नेक्स्टच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे पीडीएफ सॉफ्टवेअर डाऊनलोड झालेले आहे.
ज्या कागदपत्राचे तुम्हाला पीडीएफ करायचे असेल, समजा तुम्ही लिहिलेली एखादी छोटीशी कथा आहे किंवा नातवंडांसाठी एकत्रित केलेल्या काही कविता तुमच्या संगणाकावर ‘सेव्ह’ केलेल्या आहेत. ती फाईल ओपन करा. मजकूर समोर दिसला की त्यावर राइट क्लिक करून ‘ प्रिंट’ असा पर्याय निवडायचा.प्रिंट ही कमांड दिल्यावर जी छोटी विंडो येईल त्या ठिकाणी प्रिंटरचे नाव लिहिलेले असते तेथे  save as a pdf   किंवा do pdf  हा पर्याय निवडून ‘ओके’ म्हणावे. झाली आपली पीडीएफ फाईल तयार..
संकलन- गीतांजली राणे
 rane.geet@gmail.com

आनंदाची निवृत्ती : ७५ व्या वर्षी शिकलो ड्रायव्हिंग
राजा सहस्रबुद्धे
ठरावीक वयानंतर प्रत्येकालाच निवृत्तीला सामोरं जावं लागतं. माझ्या निवृत्तीला आज बावीस र्वष झाली. घरांत आम्ही दोघंच. दोघंही सेवानिवृत्तीचा हा काळ आनंदात घालवत होतो, पण थोडय़ाशा आजाराचं निमित्त होऊन पत्नीचं २००८ साली निधन झालं. ४३ वर्षांच्या संसारात सहजीवन म्हणजे काय असतं हे अनुभवलं होतं, उपभोगलं होतं. पत्नी गेल्यावर नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र सगळे जण मला एकटेपणा भासू न देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यातच एक दिवस माझा बडोद्याचा भाचा मला भेटायला आला. मला म्हणाला, ‘मामा मी नवीन गाडी घेतोय आणि माझी जुनी गाडी तुला देतोय.’ एवढं म्हणून तो थांबला नाही तर पुढच्या एका महिन्यातच ‘माझी गाडी’ दारात आणून उभी केली.
 वयाच्या ७५व्या वर्षी गाडीचे पेपर्स माझ्या नावावर करीत असताना मनांत विचार आला, ‘अरे, आपलं काही गाडी वगैरे घेण्याचं स्वप्न नव्हतं, तरी गाडी आपल्या दारांत आली, मग ड्रायव्हिंग का शिकू नये. त्यानंतर रीतसर स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंगचा ‘श्रीगणेशा’ केला. आधी लर्निग लायसन्स आणि मग ऑथेन्टिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. कला म्हणून ड्रायव्हिंग यायला लागलं, पण मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवणं ही काही सहज होणारी गोष्ट नाही, म्हणून एक अनुभवी ड्रायव्हर बोलावून त्याच्याबरोबर सराव करायला सुरुवात केली. आणि म्हणता म्हणता मला अगदी मला गाडी चालवणं सहज जमू लागलं.
ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतो, मानसिक समाधान मिळतं, ते केल्याने आयुष्यातला प्रत्येक दिवस, दिवसाचा प्रत्येक तास व तासाचं प्रत्येक मिनिट आपल्याला आनंद मिळतो.  मला पूर्वीपासूनच दुसऱ्यासाठी जगण्यात आनंद वाटायचा. आता, नातेवाईक, मित्रांना, अडलेल्यांनाच नाही तर अगदी गंमत म्हणून समवयस्कांना गाडीने फिरायला नेऊन तो आनंद द्विगुणित होतोय हे नक्की आणि यापेक्षा या ८०व्या वर्षी अधिक काम हवंय मला?

धडपडे आजी-आजोबा : विक्रम  शंभरीनंतरचा
वय वर्षे १०२, रॉबर्ट मारचंड या आजोबांनी सर्वात ज्येष्ठ सायकलपटू होण्याचा मान मिळवला आहे. २०१४ साली पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत २६.९२ किलोमीटरचे अंतर, सायकलवरून फक्त एक तासात मोडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. उत्साहाने सळसळणाऱ्या या आजोबांनी यापूर्वीचा, २४.२५ किलोमीटर इतके अंतर एक तासात कापण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढल. त्या वेळी ते शंभरीच्या उंबरठय़ावर होते. स्पर्धेत जिंकण्यासाठी नाही तर आपल्या १०० व्या वाढदिवसाची स्वत:लाच भेट देण्यासाठी हा विक्रम करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या ८० वर्षांपर्यंत या आजोबांनी सायकलट्रॅकवर सायकल चालवलीच नव्हती. मात्र त्यानंतर हळूहळू आपला सराव वाढवत, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एकेका स्पर्धेत सहभागी होत आपली क्षमता वाढवली. ९० वर्षांचे असताना पॅरिसमधल्या प्रतिष्ठित सायकलस्पर्धेत ६०० किमी अंतर ३६ तासात कापून आपले वर्चस्व सिद्ध केले.
पण या वयातही मानसिक  व शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणाऱ्या आजोबांनी ‘मी कुठल्याही व्यसनाच्या अधीन नाही’ हेच आपल्या आरोग्याचे रहस्य असल्याचे सांगितले आहे. फायरफायटर असणारे हे आजोबा वयाच्या ८९ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले म्हणजे बघा!