श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कायमच आव्हानात्मक असतात गाण्यासाठी. अवघड राग, अवघड ताल, अवघड चाल, अवघड शब्दोच्चारण, सगळंच आव्हानात्मक. पण एकदा का गाणं रेकॉर्ड झालं की आनंद वाटायचा. माझ्या गाण्यातल्या सौंदर्य निर्मितीच्या हुकुमतीवर त्यांचा विश्वास असावा म्हणून त्यांनी कायमच गाण्यात बढत करण्याची मुभा मला दिली. विविध रागांशी खेळणाऱ्या, त्यात नवनवीन प्रयोग करत सुरेल गाणी देणाऱ्या श्रीधर फडके यांच्या ‘तेजोमय नादब्रह्म’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’,‘ताने स्वर रंगवावा’ आदी गाणी गात मीही प्रयोगशील झाले.

माटुंगा, दादर, शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात अनेक कलाकारांचं वास्तव्य होतं त्या काळी.. साधारण चाळीस वर्षांपूर्वी. पंडित यशवंतबुवा जोशी, गायिका माणिक वर्मा, माझे गुरुजी पंडित वसंतरावकुलकर्णी, पंडित सी.आर.व्यास, शब्दप्रधान गायकीचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक आणि गुरू पंडित यशवंत देव. तसंच अवघ्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके अशी अनेक कलाकार मंडळी तिथे राहात असत. एका निमित्तानंबाबूजींच्या घरी जायची संधी मला मिळाली.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
ग्रामविकासाची कहाणी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

त्याला निमित्त घडलं संगीतकार श्रीधर फडके यांचा आलेला फोन. १९७८ वर्ष होतं ते. मी तेव्हा बारावीत होते. एका गाण्याच्या तालमीसाठी त्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. संध्याकाळची वेळ होती. शिवाजी पार्क इथे असलेल्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’शेजारील‘शंकर निवास’ या इमारतीत ते राहात असत बाबूजी म्हणजेच सुधीर फडके, श्रीधरजींचे वडील. स्वत: बाबूजी, ललिता वहिनी, श्रीधरजी आणि त्यांच्या पत्नी चित्रा सगळे एकत्र राहात असत. त्यांच्या घरी पोहोचले तो सहाचा सुमार असावा. माझ्याबरोबर आई होती माझी. आम्ही प्रवेश करताच हसतमुखानंश्रीधरजींनी आमचं स्वागत केलं. त्यांच्या पत्नी चित्रा यांचीही भेट झाली. बाबूजींच्या अनेक पुरस्कारांनी सुशोभित असा त्यांचा हॉल! साधेपणा होता घरात, सगळं टापटीप. श्रीधरजीहार्मोनियम घेऊन बसले तेवढय़ातलालचुटुक चोच असलेला एक हिरवागार पोपट हॉलमध्ये आला. मी दचकलेच जरा. श्रीधरजी म्हणाले, ‘‘घाबरू नकोस! आम्ही पाळलेला, आमचा लाडका सोन्या आहे तो. काही त्रास नाही द्यायचा.’’ असं म्हणेपर्यंत तो अलगद त्यांच्या खांद्यावर जाऊन बसला. आमची तालीम संपेपर्यंत तो श्रीधरजींच्याजवळून हलला नाही.

हेही वाचा… देहभान: ‘मोल्ड फॉर इच अदर’!

मी पोहोचल्यानंतर काही मिनिटांतच देवकी पंडितही तिच्या आईबरोबर तिथे आली. ‘दूरदर्शन’च्या एका कार्यक्रमासाठी आम्हा दोघींचं एक गाणं, एक द्वंद्वगीत ध्वनिमुद्रित करण्याचं योजलं होतं श्रीधरजींनी. ग.दि.माडगूळकरांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम होणार होता. गदिमांनी‘सुवासिनी’ या चित्रपटासाठी लिहिलेलं, परंतु अप्रकाशितअसलेलं एक गाणं, एक भजन आम्हाला श्रीधरजींनी शिकवलं. तुलसीदासांच्या भजनाचं स्वैर रूपांतर होतं ते. ‘जाग रघुनंदनाकोकिला बोलते.’ असे शब्द होते.

देवकी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. ती दहावीत, मी बारावीत. ती माझी गुरुभगिनी. आम्ही दोघी पंडित वसंतरावकुलकर्णी यांच्याकडे शिकत असू. अनेक छोटय़ामोठया कार्यक्रमांमध्ये एकत्र गात असू. या गाण्याच्या निमित्तानं आम्ही पुन्हा एकत्र आलो. या गाण्याची तालीमही आम्ही श्रीधरजींकडे जाऊन बऱ्याच वेळा केली. गाणं ध्वनिमुद्रित झालं. एकूण छान झालं गाणं. श्रीधरजींशी माझी पहिली भेट झाली ती या ‘जाग रघुनंदना’ या गाण्याच्या निमित्तानं. त्यानंतर त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी अनेक गाणी गायले.

१९८९ मध्ये दिवाळीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. श्रीधरजींचीच सगळी गाणी आम्ही गाणार होतो. मी, सुरेश वाडकर, श्रीकांत पाडगावकर आदी. त्या वेळी प्रवीण दवणे यांनी एक सुंदर गीत श्रीधरजींना लिहून दिलं होतं. ‘तेजोमय नादब्रह्म हे रुणझुणले काळजात, लखलखले लोचनात एकरूप हे. नादब्रह्म हे’. हे गाणं मी, सुरेशजी आणि श्रीकांतजी आम्ही तिघांनी एकत्रित गायलं. मला आठवतंय, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात बहुदा रेकॉर्डिग झालं असावं या गाण्याचं आणि शूटिंग झालं ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्याआठवडय़ात. अतिशय सुंदर संगीतबद्ध केलं होतं श्रीधरजींनी हे गाणं, उत्तम झालं होतं!

१९९५ मध्ये वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये‘कंस के प्रकार’ असा एक संगीत महोत्सव होणार होता. तिन्ही दिवस ‘कंस के प्रकार’ गायले जाणार होते. मालकंस, चंद्रकंस, गुणकंस, हरीकंस, मधुकंस वगैरे वगैरे. माझा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पहिल्या दिवशी होता, ज्यात मी दोन-तीन वेगवेगळय़ा प्रकारचे कंस गायले. तिसऱ्या दिवशी श्रीधरजींचा भावगीतांचा कार्यक्रम होणार होता आणि त्यात श्रीधरजीकंसच्यावेगवेगळय़ा प्रकारांवर आधारित भावगीतं पेश करणार होते. मला फोन आला त्यांचा.

‘‘राग ‘मधुकंस’ येतो का तुला?’’ मी ‘हो’ म्हटलं. पंडित वसंत कुलकर्णी यांनी मला अतिशय सुंदर बंदिशी शिकवल्या होत्या मधुकंसमध्ये. मध्यलय रूपक या तालात. ‘ए हो दीन दयाल, अनाथन के नाथ’ अशी भावपूर्ण बंदिश आणि ‘जा जा रे जा रे पथिकवा’ ही द्रुत तीनतालातली बंदिश शिकवली होती. माणिक वर्मा यांचा ‘मधुकंस’देखील मी अनेक वेळा ऐकला होता! त्यामुळे ‘मधुकंस’ माझ्यागळय़ात बसलेला राग होता. मी लगेच या बंदिशी म्हणून दाखवल्या श्रीधरजींना. श्रीधरजी मला म्हणाले, ‘‘नितीनआखावेंनी हे गाणं लिहिलेलं आहे. सुरेख शब्द आहेत, ‘मी राधिका मी प्रेमिका’. त्यांनी मला गाणं शिकवलं, मी शिकले. अतिशय आकर्षक चाल होती त्या गाण्याची! जशी एखाद्या रागाची बंदिश असावी तशी. पण शब्द मराठी, भावगर्भित. पहिल्या ओळीत ‘सा ग म प नि सा’ असा आरोह असणारा ‘मधुकंस’ राग आहे, परंतु श्रीधरजींनी या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत अत्यंत सुंदररीत्या धैवत आणि रिषभ वापरून त्या भावगीताचं सौंदर्य अधिकच वाढवलं होतं. उत्तम गीत आणि त्या शब्दांना साजेसं असं संगीत. मला हुकुमी एक्का मिळाला होता. मी ते गाणं शिकले, कार्यक्रमात गायले आणि त्यानंतर ५ वर्ष गेली. ‘व्हीनस’ कंपनीनं‘तेजोमय नादब्रह्म’ हा सुरेश वाडकर आणि माझा आल्बम प्रकाशित केला. सगळी गाणी श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेली. एकाहून एक सरस गाणी.

अनेक वर्ष मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत होते. स्वरप्रधान गायकीचा अभ्यास करत होते. भावगीत गाताना मात्र शब्दोच्चारावर, शब्दांमागे दडलेल्या भावावर लक्ष देणं अपरिहार्य असतं! शब्दांचा भावगर्भित, सुरेल उच्चार ही गरज असते भावगीतांची. राग गायनकरणाऱ्या गायकाला प्रभावी भावगीत गाणं खरं तर आव्हानात्मक! जसे शिवभक्त आणि विष्णुभक्त तशीच स्वरप्रधानता आणि शब्दप्रधानता आणि तसंच राग गायन आणि भावगीत गायन. परंतु ईश्वर एकच असतो, तसं आहे हे!

हेही वाचा… कलावंतांचे आनंद पर्यटन: प्रश्नांची उत्तरं शोधणारी भटकंती!

२००० मध्ये ‘व्हीनस’च्या स्टुडिओमध्ये‘मी राधिका’ या गाण्याचं रेकॉर्डिग ठरलं. मी गायकांच्या बूथमध्ये गेले, श्रीधरजींनी मला गाण्याची बढत करण्याची पूर्ण मुभा दिली होती. त्यांचा विश्वास असावा, माझ्यासौंदर्यदृष्टीवर आणि सौंदर्यनिर्मितीच्या हुकुमतीवर. ‘मी राधिका.. यातल्या ‘मी’ या शब्दावर मला अनेकानेकवेगवेगळय़ा कल्पना सुचत गेल्या. मी त्या उत्स्फूर्तपणे गात गेले रेकॉर्डिगमध्ये. प्रत्येक वेळी नवीन हरकत, नवीन विचार! गाण्याचं ध्वनिमुद्रण खूपच छान झालं! मला आठवतंय, ‘व्हीनस’मध्ये शेजारी अल्ताफ राजा हे त्या वेळचे गायक आले होते. तेदेखील ध्वनिमुद्रितझालेलं‘मी राधिका’ हे गाणं ऐकायला आले. खूप तारीफ केली त्यांनी गाण्याची आणि अर्थात गायकीची.

या आल्बममध्ये आणखी एक गाणं श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेलं होतं. ‘दे साद दे ह्रदया’ असं झपतालातलं गाणं. खूप गाणी नाही सापडायची या तालामध्ये. इतकं सोपंही नाही या तालामध्ये गाणं बनवणं आणि गाणं देखील. सुरेश वाडकर यांच्याबरोबर द्वंद्व गीत होतं हे माझं. त्यांच्या ‘आजीवासन’ या स्टुडिओमध्येरेकॉर्ड झालं. अतिशय अवघड तान घेऊन हे गाणं समेवरयेतं. हे गाणं संगीतबद्ध करण्याआधी श्रीधरजींनी माझ्याकडून बिलासखानी तोडीच्या बंदिशी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या, तो त्यांचा त्या रागाचा अधिक अभ्यास व्हावा म्हणून. त्यानंतर हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. अवघड राग, अवघड ताल, अवघड चाल, फडक्यांचं अवघड, शब्दोच्चारण, सगळंच आव्हानात्मक. ‘तेजोमय नादब्रह्म’ हे गाणं देखील असंच आव्हानात्मक होतं. आज २३ वर्ष झाली ही गाणी प्रदर्शित होऊन, पण त्या गाण्यांची मोहिनी अजूनही रसिकांवर आहे!

श्रीधरजी अगदी साधे. साधी राहणी, मृदू आवाजात बोलणारे, गोड हसणारे, शब्दोच्चारावर जोर देणारे. अगदी पोटफोडय़ा‘ष’चा उच्चार देखील अचूक करायला लावणारे! या गाण्यानंतर काही वर्षांनी संत रामदासांच्या पदांवर आधारित ‘सूर वरदा रामा’ या आल्बमसाठीश्रीधरजींनी काही गाणी संगीतबद्ध केली. संत रामदासांची एकाहून एक सरस पदं आहेत यात! यामध्ये ‘ताने स्वर रंगवावा’ या आणखी एका आव्हानात्मक गाण्यासाठी श्रीधरजींनी माझी निवड केली. नवीन गाणं घेऊन येताना, प्रत्येक वेळी एखादा नवीन विचार घेऊन येण्याची इच्छा बाळगणारेश्रीधरजी. ‘ताने स्वर रंगवावा’ या गाण्यासाठी त्यांनी भूपश्री या रागाची निवड केली. ‘चढता सूरज धीरे धीरेढलताहैंढलजायेगा’ ही कव्वाली तुम्हाला आठवत असेल. तीदेखील याच रागातली. अतिशय सुरेख शब्दरचना असलेलं हे पद. ‘ताने स्वर रंगवावा मग तो रघुनाथ ध्यावा। ताने स्वर भिजवीला तेथे ताळ मेळविला। अर्थ प्रबंदी मिळाला, रंग रस म्हणीजे याला। ताने स्वर रंगवावा।’. यातील ‘ताने या शब्दातील ‘ता’ या अक्षरावर एक मोठी तान श्रीधरजींनी संगीतबद्ध केली होती. दोन-तीन वेळा हे मी गाणं शिकले त्यांच्याकडून. गाण्यावर हुकूमत आल्यानंतर मी ‘ताने’ या शब्दावर वेगवेगळय़ाआकृतीबंधाच्या ताना घेऊ लागले. कधी मंद्र सप्तकात, कधी मध्य सप्तकात, कधी मध्य सप्तकातून तार सप्तकात जाणारी, कधी थोडय़ा जलद लयीची, कधी भेंडोळय़ांची तान, कधी सपाट तान. ‘ताने स्वर रंगवावा’ या ओळीत स्वैर, मुक्त संचार करण्यात मला मजा येऊ लागली. श्रीधरजींनी अतिशय सुंदर आणि प्रभावी चाल दिलेल्या त्या गाण्यामध्ये स्वैर संचार करू लागले आणि आम्ही गाणं रेकॉर्ड केलं.

आणखी एक गाणं आठवतंय, ‘संगीत मनमोहिरे’ या आल्बममध्ये संगीतबद्ध केलेलं मालकंस रागावर आधारित ‘ऐसे गावे गीत सुस्वरे, तन मन व्हावे तल्लीन हो’ या प्रवीण दवणेंच्या गीताला मालकंस रागात संगीतबद्ध केलं होतं श्रीधरजींनी. ‘सा ग मा ध नि सा’ असा जाणारा राग मालकंस. एका ‘लाइव्ह’ कार्यक्रमात गाताना मी मालकंसमध्ये पंचम आणि रिषभ लावून एक वेगळा रंग आणला या गाण्यात, तो श्रीधरजींना खूप आवडला. मालकंसमध्ये पंचम आणि रिषभलावल्यानं त्याचा संपूर्ण मालकंस होतो ही कल्पना खूप आवडली श्रीधरजींना! त्यांनी या विचाराचा समावेश या गाण्यात केला.
माझा गळा, मन आणि बुद्धी डोळ्यांसमोर ठेवून श्रीधरजींनी खास माझ्यासाठी गाणी तयार केली त्यामुळेच मला ही गाणी आपलीशी करणं सोपं गेलं.. त्यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं माझं होण्यास वेळ लागत नाही. मी राधिका! मी आरती! मी राधिका!

aratiank@gmail.com