‘व्ही. शांताराम की एक पुरानी- फोर्टीवनकी- फिल्म थी, ‘पडोसी’, जो मराठीमें ‘शेजारी’ नामसे बनी थी. फिल्म फोर्टीवन में बनी थी, और फोर्टीसेव्हन में मुल्क आझाद हुवा. लेकीन बटवारा होकर! उस बटवारे में कितना खून-खराबा हुवा, लाखों जानें गयी. इन्सानकी नियत बदल गयी.. इन्सानियतही मर गयी! इन्सानही हैवान हो गया.. सब जगह दहशत, खौफ..’ मिर्झाचाचा सांगत होते.
‘मिर्झा येऊन गेला का? ’
गणपतीच्या दिवसांत डय़ुटीवरून येत घरात शिरता शिरताच दादांचा म्हणजे माझ्या वडिलांचा- अधीर प्रश्न असायचा. गणपतीसमोर ‘मिर्झाची’ हजेरी लागली की, त्यांचं समाधान व्हायचं. पंचावन- छप्पन सालच्या सुमारास एका अपघाताच्या केसमध्ये एक साक्षीदार म्हणून परिचय झालेला, अन् पुढे गाढ मत्रीत रूपांतर झालेला दादांचा हा मित्र मिर्झा! गणपतीच्या दिवसांत केव्हा तरी ग्रांटरोडहून, दुकान बंद करून, कधी स्कूटर – कधी मोटरसायकलवरून सपत्नीक त्यांचं घरी येणं ठरलेलं. बरोबर हार-कंठी, मोदकांचा बॉक्स. त्या वस्तू बाप्पांसमोर ठेवून, हातांची पसरट ओंजळ करून क्षणभर डोळे मिटायचे.. बस्स. त्या वस्तूंचा मग बाप्पांच्या पूजेत समावेश व्हायचा.
गणपतीच्या दिवसांत पोलीस खात्याला, घरच्या गणपतीपेक्षा सार्वजनिक गणपतीची डय़ुटी जास्त. त्यामुळे अशा वेळी, मिर्झाचाचांशी गप्पा मारणं ही आम्हा पोरांची डय़ुटी असायची. खरं तर पर्वणीच. त्यांचं कधी गमतीशीर- कधी धीरगंभीर उर्दूतून बोलणं, त्यात त्यांचं सिनेमा-संगीताचं वेड.. अन् आमचं ‘सिनेमॅटिक’ िहदी! अशी जुगलबंदी. असाच ६३-६४ सालच्या गणपतीतला प्रसंग..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दादा..?’
‘ वो तो बंदोबस्तपे हैं..’
‘इसमें कौनसी नयी बात हैं? घरमे आये महेमान..और ये घरके बहार!’
‘आप मेहमान थोडेही हैं, मिर्झाचाचा?’
‘हमारी नहीं, मैं महेमान बाप्पाकी बात कर रहा हूं.. और तुम मुझे मिर्झा क्यूं बुला रहे हो? यह मेरा असली नाम थोडेही है?’
‘मतलब..तो फीर असली नाम क्या हैं?’
‘इतनी फिल्में देखते हो, दिनरात गाने सुनते हो, और मेरा नाम मालूम नहीं..‘भाई भाई’में पिस्तेवाले पठान का नाम क्या हैं? मेरा नाम अब्दुल रहेमान, पिस्तावाला मं हूं.. दादाने मुझे ‘मिर्झा’ बनाही दिया.’
‘वो कैसे?’
‘व्ही. शांताराम की एक पुरानी- फोर्टीवनकी- फिल्म थी, ‘पडोसी’, जो मराठीमें ‘शेजारी’ नामसे बनी थी. वो मुझे दिखाने दादा ले गये एक दिन. दो िहदू-मुसलमान पडोसी दोस्तोंकी कहानी थी वो. कोई केशवराव भोलेने िहदू का और गजानन जांगीरदारने मुसलमान दोस्तका किरदार निभाया था. उसमे जांगीरदारका नाम ‘मिर्झा’ था. क्या गजबकी अॅक्टिंग की थी जागीरदारने. उनका पेहेनावा, वो अदब, वो नमाज अदा करना, कौन कहेगा वो िहदू हैं! बिलकूल लाजवाब.. बस्स, तबसे दादा मुझे पुकारनें लगे मिर्झा.’ स्वत:शीच हसत मिर्झाचाचा एकदम गंभीर झाले.
‘फिल्म फोर्टीवन में बनी थी, और फोर्टीसेव्हन में मुल्क आझाद हुवा. लेकीन बटवारा होकर! उस बटवारे में कितना खून-खराबा हुवा, लाखों जानें गयी. इन्सानकी नियत बदल गयी.. इन्सानियतही मर गयी! इन्सानही हैवान हो गया.. सब जगह दहशत, खौफ.’
इतका वेळ नुसतं ऐकणाऱ्या चाचींचे डोळे पाणावले.. ते दुपट्टय़ानं पुसत त्या दुसरीकडे पाहू लागल्या. काहीच कळेना. ते पाहून मिर्झाचाचाच म्हणाले, ‘कुछ नही बेटे, जैसे मं लखनौसे हूं, वैसे तुम्हारी चाची लाहोरसें हैं.. जो अब पाकिस्तान में हैं. शादी होनेके बाद इतने सालोमें ये कभी मायके नहीं जा सकीं.. बातें निकालतीं हैं, तो ऐसेही बारीश होती हैं..’ अन् हसत हसत त्यांनी प्रसंग सावरायचा प्रयत्न केला. ‘कोई मर्द क्या जानें मायका क्या होता हैं !’ असं म्हणत, चाचीदेखील डोळे पुसत हसल्या. ‘हाँ हां, मर्द तो वैसेही बदनाम हैं..’ मिर्झाचाचांची नाटकीपणाने कबुली. ‘किसकी बदनामी चल रही हैं, भाई?’ घरात शिरताच दादांचा सवाल. सगळा किस्सा समजल्यावर मित्राच्या बचावासाठी साक्ष सुरू झाली.. ‘तो भाभीजी, आपने ‘काबुलीवाला’ देखी बलराज सहानीकी? ऐ मेरे प्यारे वतन- ऐ मेरे बिछडे चमन, गाना तो सुना होगा ना?
कलकत्ते में रहनेवाला, अपने देशके लिये- काबूल के लिये तडपनेवाला काबुलीवाला, भी एक मर्द था. पठाण था.. अब्दुल रहेमान पठाण. तो हमारे दोस्त अब्दुल रहेमानजी को क्यूं बदनाम कर रहीं हैं आप?’
‘आप तो भाईजान पुलिसवाले ठेहरे.. आपसे कौन जितेगा!’ चाची म्हणाल्या, अन् तो विषय हास्यकल्लोळात संपला. त्यानंतर तीनचार महिन्यांनीच ग्रांटरोडला त्यांनी घेतलेलं नवं अडीच खोल्यांचं घर बघायला आम्ही गेलो होतो. घर दाखविल्यावर मोठय़ांच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा मिर्झाचाचा मला म्हणाले, ‘गाना सुनोगे? मुगले-आझम देखी हैं ना?’
‘हा दो बार. लोटस और मराठा मंदिर में.’
‘क्या थियेटर बना हैं, मराठा मंदिर! और के. असिफने भी ‘मुगले -आझम’ के लिये मराठा मंदिरही चुना! यही है इंडिया..’ असं म्हणत त्यांनी नव्या रेडीओग्राममध्ये दोनतीन रेकॉर्डस लावून ठेवल्या. सुरुवातीलाच बासरीचा सूर भरून राहिला त्या जागेत. नंतर लताचं अप्रतिम गाणं..‘मोहे पनघट्पे नंदलाल छेड गयो रे..!’ अन् मग गाण्यांच्या लडी सुटतच राहिल्या अन् मोठय़ांच्या गप्पा एकीकडे सुरूच राहिल्या. शेवटी ‘चौदहवी का चांद’मधलं रफीचं गाणं सुरू झालं, ‘ये लखनौ की सरजमी..’ तेव्हा गप्पा एकदम थांबल्या. मिर्झाचाचा मन लावून ऐकू लागले, भावविवश झाले. ते पाहून चाची हसून म्हणाल्या, ‘देखो, लखनौ में कैसे खो गये, अब बारीश भी होगी!’ अन् हास्यकल्लोळ झाला.
नंतर चारेक वर्षांनी गणपतीतच घरी आले तेव्हा ते दोघेही नुकतेच ‘हज’ यात्रेहून आले होते. तिथून परत येताना, किती खटपटी करून पाकिस्तानातून लाहोरमाग्रे आले, तो रसभरीत किस्सा सांगितला, अन् शेवटी म्हणाले, ‘फिर भी मर्द तो वैसेही बदनाम है, मायका क्या होता है उन्हें क्या मालूम!’ तेव्हा चाचींनी लाजवाब लाजून दाद दिली!
हे असं येणंजाणं चालूच राहिलं, मत्री चालूच राहिली..
पोलीस क्वार्टर्स सोडून उपनगरात सोसायटीत राहायला आल्यावर, मात्र येणंजाणं कमी होत गेलं. पण ‘गणपती’ कधी चुकले नाहीत त्यांचे. ते यायचे तेव्हा मात्र, सोसायटीतल्या इतरांच्या नजरेत संशयास्पद कुतूहल असायचं. दादांच्या पश्चात ते येणंजाणंदेखील जवळजवळ संपलंच. घरी फोन आल्यामुळे अधनंमधनं फोन व्हायचे एव्हढंच. ८८-८९ साली टी.व्ही.वर ‘महाभारत’ सिरीयल असायची, बी.आर.चोप्रांची. रविवारी एपिसोड संपल्यावर कधी त्यांचा फोन यायचा. काही शंका असायच्या, भीष्म- कृष्ण- विदूर यांच्या भूमिकांची चर्चा, अॅिक्टगचं कौतुक, त्यांचे संवाद.. याविषयी भरपूर बोलायचे. अन् ‘कई सालोंके बाद, शायद मुगले आझम के बाद कुछ अच्छा देखनेको मिल रहा है..’ असा समारोप व्हायचा.
नंतरच्या विसेक वर्षांत सारा माहोलच बदलला. ९२-९३ सालच्या धार्मिक दंगल- बॉम्बस्फोटांत, नव्या पिढय़ांना फाळणीनंतरच्या दहशतीची- धार्मिक विद्वेषाची झलक मिळाली. निर्भयता संपली. सगळीकडे संशयास्पद दहशतीचं वातावरण. गणपती-रमजानसारखे सण देखील दहशतीखाली साजरे होऊ लागले.. सण-समारंभ साजरे करण्यासाठी सुरक्षा दलाची पथकं, चोवीस तास गस्त घालणारी पोलिसांची सन्यसदृश्य वाहनं, सर्वदूर बसविलेले सी.सी.टी.व्ही.कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स- सेन्सर्स, बॉम्ब डिटेक्टर- डिफ्युजिंग एक्स्पर्ट्स,.. उत्सवप्रिय भक्तांच्या अन् देवांच्याही (!) संरक्षणासाठी केव्हढा आटापिटा! संरक्षण धार्मिक दहशतवादापासून. दोन्ही समाजांतील दरी वाढतच गेली.
दहाबारा वर्षांपूर्वी मिर्झाचाचांना, हृदयविकारानं गंभीर आजारी असल्याचं कळल्यानंतर भेटायला गेलो होतो. ‘बहुत अच्छा लगा तुम आ गये.. वैसे अब ठीक हूं, उपरवालेने अबतक तो संभाल लिया है.. ! दुकान एक की दो हो गयी.. बच्चे संभालते हैं. मुझे ये पांच मंझिलें चढना मना हैं.. कितनी बार भी उतर सकता हूं.’ स्वत:च्याच विनोदावर ते हसले. मग म्हणाले,
‘इस बक्से में क्या लाये हो?’
‘गणपती का प्रशाद हैं.. कलही विसर्जन हुवा.’
‘कितने साल आता था गणपती में. अब तो सारा माहोलही बिगड गया है..! बच्चोंको दो घर लेके दिये मिरारोड में. बांद्रा- माहीम तो ताकत से बाहर था, और मुंब्रा तो सेन्ट्रल रेल्वेपें पडता है..फिर वहां तो गरकानुनी इमारतें ज्यादा बनती है, कौन रिस्क लेगा? और दुसरी जगह सोसायटी में ‘हमे’ कौन लेगा.’ ते विषादानं हसले.
‘एक समय आपने कहा था, मुगले आझम के लिए मराठा मंदिर चुना था, के.असिफने, याद है?’
‘बेटे यही वो ‘समय’ है ‘महाभारत’वाला..! गीता हो या कुरान, समय बडा बलवान. कितने साल हुवे, दादाको गुजरे.. हम दोनोंने लिबर्टी में बी. आर. चोप्रा की ‘वक्त’ देखीं थी. वैसे भी दादा बलराज साहनी का फॅन था. उस फिल्ममे गाना था, ‘वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज, वक्तकी हर शय गुलाम, वक्तका हर शयपे राज..!’ मिर्झाचाचांचे डोळे पाणावले.. आठवणींनी वाहू लागले.
‘अब बस भी करो.. ज्यादा बोलना इन्हें मना है, फिर भी बोलतेही रहते हैं.’ चाची त्यांना कुठवर थांबवणार ? मीच निरोप घेऊन उठलो. दोनेक वर्षांपूर्वी त्यांच्या दुकानात फोन केला..
‘आपको नहीं मालूम पडा? पिताजींकों गुजरे देढ साल हुवा. किसीने बताया नहीं आपको?’ या प्रश्नाला उत्तर काय असणार? फोन ठेवताना आधीच्या-शेवटच्या भेटीतलं बोलणं आठवलं. ‘वैसे अब मेरा कुछ भरोसा नहीं.. दुकान-घर सब कानुनी हिसाबसे बच्चोमें बांट दिया है. ‘बटवारा तो होनाही था, लेकीन फिर भी बच्चें खूश नहीं हैं.. आपसमें झगडते रहते हैं. घरमें बिलकुल शांती नहीं हैं.. क्या करे ?’
तोच हताश प्रश्न.. अजूनही उत्तर न सापडलेला.. फाळणी झाल्यापासून छळणारा. ‘बटवारा तो होनाही था, लेकीन अब भी आपसमें झगडते रहते हैं.. बिलकुल शांती नही हैं घरमे.. क्या करें ?’

More Stories onब्लॉगBlog
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog division
First published on: 29-03-2014 at 01:01 IST