१) प्युअर सिल्कची साडी घरच्या घरी ड्राय क्लिन कशी कराल?
प्युअर सिल्कची साडी म्हणजे अनेकींचा जीव की प्राण. ही प्युअर सिल्कची साडी जपणं म्हणजे कौशल्याचंच काम.  प्युअर सिल्कची साडी घरच्या घरी कशी ड्राय क्लिन करावी हे पाहणार आहोत. याकरता लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे.
साहित्य- गुळ, व्हिनेगर, तीन बादल्या पाणी, स्टार्च (दोन चमचे)
कृती- दोन चमचे गुळ व दोन चमचे व्हिनेगर  एकत्र करून एक बादली पाण्यात मिसळा. या पाण्यात थोडावेळ साडी भिजवून ठेवा. ही भिजवलेली साडी आता दुसऱ्या बादलीतील पाण्यात घाला. या पाण्यात नुसते व्हिनेगर मिसळून मगच साडी भिजवा. नंतर एका बादलीत पाणी घेऊन त्याच  स्टार्च मिसळा. त्यात साडी भिजवून ती बाहेर काढावी व किंचीतसे पाणी निथळून झाल्यानंतर वाळत घालावी. यामुळे साडीचा रंगही पक्का होतो व साडीला चमक येते.
२) कॉटन सिल्क, चंदेरी, शिफॉन व प्युअर सिल्क प्रकारातील कापडाचे ड्रेस किंवा साडी घरच्या घरी धुण्याची कृती.
साहित्य- कोणताही शाम्पु दोन चमचे किंवा अंगाचा साबण, दोन बादल्या पाणी.
कृती- दोन चमचे शाम्पू पाण्यात मिसळून त्यात ड्रेस किंवा साडी पाच मिनीटं भिजत घालावी. आता दुसऱ्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या. त्यात शाम्पुमध्ये भिजवलेला ड्रेस वा साडी टाका. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात तिसऱ्यांदा ड्रेस किंवा साडी भिजवून मग वाळत घाला. जर घरात शाम्पू नसेल तर अंगाचा साबण (लक्स किंवा सिंथॉल सारखा) ड्रेस किंवा साडीला लावून हलक्या हाताने धुऊन टाका.
सुनंदा घोलप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry clean at home
First published on: 10-01-2015 at 01:01 IST