हॉस्पिटलमध्ये मी दोन भिन्न स्वभावाच्या आजी-आजोबांना रोज भेटते. एका गटात एकदम उत्साही/आनंदी आणि आजारांशी/आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणारे आजी-आजोबा असतात आणि दुसऱ्या गटात चिडचिड करणारे आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणी निराश असणारे आजी-आजोबा असतात!  वय झालं की चिडचिड होतेच हे सर्वश्रुत आहे. मन/मनातील भावना आणि आपला आहार यांचा परस्परांशी काय संबंध आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.
आपण जे अन्न खातो, त्यामधून म्हणजेच आपल्याला मिळणाऱ्या अन्नद्रव्यांमधून शरीरामध्ये चांगले संदेश-वाहक बनवण्यासाठी काही आवश्यक ‘कच्चामाल’ पुरवावा लागतो. उदा. प्रथिने (टायरोसिन नावाचे), योग्य स्वरूपातील कबरेदके, फॉलिक अ‍ॅसिड, कोलिन, सेलेनियमसारखी अन्नद्रव्ये! म्हणजे ज्या वेळी उगाचच चिडचिड होते, त्याचा संदर्भ जसा आपण आपल्या आजूबाजूला घडलेल्या परिस्थितीशी लावतो तसाच तो आपल्या आहाराशीसुद्धा निगडित आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आहारामध्ये सातत्य ठेवणे जरुरीचे आहे.
मूड चांगला राहण्यासाठी आहारमंत्र : थोडे थोडे खा, पण दिवसातून ४-५ वेळा खा.
-जीवनसत्त्व क, िझक, फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थाचे सेवन करणे जेणेकरून ‘सेरोटोनिन’ संदेशवाहक योग्य प्रमाणात बनून मूड छान राहू शकतो.
मूड ‘सांभाळणारे’ पदार्थ – सोयाबीन, केळे, दही, तीळ, भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, चवळी, अळशीच्या बिया, पॉलिश न केलेली धान्ये, डार्क चॉकलेट, बदाम, अक्रोड, आवळा, संत्रे, मोसंबी, पालक, पेरू, सूर्यफूल-भोपळ्याच्या बिया,  वगरे + संतुलित आहार.
मूड ‘बिघडवणारे’ पदार्थ-  मदायुक्त पदार्थ जसे ब्रेड, बिस्कीट, नुडल्स वगरे, उत्तेजक पेय जसे कॉफी, चहा, अल्कोहोलयुक्त पेय, अतिसाखरेचे पदार्थ (गोड) , प्रीझरवेटिव्ह घातलेले पदार्थ, अजिनोमोटो,  परत परत तापवलेल्या तेलातील तळकट पदार्थ, शिळे अन्नपदार्थ वगरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat with happiness
First published on: 22-02-2014 at 01:04 IST