ज्येष्ठ नागरिकांना अगदी सहजपणे आपल्या संगणकाच्या मदतीने म्हणजेच ऑनलाइन नोंदणी पद्धतीने ‘ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र’ मिळावे यासाठी सरकारी यंत्रणांतर्फे उपाययोजना करण्यात आलेली आहे. आजी-आजोबा, आज आपण मुंबई विभागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ‘ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र’ कसे काढावे याची माहिती घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम अ‍ॅड्रेसबारमध्ये जाऊन http://mumbaicitysetu.org/1FormSeniorCitizen.aspx असे टाइप करा.
आता आपल्यासमोर सुरू झालेल्या पानावर काही रकाने दिसतील. त्यात आपली वैयक्तिक माहिती भरा. यात आपल्याला आपली जन्मतारीख, संपूर्ण पत्ता, नाव, मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. माहिती भरून झाल्यावर ‘सबमिट’चे बटण दाबा. समजा, यातील एखादी माहिती चुकली असेल तर ‘रिसेट’चे बटण दाबून पुन्हा माहिती भरा.
आता भरलेल्या माहितीची खातरजमा करून ती योग्य असल्यास ‘सबमिट’च्या बटणावर क्लिक करा. आपल्यासमोर आता ‘ओके’ असे लिहिलेली एक िवडो येईल, त्यावर क्लिक करा.
भरलेल्या माहितीचा िपट्रआऊट घेऊन तिथे नमूद केलेल्या कागदपत्रांसहित हा ऑनलाइन फॉर्म सरकारी कार्यालयात जमा करा. हा फॉर्म भरून झाल्यावर आपल्याला यूआयडी क्रमांक दिला जाईल, तो जपून ठेवा.
या क्रमांकावरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल. ऑनलाइन पद्धत यासाठी सोयीस्कर, कारण रांगेत उभे राहणे, कार्यालयाच्या फेऱ्या मारणे यातून ज्येष्ठांची सुटका होऊ शकेल. आणि तुमच्या हातात असेल तुमचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship with computer
First published on: 08-11-2014 at 04:11 IST