फुलांचे अगणित प्रकार आहेत. एकाच प्रकारची परंतु थोडासा फरक असणारीच बरीच फुलझाडे आहेत. उदा. झेंडू, शेवंती, जास्वंद, कन्हेर, गुलाब. जाई-जुई, मोगरा, तगर, दूधमोगरा, रातराणी वगैरे. या सगळ्यांची कलमं लागतात. तयार रोपे लावल्यास जमिनीत किंवा कुंडय़ात लवकर रुजतात. या सर्व फुलांबरोबर मला हेही सांगावंसं वाटतं की, फळ येण्याअगोदर फळांच्या वेलींना किंवा झाडांना फुले ही यायलाच हवी. ती फुले पण सुंदर आकर्षक रंगांची असतात.
फुलांबरोबर घरच्या कुंडय़ांमध्ये तुळस, गवती चहा, आलं, लसूण, हळद हेसुद्धा लावता येतात. गवत म्हणजे दुर्वा, हरळी राखल्यास त्याचा उपयोग गणपतीस वाहण्यासाठी करू शकतात. जमिनीवरील हिरवळ म्हणून चांगली दिसते. एखादा किलोमीटर हिरवळीवर रोज चालल्यास पायातील उष्णता कमी होते. हरळीलाही सुंदर पिवळी फुले येतात. या अफाट जगात निसर्गाच्या सान्निध्यात असताना मन ताजे राहते, प्रसन्न वाटते. आपल्या गच्ची किंवा गॅलरीतही परसबाग फुलवाल व त्याच्या सहवासात राहाल तेव्हा बघा किती प्रसन्न वाटतं ते..
तारा माहूरकर -tara@mahurkars.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurden in bin
First published on: 07-02-2015 at 01:00 IST