* भेंडी चिरून आदल्या दिवशी फ्रिजमध्ये ठेवावी व दुसऱ्या दिवशी करायच्या दोन तास आधी बाहेर काढावी म्हणजे भाजी चिकट होत नाही.
* पुरणाची डाळ दोन तास आधी भिजवावी म्हणजे डाळ एकजीव शिजते.
* डािळबीच्या उसळीला (कडवे वाल) ओव्याची फोडणी द्यावी, त्याने पित्त/गॅसेस होत नाहीत.
* पालेभाज्या व फळभाज्या करताना फोडणीत थोडी मेथीपूड घालावी. भाजीला खमंग सुवास येतो व चवही छान येते.
* उकडीचे मोदक करताना पाण्यामध्ये चिमूटभर मीठ, अर्धा चमचा साखर व एक टीस्पून लोणी घालावे साखरेमुळे चकाकी येते व लोण्यामुळे मोदक मऊ व  लुसलुशीत राहतो.
* पोहे करताना कांदे व बटाटे शिजल्यावर त्यात थोडे पाणी घालावे व नंतर दोन मिनिटांनी पोहे घालावेत म्हणजे पोहे मऊ होतात.
* मटारची उसळ करताना मटार शिजवल्यावर गॅस बंद करावा व अध्र्या तासाने त्यात गुळाऐवजी साखर घालावी त्यामुळे मटारचा रंग हिरवा राहतो.
* साबुदाणा शिळा झाल्यावर थोडा कडक होतो. त्याची खिचडी करताना गरम दुधाचा शिपका मारावा म्हणजे खिचडी मऊ होते.
* टोमॅटोचे सार करताना अर्धा किलो टोमॅटोमध्ये एक गाजर, पाव बीट व लाल भोपळ्याची छोटी फोड उकडताना घालावी.
मिक्सरमधून काढताना थोडे ओले खोबरे घातल्याने चव छान येते व बीट गाजराने रंगसंगती सुसंगत होते. नंतर जिरे व लाल मिरच्यांची फोडणी द्यावी. ओल्या खोबऱ्याने त्यातील पोषक तत्त्वे वाढतात.
सुनंदा घोलप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen tips
First published on: 03-01-2015 at 03:52 IST