धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..
आमच्या ‘माझा त्याग, माझं समाधान’ साठीच्या आवाहनाला तुम्ही दिलेल्या तुडुंब प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. या प्रतिसादातील काही अनुभव खरोखरच मन हेलावणारे आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रीला कोणकोणत्या पातळीवर त्याग करावे लागतात हे वाचणे खरोखरच अंतर्मुख करणारे आहे. मात्र या प्रतिसादात अशी अनेक पत्रे आहेत ज्यांचा समावेश या सदरात करता येणे शक्य नाही. त्यांच्या भावनांचा आम्ही नक्कीच आदर करतो, मात्र हे  सदर फक्त आणि फक्त नोकरदार वा व्यावसायिक स्त्रियांसाठी आहे. नोकरीचा त्याग ही तडजोड येथे अपेक्षित नाही,  नोकरी-व्यवसाय करत असतानाच घरची आघाडी सांभाळताना कराव्या लागणाऱ्या तडजोडींचे  किंवा नव्या गोष्टींचा स्वीकार करण्याचे तुमचे अनुभव पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हेच या सदराचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच कृपया नोकरीचा मध्येच राजीनामा देणाऱ्या किंवा काही काळानंतर पुन्हा ती करणे वा इतर काही उद्योग सुरू करणाऱ्या  प्रतिक्रियाचा या सदरात समावेश करता येणार नाही. आमच्या अशा मैत्रिणींनी कृपया न रागावता आम्हाला सहकार्य करावे.  
आम्हाला हवेत असे अनुभव –  आयुष्यभर नोकरी-व्यवसाय आणि संसार यांची सांगड घालताना जेव्हा जेव्हा तुम्ही थांबलात, अडलात, निराश झालात, द्विधा मनस्थिती झाली तेव्हा काय समजावलंत मनाला?  कोणते निर्णय घेतलेत? कोणते त्याग केलेत?  कोणत्या पारंपरिक गोष्टींना फाटा दिला?  कोणत्या नवीन गोष्टी आत्मसात केल्या?  ज्यामुळे तुम्ही आज या घडीला दोन्ही आघाडय़ांवर समाधानी आहात.  हे सदर पुढील वर्षी (२०१५)  शनिवारी चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध होणार असून फक्त एक वा दोनच अनुभव पाठवावेत. लेखाची शब्दमर्यादा ३०० असून ठोस आणि वेगळ्या घटना, प्रसंगांचेच स्वागत असेल. तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या पत्त्यावर वा  ई मेलवर पाठवावेत. सोबत आपला संपर्क क्रमांक असणे गरजेचे.  पाकिटावर वा ई मेल सब्जेक्टमध्ये  ‘माझा त्याग, माझं समाधान’ असा उल्लेख अवश्य करावा.  पत्ता- लोकसत्ता-चतुरंग पुरवणी विभाग, प्लॉट नं. ईएल १३८,  टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४०० ७१०  ई मेल -chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta thanks to readers for great response
First published on: 27-12-2014 at 01:01 IST