० गिफ्ट पाकीट चिकटवण्यासाठी गोंद किंवा ग्लू स्टिक न मिळाल्यास पाकिटाच्या कडांना नेलपॉलिश लावून ते बंद करा. रंगीत नेलपेंट असेल तर छान आउटलाइन करू शकाल आणि पारदर्शक नेलपेंट असेल तर नेहमीप्रमाणे चिकटवता येईल.
० सुईमध्ये सहजपणे दोरा ओवण्यासाठी दोऱ्याचे टोक नेलपेंटमध्ये हलकेच बुडवून घ्या. सुकून कडक झाल्यावर सुईच्या नेढय़ात दोरा सहजपणे घालता येईल.
० अनेकदा कृत्रिम दागिनांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. आंगठी, कानातले, हार यासारखे दागिने घातल्यावर शरीराच्या त्या भागावरील त्वचा हिरवी/ लालसर होते. अशा वेळी त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या दागिन्यांना खालच्या बाजूने पारदर्शक नेलपेंटचा थर द्यावा म्हणजे ही समस्या उद्भवणार नाही.
० घराबाहेर पडताना अचानक कॅनवासच्या शूजची लेस निघाल्याचे लक्षात आल्यावर पारदर्शक नेलपेंटने ती त्वरित चिकटवता येईल.
० घराबाहेर पडल्यावर ड्रेस, चुडीदार, लेगिन्स याला छिद्र पडल्याचे लक्षात आल्यास आणि बदलायला वेळ नसल्यास त्या भागाच्या भोवती पारदर्शी नेलपेंट लावावे. तो भाग कडक झाल्यामुळे फार ताणला जात नाही.
० डिझायनर कपडय़ांवर वेगवेगळ्या खडय़ांचा वापर केलेला असतो. कितीही काळजी घेतली तरी त्यातील खडे पडण्याची शक्यता असते. ते पडू नयेत म्हणून त्यावर पारदर्शी नेलपेंट लावावे. याचप्रमाणे नाकातील चमकी, कानातील टॉप, बांगडय़ा, नेकलेस यांवरील खडे पडू नयेत यासाठी त्यावर पारदर्शी नेलपेंटचा थर लावावा.
० फर्निचरवरील वॉर्निशवर चरे पडले असतील तर त्यावर पारदर्शी नेलपेंटचा थर लावून, सुकल्यावर १० मिनिटांनी सॅण्डपेपरने हलक्या हाताने घासून घ्यावे.
०आपल्याकडे चाव्यांचा जुडगा असतो. पण गडबडीत हवी ती चावी सापडत नाही आणि प्रत्येक चावी लावून पाहावी लागते. हे टाळायचे असल्यास मेन डोअर, सेफ्टी डोअर, कपाट, ऑफिस या चाव्यांना वेगवेगळ्या रंगांच्या नेलपेंटचे मार्किंग करून ठेवावे. म्हणजे गोंधळ होणार नाही.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nail paint
First published on: 04-07-2015 at 12:11 IST