घटस्फोट किंवा जोडीदाराचे निधन झाल्यावर एकटेपणा जाणवणारी अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात. एकटेपणातून स्वतला खेचून बाहेर काढावे लागते. त्यासाठी निरनिराळे छंद उपयोगी पडू शकतात. अनेक गोष्टी शिकता येतात. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी लग्न किंवा भिन्न िलगी मत्री हा एकमेव उपाय नाही, हे स्वतला बजावून सांगावे लागते. नव्याने स्वतकडे पाहायला शिकावं लागतं.
संगीता साधारण ४३/४४ वर्षांची. मुलगा १०वीत शिकत होता. तिच्या नवऱ्याचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. आणि त्यामुळे मानसिकदृष्टय़ा ती उद्ध्वस्त झाली होती. कुठल्याशा कारणानं किरणची आणि तिची गाठभेट झाली. आणि काही काळातच भावनिकदृष्टय़ा ती गुंतून गेली. किरणला ते जाणवलं पण तिला पटकन तोडून टाकणं त्याला जमेना. पण त्याला स्वतचा संसार  होता. हे भान त्याला होतं. म्हणताना ती म्हणे की मला तुझा संसार मोडायचा नाही. पण वागताना तिचं स्वतवर नियंत्रण नव्हतं, पण किरण हुशार होता. स्वहित म्हणजे नेमकं काय याची त्याला चांगली जाण होती.
 त्यानं एक दिवस आपली पत्नी गिरिजा हिला विश्वासात घेऊन संगीताची अडचण सांगितली आणि त्यांची भेट घालून दिली. आज संगीता आणि गिरिजा छान मत्रिणी आहेत आणि संगीताची काळजी घेणारं एक सबंध कुटुंब तिला मिळालं आहे आणि त्यामुळे तिचंही किरणवरचं अवलंबित्व संपलं आहे. पण असं तारतम्यानं वागणारे लोक अभावानंच आढळतात.
एकटे राहणाऱ्या अनेक स्त्रियांना अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. आज समाजात एकएकटे राहणारे अनेक स्त्री-पुरुष आढळतात. अनेकदा एकटे राहणे हा पर्याय काही जणांनी स्वतहूनच स्वीकारलेला आढळतो. त्यांना अशा गुंतागुंतीनाही सामोरं जावं लागतं. पण काही वेळा अशाही अनेक व्यक्ती आपण पाहातो, ज्यांच्यावर एकटेपण परिस्थितीमुळे लादलं गेलेलं असतं. लग्न वेळेवर न जमल्यामुळे अनेक प्रौढ स्त्री-पुरुष समाजात निराशेनं वावरताना आढळतात.
संपदा एक ३७ वर्षांची प्रौढ कुमारिका.  शिकलेली, चांगली नोकरी असलेली. स्वतचं वेगळं घरही तिनं घेतलं होतं. त्यात ती एकटीच राहत होती. ती म्हणाली, दिवस जातो कामात, पण घरी आली की घर खायला उठतं. खूप एकटं वाटतं. या आधी ती अर्थातच आईकडे राहत होती, पण नंतर भावाचे लग्न झाले आणि भावजयीबरोबर तिचे खटके उडू लागले. आईला तसाही एका बाजूला तिच्याबद्दल राग होता आणि दुसऱ्या बाजूला तिची काळजीही वाटत होती. सुरुवातीला आलेली चांगली स्थळे तिनं उगीचच चिकित्सा करून नाकारली असं तिच्या आईचं स्पष्ट मत होतं. आणि त्यामुळेच हे एकाकीपण वाटय़ाला आलंय, असं आईला वाटत होतं. संपदाच्या स्वभावात एक प्रकारची कटुता ही तिच्या आईला जाणवत होती. ऑफिसमध्ये पुरुषांबरोबर गप्पा मारणं हे तिला जास्त सोयीचं वाटत असे. ऑफिसमधल्या बायकांच्या गप्पांचे विषय तिच्या जगात नव्हतेच. तिच्या मनात येई, बायका कितीही शिकल्या तरी  किंवा कितीही मोठय़ा पोस्टवर काम केलं तरी नवरा, मुलं, नवीन पदार्थाच्या रेसिपीज, दागिने, कपडे याशिवाय त्यांच्याकडे विषय तरी कुठे असतात? पण पुरुषांच्या पुढे पुढे करणारी असा एक सिनिकल शेरा तिच्यावर मारला जाई, त्याने ती अस्वस्थ होत असे. एकूणच आयुष्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता.
 घटस्फोटाचा वाढलेला दर पाहता एकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात अपत्य नसलेल्या स्त्रीचा पुनर्वविाह होताना फारशा अडचणी येताना दिसत नाहीत. फारशी चिकित्सा केली नाही आणि आधीच्या लग्नाचा कटू अनुभव थोडा वेळ बाजूला ठेवून परत मोकळ्या मनानं जोडीदार निवडीला सुरुवात केली तर परत एकदा वैवाहिक जीवनाचा आनंद त्या व्यक्ती घेऊ शकतात. पण आधीच्या लग्नापासून अपत्य असेल तर घटस्फोटाच्या केसमध्ये त्या अपत्याची कस्टडी आईकडे असते. त्यामुळे अपत्य असूनही अशावेळी पुरुष स्वतला विनापत्य समजतो आणि पुनर्वविाहासाठी त्यांची अपेक्षा विनापत्य वधूचीच असते. एक वेळ स्त्रीची एखाद्या पुरुषाला अपत्यासहित स्वीकारायची तयारी असते, पण दुसऱ्या पुरुषापासून झालेले मूल मी का स्वीकारू अशी कोती मनोवृत्ती अनेक ठिकाणी दिसते. काही अपवाद असतीलही, पण सर्वसाधारणपणे समाजाचा काळ हा असाच दिसतो. त्यामुळे अपत्य असलेल्या स्त्रीचा पुनर्वविाह ही कठीण होत चाललेली गोष्ट आहे. घटस्फोटाची वेळ आलेल्या अनेकांप्रमाणेच विधवा, विधुर या लोकांचे प्रश्नही अनुत्तरितच आहेत.
सानिका एक साधारण ४० वष्रे वयाची, एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. १५ वष्रे वयाची मुलगी होती तिला, आणि दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा गेला होता. तिनं एक छोटं घर भाडय़ानं घेतलं होतं त्यात ती आणि तिची मुलगी राहत होत्या. तिच्या शेजारीच त्या घराचा मालक राहत होता. रोज संध्याकाळी ती ऑफिसमधून घरी आली की हा त्या जागेचा मालक तिच्या घरी येऊन बसत असे गप्पा मारायला. सुरुवातीला तिनं त्यांना माणुसकीच्या नात्यानं या, बसा वगरे केलं. स्वतसाठी करत असलेल्या चहामध्ये त्यांच्यासाठीही केला. पण हे रोजच व्हायला लागल्यावर तिला ते असह्य़ होऊ लागलं. त्यात तो जागेचा मालक. तिला तिच्याच घरात प्रायव्हसी मिळत नव्हती. तिनं त्याला सांगितलं की आता मला काम करायचे आहे. तर तो म्हणे मी बसतो ना, तुमच्या कामांच्या मध्ये मी येत नाही. पण त्याच्यासमोर घरातली कामे करताना तिला संकोच वाटत असे. तो तिला रूढार्थानं त्रास देत नसे, पण त्याचे असे कायम घरात बसणे आणि तिच्याकडे पाहत राहणं यानं ती अस्वस्थ होऊ लागली. नुकतीच ११ महिन्याचे करारावर जागा घेतली होती. आता परत कुठे जागा पाहू? तिचा सवाल बिनतोड होता. त्यातून तिला तिच्या वयात आलेल्या मुलीचीही काळजी वाटत होती.
एकटेपणा जाणवणारी अशी अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात.     
एकटेपणातून स्वतला खेचून बाहेर काढावे लागते. त्यासाठी निरनिराळे छंद उपयोगी पडू शकतात. निरनिराळ्या गोष्टी शिकता येतात. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी लग्न किंवा भिन्निलगी मत्री हा एकमेव उपाय नाही, हे स्वतला बजावून सांगावे लागते. नव्याने स्वतकडे पाहायला शिकावं लागतं. काही दिवसांपूर्वी एक निराळाच अनुभव आला. अभय परदेशी राहत होता. काही दिवसांसाठी भारतात आला होता. साखरपुडा उरकून जायचं असा त्याचा बेत होता. त्याप्रमाणे रीतसर पारंपरिक कांदे-पोह्याचा कार्यक्रम होऊन मीनाशी त्याचं लग्न ठरलं. साखरपुडाही झाला. सहा महिन्यांनंतर लग्न करायचं असं ठरलं. लग्नानंतर त्याच्याबरोबर परदेशी जायला मिळावं म्हणून व्हिसाची तयारी सुरू झाली. व्हिसावर जायचे तर लग्न होणे आवश्यक होते. त्यासाठी मध्यम मार्ग म्हणून नोंदणी विवाह करायचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी तो जाण्यापूर्वी नोंदणी विवाह केला आणि तो परदेशी परत गेला. त्यांचं फोनवर बोलणं कॉम्पुटरवर चाटिंग सुरू झालं. पण काही दिवसांनतर तिला कळलं की त्याचं एक अफेअर सुरू आहे. त्याबद्दल तिनं त्याला विचारल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्यानं कबूल केलं. त्यामुळे लग्न मोडण्याचं ठरलं. पण नोंदणी विवाह झाल्याने रीतसर घटस्फोट घ्यावा लागला आणि शारीरिक संबंध न येताही ती घटस्फोटिता ठरली. आता विवाह मंडळात तिचं नाव नोंदवायचं तर ती प्रथम वधू की पुनर्वविाहेछुक? लग्नाच्या बाबतीत सामाजिक मानसिकता इतकी मागासलेली आहे की किती तरी दिवस तिचं लग्न जमत नव्हतं. त्यानं तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिच्या वडिलांना हृदयरोग सुरू झाला. आईला नैराश्यानं वेढलं. म्हणजे तिची कोणतीही चूक नसताना तिला हे सगळं सहन करावं लागलं. परत एवढय़ा सविस्तर गोष्टी किती जणांना सांगणार? त्यामुळे सामाजिक अवहेलना झाली ती निराळीच.
लग्नाच्या बाबतीतली ही मानसिकता कधी बदलणार कोण जाणे!
chaitragaur@gmail.com    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The life without partner
First published on: 16-11-2013 at 01:01 IST