पूर्णिमा शेंडे

नोकरीत इतकी वर्ष धावपळ केली. आता रिटायरमेंटमध्ये काही तरी करायचं आणि रोजची धावपळ न करताही स्वत:ला बिझी ठेवायचं, असा विचार मनात होता. तेव्हाच माझ्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एक मेसेज आला- भगवद्गीतेतले श्लोक कसे उच्चारायचे ते घरी बसल्या, ऑनलाइन शिका. मी त्यासाठी फॉर्म भरला. रोज चाळीस मिनिटं शिकवणी. सुरुवातीला आपला व्हिडीओ चालू ठेवावा लागे, म्हणजे उच्चार करताना ओठांची हालचाल काय होतेय ते त्यांना समजायचं. योग्य वेळी आपला ऑडिओ सुरू करावा लागे, तर इतर वेळी तो बंद ठेवणं अपेक्षित असे. सुरुवातीला गोंधळ होऊन ऑडिओचं बटण  कधी ‘ऑन’, तर कधी ‘ऑफ’ व्हायचं. ओरडाही मिळायचा! पण आता मी व्यवस्थित शिकलेय. श्लोकांचे व्हिडीओ करून पाठवतानाही गमतीजमती झाल्या. कधी आपला आवाजच येत नसे, कधी चेहराच गायब असे, कधी सर्व काही ठीक होतंय म्हणेपर्यंत उच्चारच चुकायचे. दिवस दिवस घालवून मी व्हिडीओ पाठवले. मेहनतीनं शिकत, रुळत गेले. स्मार्टफोननं मला हळूहळू ‘स्मार्ट’ केलं. जीवनाच्या आताच्या प्रवाहात स्मार्ट मोबाइलची इतकी गरज आहे, की हातात बाकी काही नसलं तरी चालेल; पण मोबाइल हवाच. गूगल मीट, खाद्यपदार्थ ऑर्डर करणं, चित्रपटाची तिकिटं काढणं, पेमेंट करणं याची अ‍ॅप्स वापरणं मी शिकून घेतलं.

a woman met her friend after 15 years emotional moment
Video : तब्बल १५ वर्षानंतर भेटली मैत्रीणीला! पाहा तो सुंदर क्षण, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे मित्र- मैत्रीणी
What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच

एकदा एका नेत्रहीनांच्या संस्थेसाठी ‘ऑडिओ बुक’ करण्याबद्दलचा फॉर्म मी भरला होता. त्याप्रमाणे त्यांनी मला एका ऑडिओ बुकसाठी पुस्तक घरी पाठवलं. अ‍ॅप कोणतं ते सांगितलं. मी ऑडिओ बुक करण्यासाठी पुस्तक वाचायला सुरुवात केली. आवाजाचा चढउतार करत थोडाफार ‘पॉज’ घेत शांततेत वाचत गेले. सुरुवातीला माझ्या लक्षात यायचं नाही, पण कधी दाराची बेल जोरात वाजायची, कधी मोबाइलच वाजायचा, कधी नोटिफिकेशन्सचा आवाज मोबाइलवर यायचा. असं झालं, की मी परत सुरुवातीपासून पुस्तक वाचायला लागायचे. घरात कधी तरी नकळत कुणी तरी मोठय़ानं बोलायला किंवा काही विचारायला आलं, की तो आवाज या रेकॉर्डिगमध्ये यायचा. असं काहीबाही खूप वेळा होत असे. मला उत्साह तर असायचा; पण पुस्तकाची सुरुवातीची पानं संयमानं पुन:पुन्हा वाचावी लागत असत. असं करत ते पूर्ण केलं. आता तो एक तासाचा ऑडिओ त्या संस्थेला पाठवायचा होता; पण सरळसोट काम झालं असतं तर काय बिशाद! मी ऑडिओ क्लिप पाठवत होते; पण त्या अपलोड व्हायलाच तयार नव्हत्या. मी साधारण एक-एक तासाचे पाच-सहा ऑडिओ केले होते. वाटलं, की खरं तर लगेच एकेक ऑडिओ केल्यावर त्यांना पाठवायला हवा होता; पण त्या लोकांना एक एक ऑडिओ कुठे तपासायला लावणार, असा उदात्त विचार केला आणि चांगलीच तोंडघशी पडले! नंतर चूक लक्षात आली.

ऑडिओ अपलोड करताना ‘कंटेंट १६ एमबीपेक्षा जास्त आहे’ असा मेसेज येत होता. या सर्व अडचणी बघून माझा उत्साह अगदी तळागाळापर्यंत खाली गेला. असं वाटलं, की बास, नकोच ते ऑडिओ बुक. संपूर्ण मेहनत पाण्यात! दोन-तीन दिवस असेच घालवले. कशात लक्ष लागेना. सारखा मनात विचार येऊ लागला, का झालं असं?’ तेवढय़ात त्या संस्थेतूनच काही कामासाठी फोन आला. कामाचं बोलून झाल्यावर मी जरा रडवेली होतच माझा ऑडिओ बुकचा कंटेंट अपलोड कसा होत नाहीये, ते सांगितलं. संस्थेतल्या एक मुलानं मला सावकाश, ‘वन बाय वन’ कसं अपलोड करायचं त्याच्या पायऱ्या सांगितल्या. मी अगदी मनापासून, शांतपणे शिकवल्याप्रमाणे करत गेले आणि एक एक अशा सर्व ऑडिओ क्लिप्स अपलोड झाल्या की! माझी अवस्था म्हणजे ‘आनंद पोटात माझ्या माईना!’ व्वा! म्हणत गर्रकन एक गिरकी घेतली मी!  लगोलग ‘सर्व ऑडिओ मिळाले’ असा त्यांचा फोनही आला. आता मी माझ्या वाचनाची आवड जपत अगदी सहजतेनं ऑडिओ बुक करते. त्यानिमित्तानं नवीन नवीन पुस्तकं वाचून होतात व समाजाप्रति काही तरी करतेय याचा आत्मिक आनंदसुद्धा मिळतो.