25 February 2020

News Flash

सोमकांतु नीज निर्झरी

ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णाची स्तुती करताना अर्जुनाने सोमकांत मण्याचा दृष्टांत दिला.

सोमकांतु नीज निर्झरी, चंद्रा अध्र्यादिक न करी..

ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णाची स्तुती करताना अर्जुनाने सोमकांत मण्याचा दृष्टांत दिला. सोमकांत मणी, चंद्राला पाहून आपोआप पाझरतो. त्या मण्याला, चंद्राला मुद्दाम अध्र्य द्यावं लागत नाही. थोडक्यात अर्जुन म्हणतो, अरे कृष्णा तुला पाहून मी माझेपण विसरूनच जातो. अर्जुनाचं आणि कृष्णाचं तादात्म्य इतकं होतं की कृष्णाला पाहून अर्जुन स्वत:ला विसरून जात असे. गोपीदेखील, कृष्णाला पाहून सारं काही विसरून जाई. अर्जुन जसा कृष्णाचा सखा, परमभक्त होता. तशाच गोपीही कृष्णाच्या सख्या आणि भक्त होत्या. नारदभक्ती सूत्रात, ईश्वरीभक्ती कशी असावी, याबद्दल सांगताना नारद म्हणतात.. यथा व्रज गोपीकानाम. गोपींनी जशी कृष्णाची भक्ती केली, तशी भक्ती असावी.

गोपींच्या प्रेमाबद्दल कबीराचा दोहा आहे..

कबीर कबीर क्या कहता है.

जा जमुना के तीर, एक एक गोपी के

प्रेम मे बह गये कोटी कबीर..

गोपींचे ईश्वरप्रेम कोटी कबीरांपेक्षा जास्त आहे असं कबीर सांगून जातात, एकनाथांनी, त्यांच्या गवळणींमधून, कृष्ण आणि गोपी यांचं प्रेम, गोपींची भक्ती यांचं सुरेख वर्णन केलं आहे. ‘कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा.’ यात एकनाथ वर्णन करतात, ती गोपी म्हणते, पैलतीरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. यात यमुना हे दृश्य जगाचे. प्रपंचाचे प्रतीक आहे. पुढे ते म्हणतात, गोपी म्हणते काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगड, आणा सांगड म्हणजे लाकडाची मोळी, पूर्वी नदी पार करताना लाकडाच्या मोळीचा आधार घेत. गोपी म्हणते प्रपंच ही नदी पार करण्यासाठी ईश्वरनामाची सांगड म्हणजे मोळी आणा. शेवटी एकनाथ म्हणतात.. एका जनार्दनी, मनी म्हणा देव माहात्म्य कळेना कोणा मुरली वाजवितो कान्हा..

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com

First Published on November 5, 2016 12:14 am

Web Title: somakant mani life
Next Stories
1 आनंदात राहा
2 नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग
3 दिव्यत्वाचा स्पर्श
Just Now!
X