11 August 2020

News Flash

विद्या आणि बुद्धी

आजच्या काळात विद्येला म्हणजेच शिक्षणाला अतोनात महत्त्व आहे आणि अर्थातच ते मिळवण्यासाठी बुद्धीला..

आजच्या काळात विद्येला म्हणजेच शिक्षणाला अतोनात महत्त्व आहे आणि अर्थातच ते मिळवण्यासाठी बुद्धीला.. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही गोष्टींसाठी कोणकोणते ग्रह कारक असतात?

पंचमस्थानास प्रेम, संततीबरोबर विद्या व बुद्धीचे स्थान म्हणून मानले जाते. नवग्रहामध्ये संतती व विद्या या दोन्हीचा कारक गुरू मानला जातो व बुद्धीचा कारक ग्रह बुध मानला जातो; परंतु खऱ्या अर्थाने पंचमस्थानाचा कारक ग्रह गुरू समजावा. बुद्धिकारक बुध हा वायू किंवा पृथ्वी राशीत असेल तर बुद्धी उत्तम असते. म्हणजे हा बुध वृषभ, मिथुन, कन्या, मकर व कुंभ राशीचा असावा.
गुरू, बुध, शनी हे ग्रह बलवान राशीला म्हणजे गुरू सिंह, धनू, कर्क राशीमध्ये असावा. शनी तुला, मकर, कुंभ राशीमध्ये असावा. हर्षल मीन, कुंभ राशीमध्ये. नेपच्यून मिथुन, सिंह, कर्क, धनू राशीमध्ये असावा. बुध हा ग्रह सिंह राशीमध्ये किंवा कन्या व मिथुन राशीमध्ये रवीबरोबर असेल किंवा मिथुन कन्या राशीमध्ये राहूबरोबर असेल, बुद्धी अतिशय कुशाग्र असते व स्मरणशक्ती चांगली व आकलनशक्तीकोणत्याही विषयामध्ये चांगली असते.
पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचे स्वामी रवी, बुध, गुरू, शुक्र असतील व ते ग्रह स्वगृही किंवा मित्रगृही असतील व ३, ४, ५, ९, १२ या स्थानी किंवा पंचमेशावर बुध, मंगळ, गुरू, शुक्र, हर्षल यांचे शुभयोग होत असतील, तर असे लोक बुद्धिमान असतात. पंचमस्थानाचा स्वामी शनी मंगळाच्या म्हणजे १०, ११, १, ८ राशीला असेल व तो पापस्थानामध्ये ६, ८, १२ स्थानी असेल व गुरू बलहीन किंवा बुध बलहीन असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही.
कुंडलीमध्ये पंचमस्थानी मंगळ, शनी, राहू, केतू अगर वक्री नेपच्यून असेल, तर शिक्षण पूर्ण होत नाही. पंचमस्थानी बलहीन चंद्र, रवी असलेले मुले-मुली अभ्यासामध्ये हुशार होत नसतात. पंचमस्थानमधील रवी, मेष, सिंह, धनू या अग्निराशीमध्ये नसेल, तर बुद्धी मंद ठेवील; परंतु चंद्र पंचमस्थानामध्ये असेल तर हे लोक आपल्या संसारामध्ये छान गर्क असतात.
गुरू हा ग्रह विद्य्ोचाच कारक आहे व तो पंचमस्थानाचाही कारक ग्रह आहे व तो जर पंचमस्थानी असेल, तर हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. ते शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती, पारितोषिक मिळवू शकतील; परंतु गुरूचे हे परिणाम अग्नी व जलराशीमध्ये म्हणजे १, ४, ५, ८, ९, १२ या राशींमध्ये दिसून येतील. इतर राशींमध्ये गुरू असेल तर अशा मुली-मुलांची बुद्धी असूनही शिक्षणामध्ये अडचणी येतील. परीक्षा पास होणार नाहीत किंवा परीक्षा देता येणार नाही किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण मिळणार नाही.
कुंडलीमधील बुध-हर्षलचे कोणतेही शुभयोग हे बुद्धिमत्तादर्शक असल्याने लेखक, नाटककार, पत्रकार वगरे लोकांच्या कुंडलीत हा योग प्रामुख्याने आढळतो. बौद्धिक क्षेत्रामध्ये हा योग जसा जास्त बोलका आढळतो तसा इतर क्षेत्रामधील व्यक्ती काही नावीन्यपूर्ण कार्य करतात. आपल्या बुद्धितत्त्वाने उद्योगधंद्यामध्ये यश मिळवतात. ज्योतिषी, मानसशास्त्रज्ञ, विचारवंत वगरे लोकांनाही हा योग गणित, संख्याशास्त्र, अकौन्टन्सी, ग्रंथ प्रकाशन, वृत्तपत्र संस्था, छापखाने, जाहिराती संस्था वगरे क्षेत्रांत व्यक्तीला पुढे आणणारा आहे. कुंडलीमधील १, ५, ९ किंवा ३, ७, ११ स्थानांमधून होणारे शुभ योग तसेच मिथुन, कन्या, तूळ, कुंभ राशींतून होणारे शुभ योग बौद्धिकदृष्टय़ा ‘उच्च’ प्रतीचे असतात. बुध-हर्षल शुभ योगात असूनसुद्धा अति चिंतन करीत बसणे, तंद्रीत असणे, स्वभावात लहरीपणा, हट्टीपणा असणे असे दुर्गुणही आढळतात.
रवी व बुध हे एकमेकांपासून २८ अंशांपेक्षा जास्त दूर नसतात. त्यामुळे यांच्यात युतियोग व समक्रांती योग हेच दोन महत्त्वाचे योग होतात. रवी-बुध युतीमध्ये बुद्धाचा अस्त होतो. रवी-बुध युती अस्त सर्वसाधारण व्यक्ती विद्याव्यासंगी, काही बौद्धिक छंद असणारी, लेखन-वाचनाची आवड असणारी असते अथवा व्यक्ती बोलण्यातही मोठय़ा तरबेज असतात.
बुध-गुरू युती ही दोन शुभ ग्रहांची युती असल्याने ज्या स्थानात अशी युती होते अथवा हे दोन ज्या स्थानांचे अधिपती असतात, त्या स्थानांच्या दृष्टीने काही महत्त्वाची शुभ फले अनुभवास येतात. अशी व्यक्ती अत्यंत हुशार, बुद्धिमान, सर्व गोष्टींत स्वत:च्या अक्कलहुशारीने प्रावीण्य मिळविणाऱ्या असतात. बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक कमावतात. गुणवान, उदारनीतितज्ज्ञ वगरे गुणधर्म या योगात उत्तम आढळतात. आनंदी वृत्ती असून अशा व्यक्ती मोठय़ा दिलदार मनाच्या असतात. कोणत्याही स्थिर स्वरूपाच्या व्यवसायात पुढे येतात. उत्तम डॉक्टर, वकील, नोकरी करणारे, तंत्रज्ञ होतात. अशा व्यक्तींना ठरावीक साच्याचे व शांत तऱ्हेचे जीवन आवडते. अशा तऱ्हेचे उद्योग-व्यवसायच ते निवडतात. बुध-गुरू युती असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयापुरत्याच तज्ज्ञ आढळतात. कित्येक वेळा एकांगी वृत्ती आढळते. बुध-गुरू युतीत बुधाची आकलनशक्ती जास्त उत्तेजित होत असल्याने असे लोक कोणत्याही विषयाचे उत्तम प्रकारे ज्ञान करून घेऊ शकतात, परंतु या युतीमध्ये बौद्धिक हटवादीपणा, अहंकार आढळतो. स्वत:ला फार विद्वान समजतात.
मंगळ-बुध युतीमध्ये उत्तम लेखक, इंजिनीअर होऊ शकतात. उत्तम टीकाकार होतात. टीका करणे या योगांचा स्थायिभाव आहे. समयसूचकता, धूर्तपणा हे बुधाचे गुण जसे प्रामुख्याने आढळतात तसाच व्यवहारीपणा यांच्या वृत्तीतच मुरलेला असतो. बुध-मंगळ योग हा इंजिनीयिरग यांत्रिकी वगरे गोष्टींत उत्तम असतो. बुध-मंगळाच्या शुभ योगातही व्यक्ती स्वार्थ असल्याशिवाय विशेष काही कोणाचे भले करणार नाही.
बुध-नेपच्यून युती हा योग संशोधनात, कलेत किंवा कोणत्याही बौद्धिक व मानसिक क्षेत्रांत जगावेगळी झेप घेणारा असतो. कधी काव्य अगदी उत्स्फूर्त अचानक सुचते, कधी संशोधनाची अचानक कल्पना चाटून जाते, कधी निर्णय घेण्याची अचानक आतून संवेदना होते. त्यामुळे या योगात तुम्हाला उत्कृष्ट लेखक, संशोधक, काव्यरसिक, कवी, नृत्यकार, वाद्यवादक अशा तऱ्हेने अनेक लोक सापडतील. काही लोकांना दैवी देणगीचा फायदा होत असल्याने हा योग असणारे ज्योतिषीसुद्धा काही वेळा आश्चर्यचकित तंतोतंत भविष्य वर्तवितात. सूचक स्वप्ने पडणे, पुढील गोष्टींचे अंदाज येणे, तर कधी वाचासिद्धीसारखी यांची वाणी खरी ठरणे. कधी दुसऱ्याच्या मनाचा अचूक अंदाजही घेता येतो. मानसिक शक्तीची सुप्त देणगी अशा लोकांना असल्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यास हा योग मोठा साहाय्यभूत ठरतो. बुध-नेपच्यून शुभ योग कोणत्याही गूढ शास्त्रास मोठा पोषक असतो, ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, चिंतन वगरे गोष्टींना उच्च स्थान देणारा योग आहे.
मंगळ-बुध शुभ योग किंवा मंगळ-बुधाच्या दृष्टियोग असेल तर परीक्षेत खात्रीपूर्वक यश येते. त्याचबरोबर मंगळखेरीज उच्च गणितशास्त्रास किंवा त्या विषयाचे ज्ञान घेण्यास शनीची जोड असावी लागते. स्टॅटिस्टिक विषय व चार्टर्ड अकौंटन्टचे गणित अथवा या शास्त्रातील उच्च परीक्षेच्या बाबतीत मंगळ-बुध व शनी असावे लागतात. गणितशास्त्रातील उच्च प्रमेये, अर्थशास्त्रातील भांडवल मजूर, मजुरी उत्पादन मागणी, पुरवठा वगरेचा कारक शनी आहे. उत्तम अर्थशास्त्रज्ञ होण्यास शनी अनुकूल आहे.
कोणत्याही विषयाचे संशोधन हा धर्म हर्षलचा आहे. तृतीय स्थानही खूप महत्त्वाचे आहे.
सध्या प्रत्येक व्यवसायामध्ये अकाऊन्टन्सी जरुरी असते, पण कोणत्या व्यवसायामध्ये हे काम केले म्हणजे भाग्योदय चांगला होईल; हे प्रत्येक मनुष्याने आपआपल्या जन्मकुंडलीवरून ठरवावे. जन्मकुंडलीमध्ये शनी बलिष्ठ शनी असेल तर बँका, रिझव्‍‌र्ह बँका, सरकारी कचेऱ्या यांत नोकरी यशकारक होईल.
बुध बलिष्ठ असेल तर सर्वसाधारण व्यापारी दुकाने, अडते, दलालाची दुकाने, किराणा व स्टेशनरीचे व्यापार, देवघेवीचे व्यवहार यात नोकरी करावी.
गुरू बलिष्ठ असेल तर विश्वविद्यालय, शिक्षण संस्था व सार्वजनिक फंड, वगरेमध्ये भाग्योदय होईल.
शुक्र बलवान असेल तर सोने, चांदी, रत्ने, उंची कपडे, गिरण्या करमणुकीची स्थळे यात नोकरीधंदा फायदेशीर होतो.
हर्षल बलिष्ठ असेल तर लोखंड, पोलादाचे कारखाने, लष्करी खाते यामध्ये जावे.
अग्नी राशीत बरेच ग्रह असतील तर ज्यामध्ये कष्ट व बुद्धी यांची जरुरी असून जी कामे, हस्तकौशल्य व मेहनत यांनी होणारी असून ज्यामध्ये बुद्धीचे व यंत्राचे साहाय्य घ्यावे लागते. अशा स्थितीमध्ये शास्त्राचा अभ्यास, मेकॅनिकची कामे करणे फायदेशीर होईल.
वायू राशीमधील बरेच ग्रह असतील तर ते लेखन, व्यवसाय, शास्त्रीय विषयांचे व्यवसाय व सर्व प्रकारची बुद्धिमत्तेची कामे दर्शवितात या राशीत बरेच ग्रह असतील तर मनुष्य लेखक. कारकून, ग्रंथकर्ता, शिक्षक, वकील, ड्राफ्टसमन, नकाशा काढणारा अगर इंजिनीयर होतो.
जल राशीत बरेच ग्रह असतील तर प्रवाही पदार्थाचे व्यवसायामध्ये यश. पेट्रोल, रॉकेल स्पिरीट, सर्व तऱ्हेचे खाणीतील प्रवाही पदार्थ वगरे व्यवसायामध्ये उत्तम यश, नावा बनवणे, गोदीतील कामे, दर्यावर्दीपणाची कामे व त्या खात्यातील नोकरी, व्यापारी जहाजावरील नोकरी वगरे व्यवसाय, नट सिनेमातील, सिनेमा व्यवसाय वगरेंना जलराशीच अनुकूल असते.
पृथ्वी राशीत बरेच ग्रह असतील तर इमारती कामामध्ये नोकरी, इंजिनीअिरग खाते, खाणीतील कामे व दुसरी कोणतीही अंगमेहनतीची अगर मजुरीची कामे वगरे किरकोळ व्यवसायाचे कामी येतात. मकर राशीचा कल सरकारी नोकरीकडे असतो. सत्ता चालविणे हा मकर राशीचा धर्म आहे. वृषभ राशी शेतकी व बँकिंग, कन्या राशीचा कल सरकारी नोकरीकडे असतो.
कुंडलीतील चतुर्थस्थानावरून उच्च शिक्षणाचे तर पंचमस्थानावरून उदरनिर्वाह, परिचारिका शिक्षणाचे भाकीत वर्तवतात.
गुरू हा उच्च ग्रह शिक्षणासाठी अत्यंत पूरक व उपकारक असून बुध ग्रह व्यावहारिक शिक्षणास चालना देतो. हर्षल हा संशोधन शिक्षणाचा कारक ग्रह समजला राशीत. आपला शैक्षणिक प्रभाव विशेषत्वाने दाखवतो.
मिथुन, कन्या राशीचा बुध चतुर्थस्थानात असता भद्रयोग करतो व त्यामुळे ती व्यक्ती शिक्षणक्षेत्रात मूलभूत स्वरूपाची भरीव कामगिरी करू शकते. लग्नस्थान, चतुर्थ व पंचमस्थानातील रवी उत्तम शैक्षणिक यश मिळवून देतो.
पंचम स्थानामध्ये शुभ ग्रहाची राशी असेल किंवा या स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल. शुभ ग्रहाची युती असेल तर अशी ग्रहस्थिती मनुष्याला निश्चितपणे बुद्धिमान बनवते.
पंचमस्थानाचा स्वामी स्वत:च्या उच्च राशीत असेल, किंवा शुभ ग्रहांच्या दरम्यान असेल तरी ती व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असते.
गुरु केंद्र किंवा त्रिकोणस्थानात असताही व्यक्ती बुद्धिमान असते.
बुध पंचमस्थानात असेल तसेच पंचमेशही प्रबळ होऊन केंद्रात स्थानापन्न झालेला असेल.
पंचमेशाचा शुभ ग्रहांशी युती किंवा दृष्टी संबंध असेल तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते. पंचमेशाचा उच्च राशीत असेल तरीही व्यक्ती बुद्धिमान बनते. पंचमेश केंद्र स्थानात असून शुभ ग्रहांनी युक्त असेल आणि बुध व गुरू केंद्र त्रिकोणात प्रबळ होऊन विराजमान झालेले असतील, तर त्यामुळे त्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता सुधारते.
पंचमेश व गुरू शुभ षष्ट अंशात असेल, तसेच पंचमेश व बुध व गुरूपकी एक ग्रह गोपुरांशामध्ये विराजमान झालेला असेल तर त्यामुळे अशी व्यक्ती बुद्धिमान बनते.
कुंडलीमध्ये चंद्र, बुध व गुरू हे ग्रह प्रबळ असून. त्यांचे शुभ ग्रहांशी युती दृष्टी संबंध असतील तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते.
द्वितीय स्थान, द्वितीयेश व गुरू केंद्र त्रिकोणात विराजमान होऊन प्रबळ बनलेली व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते.
शनी, राहू व केतू या तीनपकी एखादा ग्रह गुरुयुक्त असून त्यावर शुक्राची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती सामान्य गरीब कुटुंबात जन्माला येऊनही केवळ अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करते व देदीप्यमान यश मिळवते.
शिक्षणात अडथळे आणणारे कुंडलीतील ग्रहमान- पंचमस्थानाचा स्वामी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात विराजमान झालेला असेल तर शिक्षणात अडथळे येतात.
मानसी पंडित -response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 2:24 am

Web Title: knowledge and brain
Next Stories
1 शैक्षणिक अभ्यास आणि वास्तुशास्त्र
2 वास्तुशास्त्र आणि स्वभाव
3 घटस्फोट टाळता येतात?
Just Now!
X