News Flash

‘इसिस’मध्ये सामील होण्यास निघालेल्या ११ भारतीयांना अटक

'इसिस'ला आर्थिक तसेच इतर सहाय्य करण्याच्या गुन्ह्याखाली अटक

आयसिस

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या हेतूने निघालेल्या ११ भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिराती सरकारने(यूएई) अटक केल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
यूएईच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय नागरिकांच्या दोन गटांवर लक्ष ठेवून होते. या दोन्ही गटांचे वास्तव्य अबुधाबी आणि दुबईत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गट ‘इसिस’च्या समर्थनार्थ माहिती प्रसारित करीत असल्याचे आढळून आले. या गटांमध्ये पाकिस्तान व बांगलादेशातील नागरिकांचाही समावेश आहे. ‘इसिस’ला आर्थिक तसेच इतर सहाय्य करण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 5:16 pm

Web Title: 11 indians under detention in uae on charges of planning to join isis
टॅग : Isis
Next Stories
1 आघाडीमध्ये निवडणूक लढवूनही भाजपला बिहारमध्ये स्वबळाची आस, १६० जागांवर ठाम
2 औरंगजेब रस्त्याच्या नामांतरवरून दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला माहिती देण्याचे आदेश
3 स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव – नरेंद्र मोदी
Just Now!
X