News Flash

देशभरातल्या करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० च्या वर, २४ तासात ३४ मृत्यू

आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ६८६ जणांचा मृत्यू झाला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

गेल्या २४ तासात १२२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू देशभरात झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

२१ हजार ७०० रुग्णांपैकी आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाउन असणारच आहे. २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. त्यानंतर लॉकडाउन वाढवायचा की नेमकं काय करायचं याचं धोरण ठरवलं जाण्याची शक्यता आहे.

देशभरात करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. रुग्ण आढळताच तो भाग सील करण्यात येतो. देशभरात सर्वधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातही आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 7:00 pm

Web Title: 1229 new covid19 cases 34 deaths reported in the last 24 hours total number of cases rises to 21700 in india says union health ministry
टॅग : Coronavirus
Next Stories
1 झारखंड : करोना झाल्याच्या अफवेवरुन संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
2 जबरदस्त! DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा
3 करोनाशी लढा : वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना १० लाखांच्या विम्याचं कवच
Just Now!
X