25 November 2020

News Flash

अवघ्या १३वर्षांचा मुलगा ‘आयआयटी-जेईई’ प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण

सत्यम या १३ वर्षीय मुलाने अरा येथून आयआयटी-जेईई ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याचबरोबर कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विक्रम त्याने गेल्यावर्षीच केला

| June 23, 2013 12:33 pm

सत्यम या १३ वर्षीय मुलाने अरा येथून आयआयटी-जेईई ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याचबरोबर कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विक्रम त्याने गेल्यावर्षीच केला आहे. गेल्या वर्षी निगडीत विद्यापीठाची विशेष परवानगी घेऊन सत्यमने वयाच्या १२व्या वर्षी चेन्नई विभागातून ‘आयआयटी-जेईई’ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु, त्यावेळेस त्याचा अखिल भारतीय क्रमवारीत ८१३७ क्रमांक आला होता. ही क्रमवारी सुधारण्यासाठी त्याने यंदा पुन्हा ‘आयआयटी-जेईई’ची प्रवेश परीक्षा दिली व आपली क्रमवारी सुधारत सत्यमने ६७९वा क्रमांक पटकावला. गेली दोन वर्षे कोटा येथे आयआयटी-जेईई च्या प्रवेश परिक्षेची तयारी सत्यम करत होता. सत्यमने दिल्लीच्या कौशिक सहालचा १४व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विक्रम मोडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 12:33 pm

Web Title: 13 yr old bihar boy is youngest to crack iit jee
टॅग Bihar
Next Stories
1 ‘सरकारी माय’ बाळंतपण करणार !
2 पाकिस्तानात विदेशी पर्यटकांवर हल्ला; १० ठार
3 उत्तराखंड: हवामानात सुधारणा; मदतकार्याला पुन्हा सुरूवात
Just Now!
X