अफगाणिस्तानातील हेलमांड या ठिकाणी असलेल्या लष्करगडमध्ये एका कार बॉम्बचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. एका स्थानिक मैदानाजवळ हा स्फोट झाला या स्फोटात आत्तापर्यंत १४ जण ठार तर ४० लोक जखमी झाले आहेत एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हेलमांडचे राज्यपाल हयातुल्लाह हयात यांचे प्रवक्ते ओमवर झ्वाक यांनी या संदर्भातली माहिती दिली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहे अशीही माहिती मिळते आहे.

अफगाणिस्तानात स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाहीये. मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या सुसाइड बॉम्बच्या स्फोटात ३२ लोक ठार झाले होते.

तर याच वर्षी २९ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात अफगाण लष्कराचे ५ जवान मारले गेले होते तर १० जण जखमी झाले होते. २० जानेवारीला दहशतवाद्यांनी काबूलमधल्या हॉटेलमध्ये गोळीबार करत २२ लोकांना ठार केले होते. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तान कार बॉम्बच्या स्फोटाने हादरले आहे.