18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

१४ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन नराधमांनी पीडितेला ट्रेनमधून फेकले

ढिम्म प्रशासनामुळे सुमारे १४ तास तिच्यावर उपचार झाले नाही

पाटणा | Updated: June 19, 2017 3:40 PM

(प्रातिनिधिक छायाचित्र )

बिहारमधील १४ वर्षीय मुलीवर सहा अल्पवयीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित मुलीला ट्रेनमधून फेकून दिले असून रेल्वे रुळावर जखमी अवस्थेतून पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले. पीडितेच्या नरकयातना इथे संपल्या नाही. रुग्णालयात ढिम्म प्रशासनामुळे तब्बल १४ तास पीडितेला विना उपचार पडून राहावे लागले.

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील लखोचक गावात राहणाऱ्या पीडित मुलीचे तिच्या घराजवळून अपहरण करण्यात आले. पीडित मुलीने ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. ‘मी घराजवळ जात असताना मागून आलेल्या सहा नराधमांनी मला पकडले. यातील दोन जण माझे शेजारी होते’ असे तिने सांगितले. यानंतर नराधमांनी गुंगीचे औषध दिल्याचे तिने सांगितले. मी शुद्धीवर आले त्यावेळी मी ट्रेनमध्ये होते. यातील दोघांनी मला ट्रेनमधून फेकून दिले’ असा आरोप तिने केला आङे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास माझी बहीण घरातून बेपत्ता झाल्याचे आमच्या लक्षात आले. १२ तासांच्या शोधमोहीमेनंतर ती किऊल स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सापडली.

वैद्यकीय तपासणीत पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर झाले आहे. पीडितेच्या नरकयातना इथेच संपल्या नाहीत. गंभीर जखमी झालेल्या पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तिच्यावर २४ टाके घालण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला पाटणामधील रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयातील ढिम्म प्रशासनामुळे सुमारे १४ तास तिच्यावर उपचार झाले नाही. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तिला रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला. प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भातील वृत्त झळकताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पीडितेला भरती करुन घेतले.

First Published on June 19, 2017 3:40 pm

Web Title: 14 year old girl gangraped and beaten up by six minors in bihar flung from train