News Flash

“देशातल्या १६ राज्यांचा रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही चांगला”

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

संग्रहित (Express photo)

करोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिल्लीतला रिकव्हरी रेट ८८ टक्के, हरयाणातला ७८ टक्के, आसामचा ७६ टक्के, तेलंगणचा ७४ टक्के, तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यांचा ७३ टक्के, राजस्थान ७० टक्के, मध्य प्रदेश ६९ टक्के आणि गोवा ६८ टक्के असे रिकव्हरी रेट आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव आर भूषण यांनी दिली आहे.

भारतातले १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनातून बरे झाले आहेत. आपले करोनायोद्धे अर्थात आपले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांनी घेतलेल्या या कष्टाचं हे फळ आहे असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. देशातला मृत्यूदर २.२१ टक्के झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. जगातला हा अत्यल्प दर आहे असंही आरोग्यमंत्रालयाने सांगितलं. तसंच देशातल्या २४ राज्यांमधला मृत्यूदर देशातल्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे असंही भूषण यांनी सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:59 pm

Web Title: 16 states of the country have a recovery rate that is more than the national average scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित
2 तालिबानी दहशतवादी भारतात हल्ल्याच्या तयारीत, अयोध्या राम मंदिरही निशाण्यावर
3 तणाव कायम असल्यामुळे भारत चीन सीमेवर आणखी ३५ हजार सैनिक तैनात करणार
Just Now!
X