वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरू असताना चॅनेलच्या व्यवस्थापकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्याने महिला पत्रकार व कॅमेरामनचा जागीच मृत्यू झाला.
डब्ल्यूडीबीजे-टीव्ही या वृत्तवाहिनीचा व्यवस्थापक जेफ्री मार्क्‍स यांच्या म्हणण्यानुसार महिला पत्रकार एलिसन पार्कर (२४) आणि अ‍ॅडम वार्ड (२७) यांच्यावर थेट प्रक्षेपण सुरू असताना अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. या वेळी एलिसन या फँ्रकलीन काऊंटी येथील ब्रिजवॉटर प्लाझावरील पर्यटनावर बोलत होती. ती हसत असताना अचानक आठ गोळ्या झाडल्याचा आवाज आला व यानंतर कॅमेरा खाली पडल्याचे चित्रफितीमध्ये दिसून आले. यामध्ये पत्रकार वेदनेने ओरडतानाचा आवाज येत होता. ही घटना पाहून टीव्ही अँकरचा चेहरा सुन्न झाला होता.  पार्कर या जेम्स मेडिसन विद्यापीठामध्ये शिकत होत्या. अद्याप कोणी गोळ्या झाडल्या याबाबतचा खुलासा होऊ शकला नाही. वृत्त वाहिनीने एलिसन आणि वार्ड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.